Health Care शरीर फिट ठेवण्यासाठी करा या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
सध्या सामोरं जात असलेल्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागणार याची काही कल्पना नाही. न्यू नॉर्मलमध्ये आपापली कामं पूर्ण करताना आरोग्याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या फिट राहणं आणि आरोग्याची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे. आरोग्याची घडी योग्य बसवण्यासाठी फार मोठे बदल करण्याची आवश्यकता नाही.

जीवनशैलीत काही मोजके बदल केल्यानं तुमचं आरग्य उत्तम राहू शकतं. शरीरात ऊर्जा कायम राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणं, झोपेच्या वेळा पाळणं यासोबतच व्यायाम करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. स्नायूंना बळकटी आणण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…
(Shanka Prakshalana शंख प्रक्षालन क्रिया करण्याची पद्धत, जाणून घ्या याचे लाभ)

​चालत राहा

चालणं हा उत्तम व्यायाम आहे, असं तज्ज्ञ सांगतात. शिवाय चालल्यानं शरीरातील ऊर्जा वाढते. दिवसभरात किती चालायला हवं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. अशा वेळी पंधरा मिनिटांपासून सुरुवात करावी. तुमच्या शरीरयष्टीनुसार चालण्याचा कालावधी दररोज पाच मिनिटांनी वाढवा. महिन्याभरात चालण्याचा कालावधी किमान ३० मिनिटं करा. चालल्यानंतर स्ट्रेचिंगचे व्यायाम करायला विसरू नका.

(शांत झोप हवीय? मग या ७ गोष्टी कायम ठेवा लक्षात)

​स्नायूंना बळकटी आणण्यासाठी

थोडं जड सामान उचलल्यानंतर स्नायूंना सूज येते, अशा तक्रारी बरेच जण करतात. शरीर मजबूत होण्यासाठी स्नायूंना देखील बळकट करणं गरजेचं आहे. हात, पाय, पाठ यांचे स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. खुर्ची, पाण्याची बाटली, लहान टेबल यांच्या मदतीनं तुम्ही व्यायाम नक्कीच करू शकता.

(अपचनामुळे त्रस्त आहात? समस्या दूर करण्यासाठी वाचा ही फायद्याची माहिती)

​पायासाठी व्यायाम

पायाचे स्नायू बळकट असणं खूप महत्त्वाचं आहे. पायांची अथवा गुडघ्यांची समस्या असणाऱ्यांना डॉक्टर पायाचे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. पायाचा व्यायाम करण्यासाठी सर्वात आधी खुर्चीच्या मध्यभागी बसा. पाठ खुर्चीला चिकटू नका. यानंतर पाय सावकाशपणे वर आणा. सवय नसणाऱ्यांना आधी थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. पाय वर आणल्यानंतर गुडघ्यातून वाकवत पोटाकडे आणण्याचा प्रयत्न करा. हे करताना डोकं आणि पाठ पुढे वाकवा. या व्यायामामुळे पाय, पाठ आणि पोटाच्या स्नायूंचा उत्तम व्यायाम होतो. या व्यायामाची आठ वेळा पुनरावृत्ती करा.

(Weight Loss Tips ५ दिवसांत कमी होईल बेली फॅट, फॉलो करा या सोप्या ट्रिक्स)

​खांद्यासाठी व्यायाम

ताठ उभे राहा. हात खांद्याच्या सरळ रेषेत ठेवा. दोन्ही हातात समान वजन असणारी वस्तू घ्या. वस्तू घट्ट पकडा आणि दोन्ही वजनं एकामागोमाग एक जमिनीला टेकवण्याच्या प्रयत्न करा. या वर्कआउटदरम्यान खांदा सैल असायला हवा. हा व्यायाम आठ वेळा करावा. तुमच्या शरीराला सहन होईल इतकंच वजन उचला. हा व्यायामप्रकार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(वजन घटवण्यासाठी आरोग्यवर्धक आहेत फळांच्या या ३ स्मूदी, पोटावरील चरबी होईल कमी)

​कंबरेसाठी व्यायाम

खांद्याच्या व्यायामसारखेच असणारे कंबरेचे व्यायाम करण्यासाठी खुर्चीची मदत घ्या. सर्वप्रथम खुर्चीवर बसा. दोन्ही हातात समान वजन असणारी वस्तू घ्या. वजन असलेला हात आधी उजव्या बाजूस जमिनीकडे झुकवा. मग नंतर डाव्या बाजूस झुकवा. प्रत्येक बाजूला सहा वेळा पुनरावृत्ती करा.

(Weight Loss Story या व्यक्तीचे वजन होते १०२Kg, असं घटवलं १२Kg वजन)

​हाडांसाठी आवश्यक

खुर्चीच्या मागे उभे राहा. दोन्ही हात खुर्चीवर ठेवा. गुडघे वाकवा आणि उडी मारा. उडी मारताना प्रत्येक वेळी गुडघे वाकवणं गरजेचं आहे. हा व्यायाम बारा वेळा करावा. युट्यूबवर हाडांच्या व्यायामाचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत, त्यांची मदत घेऊ शकता.

(मेंदूच्या आरोग्यासाठी या १० फायदेशीर गोष्टींचा करा सराव)

​पाठीसाठी वॉल प्रेस अप

हात, मान आणि पाठ यांचा एकत्रित व्यायाम होण्यासाठी वॉल प्रेस अप उत्तम पर्याय आहे. हा व्यायाम करण्यासाठी भिंतीपासून अर्धा मीटर अंतर ठेवून उभे राहा. हाताच्या स्नायूंवर ताण येईल अशाप्रकारे भिंतीवर हात ठेवा. संपूर्ण शरीर ताठ असू द्या. हात कोपऱ्यापासून वाकवा आणि छाती भिंतीजवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि मूळ स्थितीत परत या. हा व्यायामप्रकार आठ वेळा करा.

(मनगटदुखीच्या समस्येचा सामना करत आहात? खबरदारीचे ४ उपाय)

संकलन- तेजल निकाळजे, साठये कॉलेज

Note व्यायाम किंवा योगासनांचा सराव करण्यापूर्वी आपल्या ट्रेनरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारच्या दुखापती होऊ नये, यासाठी प्रशिक्षकासमोरच किंवा त्यांच्या मार्गदर्शनानंतरच व्यायाम करणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *