Happy Propose Day Wishes in Marathi खास व्यक्तीला अशा सांगा मनातील भावना

Spread the love

आयुष्यात खास व्यक्तीसोबत अतुट नाते जोडण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची, क्षणाची किंवा कोणत्याही मुहूर्ताची खरं तर आवश्यकता नसते. आपली आवडती व्यक्ती जीवनात येण्यासाठी गरजेच्या गोष्टी असतात त्या म्हणजे ‘प्रयत्न’ आणि ‘वेळ’. या दोन्ही गोष्टींमुळे कोणतीही व्यक्ती अगदी आपसुकच आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत जोडली जाते. अशा व्यक्तीसमोर मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज नाही. काही मंडळी मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ यासारख्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतात. ‘व्हॅलेंटाईन डे’पूर्वी ‘व्हॅलेंटाईन वीक’ देखील जल्लोषात साजरा केला जातो. या वीकची सुरुवात ७ फेब्रुवारीला ‘रोझ डे’ ने केली जाते. यानंतर ८ फेब्रुवारीला ‘प्रपोज डे’ (Happy Propose Day 2021) सेलिब्रेट केला जातो. या दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात. तुम्हाला देखील स्पेशल व्यक्तीला प्रपोज करायचे आहे का? तर तिला/ त्याला एखादा छानसा मेसेज देखील पाठवा…

१. आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय
Happy Propose Day 2021

२. समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे…
माझे केवळ तुझ्याशीच…
Happy Propose Day
(Happy Rose Day 2021 Wishes प्रेयसी, प्रियकर, मित्रमैत्रिणींना मराठीतून द्या ‘रोझ डे’च्या शुभेच्छा)

३. चूक तर माझ्या नजरेची आहे
जे लपून-छपून फक्त तुलाच पाहतात…
मी तर गपच राहायचं ठरवलं होतं
पण माझ्या मनातील साऱ्या भावना अखेर डोळ्यांनीच व्यक्त केल्या
हॅपी प्रपोज डे 2021
(परीक्षा, मुलांची अन् पालकांचीही)

४. ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात
Happy Propose Day
(माझ्या आयुष्यातल्या ‘शशी’)

५. काही पावले माझ्या सोबत चाल..
पूर्ण कहाणी मी तुला सांगेन,
नजरेतून तुला जे कळलं नाही…
त्या भावना मी शब्दातून तुझ्यासमोर मांडेन
Happy Propose Day

६. महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात
Happy Propose Day 2021


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *