Health Care मुतखडा व्याधीविषयीचे हे गैरसमज टाळा

Spread the love

डॉ. अनघा कुलकर्णी-केकतपुरे, युरोलॉजिस्ट, नागपूर
आपल्या समाजात आजारांबद्दल बरेच गैरसमज आहेत. त्यापैकी काही गैरसमज, तर वर्षानुवर्षे आपल्या मनात पक्के बसले आहेत. या गैरसमजांमुळे रुग्णावर काही दुष्परिणाम होतात. उपचारांमध्ये अडथळेदेखील निर्माण होतात. मुतखड्यासंबंधीच्या अशाच गैरसमजांना दूर करण्याचा प्रयत्न आपण प्रस्तुत लेखाद्वारे करणार आहोत.

-बिअर पिणे
द्रव पदार्थ जेवढ्या अधिक प्रमाणात सेवन कराल, तेवढ्या प्रमाणात लघवी जास्त होईल आणि छोटे खडे मूत्रमार्गाद्वारे लघवीतून बाहेर पडतील. मग बीअर असो किंवा कोणताही इतर द्रव पदार्थ. बिअर प्यायल्याने डाययुरेसिसची प्रक्रिया होते. याचाच अर्थ लघवी जास्त प्रमाणात होते. त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. मात्र, हे सर्व करण्यासाठी बिअर पिण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही द्रव पदार्थांचे सेवन केले, तरी परिणाम दिसून येईल.
(Health Care Tips मुतखडा (किडनी स्टोन) : वेळीच उपचार आवश्यक)
– मांसाहार केल्याने मुतखडा होतो

मांसाहार केल्याने मुतखडा होतो, असे स्पष्टपणे सांगता येणार नाही. मांसाहारी पदार्थांमध्ये प्रथिने (प्रोटिन) जास्त असतात. मात्र, अधिक मांसाहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मूतखडा होईलच, असे सांगता यायचे नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपायाअंतर्गत मांसाहाराच्या सेवनावर मर्यादा असावी.

– क्षारयुक्त पाण्यामुळे मुतखडा होतो

विदर्भात चंद्रपूर, यवतमाळ आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी; तसेच खान्देशातील जळगाव, नाशिकजवळच्या गावांमध्ये मूत्रपिडांचे विकार आणि मुतखड्याचे रुग्ण जास्त आढळले आहे, हे खरं आहे. याचे कारण त्या भागातील पाणी खारट आणि अधिक क्षारयुक्त म्हणजे पचण्यास जड आहे. मात्र, मूतखडा होण्यास तेवढे एकच कारण आहे, असे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही पाणी हा एक घटक त्यामागे असू शकतो.
(Health Care Tips पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास)

– चिऱ्याची शस्त्रक्रिया


चिऱ्याच्या शस्त्रक्रियेनंतर खडा होत नाही; दुर्बिणीने केला तर पुन्हा होतो, असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. शस्त्रक्रिया चिऱ्याने करा अथवा दुर्बिणीने त्याचा आणि मूतखडा पुन्हा होण्याचा काही एक संबंध नाही. उलट दुर्बिणीने केलेल्या शस्त्रक्रियेद्वारे कमी गुंतागुंत आणि वेदना असतात.
(तुम्ही योग्य पद्धतीने श्वास घेताय? श्वासोच्छवासाचे सोपे ६ व्यायाम प्रकार)

– अन्य पॅथींची औषधे


अन्य पॅथींची औषधे घेऊन मूतखडा बरा होण्याची वाट बरेच लोक बघतात. मात्र, उपचारादरम्यान तो खडा शरीराबाहेर निघाला की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. जर खडा मूत्रमार्गात कुठेतरी असेल, तर त्यामुळे आणखी गुंतागुंत होऊन मूत्रपिंड निकामी होण्याची भीती असते. त्यामुळे अन्य पॅथींची औषधे घेताना सोनोग्राफी व एक्स-रे या चाचण्या जरूर कराव्यात.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *