Health Care वातरोग : समज-गैरसमज, जाणून घ्या १२ प्रश्नांची उत्तरे

Spread the love

डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर

१. वातरोग हा वृद्धांना होणारा आजार आहे?
वातरोग कुठल्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. विविध प्रकारचे वातरोग वेगवेगळ्या वयात होऊ शकतात. उदा. लहान मुलांना जेआयए (जुवेनाइल इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस), जेडीएम (जुवेनाइल डर्मेटो मायोसायटिस) सारखे वातरोग, तरुण व प्रौढ वयात संधिवात व अ‍ॅन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिस आणि ज्येष्ठांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस व गाऊटसारखे वातरोग आढळून येतात.

२. वातरोग केवळ दोन-तीन प्रकारचे आहेत?
वातरोगाचे २-३ प्रकारच आहेत, असा समज लोकांमध्ये आहे. मात्र, आधुनिक वातरोगशास्त्रानुसार शंभराहून अधिक प्रकारचे वातरोग आहेत. त्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, एंकिलोसिंग स्पॉन्डिलायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस, गाऊट, ऑस्टिओआर्थरायटिस, चिकनगुनिया आर्थरायटिस, एस.एल.ई.(ल्युपस), शोग्रेन सिन्ड्रोम सारख्या वातरोगांचा समावेश आहे.
(Health Care वातरोग कोणत्या कारणामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार)

३. संधिवातावर उपचार नाही?

संधिवातावर उपचार नाही, आणि उपचार करून देखील व्यंग उत्पन्न होतेच; असा एक गैरसमज वातरोगाबद्दल आहे. आधुनिक औषधांच्या सहाय्याने वातरोगावर उपचार होतो आणि व्यंग उत्पन्न होण्याची शक्यता कमी होते. त्याच प्रकारे वातरोगग्रस्त रुग्णांना सामान्य जीवन देखील जगता येते.

४. वातरोग केवळ जीवनशैलीतील बदलाने कमी होतो?

वातरोग झाल्यावर नातेवाईक अथवा मित्र सल्ला देतात की, वजन कमी केल्याने, व्यायाम केल्याने वातरोग बरा होईल. अर्थात हे उपचारास पुरक असले तरी वातरोग एक प्रकारचा आजार असल्यामुळे औषधोपचार करणे आवश्यक असते. औषधोपचारांसह जीवनशैलीत बदल केला तरच फायदा होईल, केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसा नाही.

५. वातरोग हा केवळ सांध्यांच्या वेदनेपुरता मर्यादित आहे?

असा एक गैरसमज समाजात आहे. त्यामुळे अनेक जण या वेदना अंगावर काढतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, संधिवात शरीरातील सगळ्या अवयवांवरती प्रादुर्भाव करू शकतो आणि त्यामुळे अन्य अवयवांना देखील हानी पोहचू शकते. उदा. वातारोगांमध्ये डोळ्यात कोरडेपणा, फुप्फुसांना इजा होऊन श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

(Yoga Benefits कंबरदुखीपासून हवाय आराम! करा या सोप्या आसनाचा सराव)

६. रक्ततपासणी आणि एक्स-रे द्वारे वाताचे रोगनिदान होते?

आरए फॅक्टर आणि एक्स-रे तपासण्या मुख्यत्वेकरून केल्या जात असल्या तरी केवळ यामुळेच प्रत्येकवेळा वातरोगाचे निदान शक्य नाही. वातरोगाचे निदान शारीरिक तपासणी आणि वातरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या चाचण्यांच्या आधार घेऊन केल्या जाते. केवळ रक्ततपासणी व एक्स-रे वर अवलंबून राहता येत नाही; कारण चाचण्यांच्या काही मर्यादा असतात.

७. वातरोगावर औषधोपचार सुरू केले की, रुग्णाला लगेच फायदा होतो?

असा एक गैरसमज जनमानसात आहे. अर्थात रुग्णांना वाटत असते की, आपल्याला तातडीने फायदा व्हावा. मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्रात वातरोगांवर उपचारांसाठी जी औषधे वापरली जातात, ती रोगाच्या मुळाशी काम करीत असतात. त्यामुळे औषधांचा प्रभाव सुरू होण्यास तीन ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो, तर बारा आठवड्यांमध्ये फायदा दिसू लागतो. त्यामुळे धीर धरणे फार महत्त्वाचे आहे.
(मेंदूच्या आरोग्यासाठी या १० फायदेशीर गोष्टींचा करा सराव)

गैरसमज

९. औषधोपचारांचे दुष्परिणाम असतात.

एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, आजाराच्या तुलनेत औषधांचे फायदे जास्त आहेत. फार कमी रुग्णांमध्ये याचे दुष्परिणाम आढळून येतात. औषधाचा डोस बदलल्याने दुष्परिणाम कमी होतात. सोबतच वातरोगतज्ज्ञ रक्ततपासणी करून दुष्परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेत असतात.

१०. वातरोगात फक्त स्टेरॉइडचाच वापर करण्यात येतो हा एक गैरसमज आहे.
आधुनिक वातरोगशास्त्रात स्टेरॉइडसारख्या औषधांचा वापर अत्यल्प प्रमाणात करण्यात येतो. जर वातरोगांमुळे अन्य अवयवांवर परिणाम होत असेल, तर अशा परिस्थितीत स्टेरॉइड देण्याची आवश्यकता भासते. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, औषधांना घाबरण्याची गरज नाही. वातरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात औषध घेतले तर ते फायदेशीरच ठरते.

११. औषधोपचाराची गरज नाही…!

लोकांना असे वाटते की, वातरोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचारांची आवश्यकता नाही. मात्र, आधुनिक अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की, वातरोगांचा लवकरात लवकर उपचार करवून घेतला, तर सांध्यांना कमीत कमी इजा होते. शिवाय औषधोपचार लवकरात लवकर बंद करण्याची शक्यता देखील वाढते.

१२.बरे वाटले की औषध बंद केले तरी चालतील…!

आराम पडल्यावर रुग्ण जेवढ्या कालावधीची औषधे दिलीत, तेवढी औषधे घेऊन औषधोपचार बंद करतात. वाताचे औषध मुळापासून काम करते. त्यामुळे आराम पडला असे वाटले तरी स्वतःच्या मनाने औषधोपचार बंद करायचा नसतो. बरे वाटू लागले की, डॉक्टर तपासण्या करूनच औषधे कमी करतात.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *