Happy Promise Day 2021 Wishes या सुंदर शुभेच्छा देऊन ‘प्रॉमिस डे’ ला आपल्या जोडीदारासोबत व्हा वचनबद्ध!

Spread the love

वचन दिल्याशिवाय नात्यातील विश्वास वाढत नाही. त्यामुळे प्रेमात पडल्या पडल्या प्रत्येक जोडपं एकमेकांना जपण्याचं, कधीही सोडून न जाण्याचं, नात्यात सदैव प्रामाणिक राहण्याचं, जीवापाड काळजी घेण्याचं अशा अनेक वचनं देतात. ७ फेब्रुवारीपासून व्हेलेंटाईन वीकला (valentine week) सुरुवात होते आणि या वीकच्या पाचव्या दिवशी ‘प्रॉमिस डे’ सेलिब्रेट केला जातो. वचन हे नात्यात कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान असल्याने प्रियकर-प्रेयसीच नाही तर आई-वडिल व मुलं, भाऊ-बहिणं, मित्र-मैत्रीण असे सर्वचजण एकमेकांना या दिवशी चांगलं कोणतंतरी वचन देण्यास उत्सुक असतात. तुम्हालाही प्रत्यक्षात भेटून आपल्या आवडत्या माणसाला वचन देता येत नसेल तर या सुंदर Whatsapp massages मधून मराठमोळया अंदाजात त्यांना promise day 2021 च्या शुभेच्छा द्या.


1. आयुष्यभराची साथ तुला देईन

मुठभर नाही तर ओंजळभर आनंद तुला वाहिन

तुलाही मी आवडत असेन तर एकदा मला सांग

आयुष्यासोबतच माझ्या श्वासांवर नाव तुझंच कोरीन

Happy promise day 2021

(वाचा :- माधुरी दिक्षितला नव-यातील अतोनात आवडणारा ‘हा’ गुण प्रत्येक मुलगी आपल्या जोडीदारात शोधते!)

2. वेळ भले वाईट असेल

किंवा मग चांगली असेल

माझा प्रत्येक क्षण व साथीवर हक्क मात्र तुझाच असेल

‘प्रॉमिस डे’ च्या शुभेच्छा!

(वाचा :- नात्यातील प्रेम सदा चिरतरूण ठेवायचं आहे? मग लढवा मीरा राजपूतसारखी युक्ती!)

3. तू जिथे जाशील

मी तिथे येईन

सावलीने जरी सोडली साथ

तरी अंधारात मी तुझा प्रकाश होईन!

Happy promise day 2021

(वाचा :- “मी वेदनेसोबत जगणं शिकून घेतलं” संजय दत्तच्या मुलीचे हे शब्द का ठरतात दु:खी लोकांसाठी आशेचा किरण?)

4. या खास दिवशी प्रॉमिस आहे तुला

श्वासांनी सोडली साथ तरी जपेन मी तुला माझ्या फुला

Happy promise day 2021

(वाचा :- पती-पत्नीच्या आनंदी नात्याचा आरोग्यालाही होतो प्रचंड फायदा, जाणून घ्या कसा?)

5. करेन प्रेम कोणत्याही स्वार्थाविना

नाही आता हे जीवन तुझ्या प्रेमाविना

आयुष्य असो मोठं किंवा छोटं

आता तूच माझं संगीत अन् तूच माझा वीणा!

Happy Promise day 2021

(वाचा :- ‘या’ ५ गोष्टींत दडले आहे आनंदी नात्याचे रहस्य!)

6. श्वासाच्या प्रत्येक ठोक्यासोबत

फक्त तुझ्यावर जीव लावेन

डोक्यात येणा-या प्रत्येक विचारात

तुला कायम हमखास आठवेन

‘प्रॉमिस डे’ च्या शुभेच्छा!

(वाचा :- सोशल मीडियावर डेट करण्याआधी ‘या’ ५ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी!)

7. तुझ्याकडे कधीच करणार नाही कानाडोळा

तुझ्या डोळ्यांत कधी वाहू देणार नाही अश्रूंचे पाठ

मेल्यानंतरही होईन तुझाच/तुझी

आता आपली साताजन्माची गाठ!

Happy promise day 2021

(वाचा :- श्वेता व ऐश्वर्या बच्चनमधील वाद बाहेर, ‘या’ गोष्टी नणंद व वहिनीच्या नात्यात आणतात कटुता!)

8. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत

मी करेन जास्तीत जास्त प्रेम

वर्षावर वर्षे सरो कितीही

आपलं प्रेम मात्र राहिल पहिल्यासारखंच सेम!

Happy promise day 2021

(वाचा :- वयाने मोठ्या मुलासोबत लग्न करणार असाल तर ‘या’ गोष्टींची आवर्जून घ्या काळजी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *