Health Care मूड चांगला राहण्यासाठी करा या ७ गोष्टी

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
सध्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. स्वतःला आवडेल ते करण्यात किंवा छंद जोपासण्यात मन गुंतवल्यास ऊर्जा मिळते आणि उत्साह वाढतो. स्वतःला पुरेसा वेळ द्यायची सवय लावून घेणं आवश्यक आहे. मूड चांगला राहण्यासाठी काही खास टिप्स…

१. निसर्गाच्या सान्निध्यात
वृक्षांच्या सान्निध्यात हिरव्यागार वातावरणात राहिल्यानं मनाला आवश्यक असलेली शांती मिळते. मन प्रसन्न राहतं. तसेच रोगप्रतिकार शक्ती सुधारते. जपानी संस्कृतीत यालाच फॉरेस्ट बाथिंग असं म्हणतात.

२. आत्मविश्वास वाढवा
स्वतःला सर्व गुण-दोषांसह स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतःला कमी लेखण्याची चूक करू नका. स्वत:शी संवाद साधा आणि इतरांशी संवाद साधताना आत्मविश्वासानं संवाद साधा. यामुळे तुमचं मनोबल वाढेल, आत्मविश्वासात भर पडेल.
(Health Care शरीर फिट ठेवण्यासाठी करा या ७ महत्त्वाच्या गोष्टी)

३. असावं चांगलं आचरण

इतरांशी चांगलं आचरण ठेवा. अशा वेळी शरीर ऑक्सिटोसीन बाहेर टाकत असतं. या प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासात भर पडते.

४. गाणी ऐका

तुम्हाला आवडणारी गाणी रोज ऐका. त्यामुळे मन:शांती मिळते. तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट तुमचा मूड क्षणात बदलू शकते. घरकाम किंवा इतर लहानसहान कामं करताना गाणी ऐका. यामुळे काम करण्याचा उत्साह वाढतो.
(Shanka Prakshalana शंख प्रक्षालन क्रिया करण्याची पद्धत, जाणून घ्या याचे लाभ)

५. आवडणाऱ्या कामांना प्राधान्य
तुम्हाला आवडणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या कामांची स्वतंत्र यादी करा. ती कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण करा. यामुळे काम करताना मजा येईल.
(अपचनामुळे त्रस्त आहात? समस्या दूर करण्यासाठी वाचा ही फायद्याची माहिती)

६. योग करा

योग केल्याने शक्ती आणि लवचीकता वाढते, असं अनेकदा ऐकलं आहे. तसंच योग केल्यानं ऊर्जा वाढते आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

७. करा ऑनलाइन डिटॉक्स

लॉकडाउनच्या काळात अनेक जण तासनतास सोशल मीडियाचा वापर करत होते. सोशल मीडियाच्या अतिवापराने डोळ्यांवर ताण येतो. म्हणून आठवड्यातील एक दिवस ऑनलाइन डीटॉक्स करा. म्हणजेच मोबाइल, लॅपटॉप अशा उपकरणांचा वापर करु नका. त्या दिवशी सोशल मीडियाचा वापर करणं कटाक्षानं टाळा. मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारा, स्वतःसाठी वेळ काढा.

संकलन – लीना देशमुख, आरकेटी कॉलेज


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *