Health Care वातरोग कोणत्या कारणामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

Spread the love

डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर
ज्या पद्धतीने ‘कंजेंटिव्हायटिस’ म्हणजे डोळ्यांचा प्रादुर्भाव, ‘डर्मायटायटिस’ म्हणजे त्वचेवर होणारे प्रादुर्भाव अगदी त्याच प्रकारे ‘आर्थरायटिस’ म्हणजे सांध्यांना होणारा प्रादुर्भाव. त्यास सर्वसामान्य भाषेत ‘वातरोग’ असे म्हणतात. जनसामान्यांमध्ये वातरोगाची संकल्पना सांधेदुखीपर्यंत मर्यादित आहे. मात्र, वातरोग केवळ सांधेदुखीपुरता मर्यादित नाही.

आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार शंभराहून अधिक प्रकारचे वातरोग आहेत. रुमॅटॉइड आर्थरायटिस, एंकिलोसिंग स्पॉन्डिलायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस, गाऊट, ओस्टिओआर्थरायटिस, चिकनगुनीया आर्थरायटिस, एसएलई (ल्युपस), शोग्रेन सिंड्रोम असे अनेक आजार साधारणतः आढळणाऱ्या वातरोगाचे आहेत.
(Weight Loss Story या व्यक्तीचे वजन होते १०२Kg, असं घटवलं १२Kg वजन)

​वातरोग का होतो?

रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या अवयवांना ओळखत असते. जसे व्हायरसने शरीरात प्रवेश केला की ती त्याविरुद्ध ही यंत्रणा लढते. मात्र जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या अवयवांना ओळखण्याची क्षमता गमवते आणि त्यांच्यावरही हल्ला चढवू लागते; यास ‘ऑटोइम्युनिटी’ असे म्हणतात. सांध्यात एक लाइनिंग असते. त्याला ‘सायनोव्हियम’ असे म्हणतात. त्यावर रोगप्रतिकारक शक्ती हल्ला चढवून त्यास नुकसान पोहोचवते. हे वाताचे मूळ कारण आहे. ही ऑटोइम्युनिटी शरीरातील अन्य अवयवांनादेखील इजा पोहोचवते.

(मनगटदुखीच्या समस्येचा सामना करत आहात? खबरदारीचे ४ उपाय)

​वातरोगांची लक्षणे

आपल्याला एरवी सांधेदुखी होत असते. मात्र सहा आठवड्याहून अधिक काळ सांधेदुखी असेल तर वातरोग असण्याची शक्यता अधिक असते. सोबतच एकाहून अधिक सांध्यांमध्ये वेदना, सांध्यांवर सूज, सांध्यांवर लालसरपणा ही प्रमुख लक्षणे आहेत. एरवी सांधे दुखत असतील तर सकाळी जागे झाल्यावर अथवा विश्रांती घेतल्यावर आराम पडतो.

(Exercise For Health हवा रोजच्या रोज व्यायाम, कारण…)

​सांध्यांमधील दुखणे

मात्र वातरोगात सांधेदुखीमध्ये विश्रांतीनंतर अथवा झोपेतून जागे झाल्यावर सांध्यांमध्ये दुखणे वाढते आणि अकडण निर्माण होते. ही किमान ३० मिनिटांपर्यंत असते. जसंजसे काम करू लागतात तसंतसे वेदना आणि अकडण कमी होऊ लागतात. सोबतच संधीवातासारख्या वातरोगांमध्ये हलका ताप, भूक कमी लागणे, केस गळणे अशी अन्य लक्षणेदेखील आढळून येतात. याशिवा अंगावर चट्टे येणे, किडनीला सुज येणे, डोळे वारंवार लाल होणे अशीही काही लक्षणे आढळतात.

(Diet Plan Tips आहारात घटकांचा साधा समतोल)

​रोगाचे निदान

वातरोगावर योग्य उपचार मिळवायचा असेल, तर योग्य निदान होणे गरजेचे आहे. कारण शंभराहून अधिक प्रकारचे वातरोग आहेत. वैद्यकीय तपासणीतून लक्षणांचे परिक्षण करून वातरोगाच्यासंबंधित चाचण्या करण्यास सांगितले जाते. आर.ए. फॅक्टर, युरिक अ‍ॅसिड सारख्या रक्ताच्या तपासण्या आणि याशिवाय गरज असल्यास एक्स-रे व एमआरआयची मदत घेतली जाते. लक्षणे आणि चाचण्या या दोघांच्या संयोगातून आपण वातरोगाच्या निष्कर्षांपर्यंत पोहचू शकतो. अनेकदा लोक युरिक अ‍ॅसिड अथवा आर.ए. फॅक्टर चाचण्या करून वातरोग नाहीत, अशा निष्कर्षापर्यंत पोहचतात. मात्र सर्वांगिण तपासणीशिवाय वातरोगाचे निदान करणे उचित नाही.

​असा करावा उपचार

वातरोग उमळल्यावर वेदनाशामक अथवा स्टिरॉइडची औषधी दिली जाते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र आधुनिक वातरोगशास्त्रामध्ये (रुमॅटोलॉजी) तज्ज्ञ वेदनाशामक व स्टिरॉइड औषधांचा कमीत कमी अथवा नाहीच्या बरोबरीनेच वापर करतात. ‘डीमार्डस् : डिसिज मॉडिफाइंग एजंट’ सारख्या नव्या औषधांमुळे, ज्या पेशी ऑटोइम्युन झाल्यात, ज्या पेशींमुळे शरीराला नुकसान होत आहे; त्या पेशींचे आक्रमण परतवून लावता येते. सोबतच त्याचा प्रभावदेखील कमी करता येतो. त्यामुळे सांधेदुखी, सुज-लालसरपणा, ताप ही लक्षणे कमी होतात.

(Exercise Tips वयानुसार असू द्या व्यायामाचं प्रमाण)

​जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे

सोबतच सांध्यांचे दीर्घकालीन विकार जसे व्यंग होणे, बोटे वाकडे होणे अशा गोष्टींना प्रतिबंध करते. नव्या संधोधनानंतर आलेली जैविक औषधे (बायोलॉजिकल) ऑटोइम्युनिटीसाठी जबाबदार शरीरातील रसायनांवर आघात करते आणि ऑटोइम्युनिटीचा प्रभाव कमी करते. ज्यांना ‘डीमार्डस्’चे दुष्परिणाम जाणवतात किंवा त्याचा वापर करून देखील पूर्ण आराम मिळत नाही, त्यांना ही नवी जैविक (बायोलॉजिकल) औषधे परिणामकारक ठरतात. आजारातून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीतील बदल व फिजिओथेरपी देखील तेवढीच महत्त्वाची असते.

(Cancer Treatment कर्करोग उपचारांनंतरचे जीवन)

​सहकार्याची आवश्यकता

पूर्वी वातरोगाचा त्रास फार होत असे, अपंगत्व येत असे, दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागत असे. मात्र आता नवनवीन औषधांमुळे रुग्णांना कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. मात्र, औषधोपचारांसोबत कार्यालयीन सहकारी व परिवारातील सदस्यांचे सहकार्य आवश्यक असते.

(मेंदूच्या आरोग्यासाठी या १० फायदेशीर गोष्टींचा करा सराव)

​वातरोग आणि जीवनशैली

धुम्रपान व मद्यपान टाळणे. वजन नियंत्रणात ठेवणे. नियमित व्यायाम करणे. संतुलित आहार; कॅल्शियम व व्हिटॅमिन डी पुरेसे घेणे. अ‍ॅण्टीऑक्सिडंट असलेला आहार घेणे. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळणे. योग्यपणे बसणे व चालणे. झोप व्यवस्थित घेणे. ताणतणाव टाळणे.

(Mental Health Tips मला राग येतोय…)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *