Health Care Tips आत्मविश्वास वाढण्यासाठी या चुका करणं टाळा

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
आत्मविश्वास (confidence) आपल्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वपूर्ण पैलू असतो. तो डळमळला की पुढची सगळी गणितं चुकतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल अशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे किंवा सवयी बदलल्या पाहिजेत. आपण अनेक कौशल्यांमध्ये निपुण आहोत म्हणजे इतरांपेक्षा वरचढ आहोत अशीही अनेकांची गैरसमजूत असते. त्यामुळे अशा व्यक्ती लगेच हुरळून जातात. काही व्यक्ती ध्येयपूर्तीनं इतके झपाटलेले असतात की, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि ध्येयपूर्तीला वेग मिळतो. ध्येय गाठण्यापासून विचलित होणाऱ्या गोष्टींचा करण्यात किंवा त्याचा विचार करण्यात वेळ घालवत नाहीत. आत्मविश्वास कमी करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या करणं कसं टाळता येऊ शकतं याविषयी…

१ आपल्याबद्दल काय विचार करतात?

सहकारी, मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीतली मंडळी आपल्याबद्दल काय विचार करतात याची कित्येकांना काळजी वाटते. याचा सतत विचार केला तर चांगल्या गोष्टी करण्यापासून मागे राहतो. एखादी व्यक्ती आपल्याबद्दल अमुक प्रकारे विचार करते याची काळजी करत बसलो तर आत्मविश्वास कमी होतो. यामुळे टीका किंवा नकार पत्करावा लागतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीसाठीच्या मुलाखतीसाठी गेलेला असता. मुलाखत घेणारी व्यक्ती तुमचा मित्र किंवा ओळखीतली निघते. अशा व्यक्तींशी बोलताना तुम्ही हातचं राखून बोलता. त्यामुळे मुलाखतीत शंभर टक्के देता येत नाही. कारण तुमचा आत्मविश्वास कमी झालेला असतो.
(Health Care Tips आर्ट थेरपीशी गट्टी फायदेशीर!)

२. अति विचार करणं


कोणत्याही गोष्टीचा अति विचार करणं मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं घातकच असतं. तसंच यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. मानसिकरित्या सुदृढ असलेले लोक कधीच जास्त विचार करण्यात ऊर्जा वाया घालवत नाहीत. उलट ज्या विचारांनी त्यांचा फायदा होईल ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा जोखीम पत्करावी लागते. अशा वेळी योग्य विचार करणाऱ्या व्यक्ती यशस्वी ठरतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
(Health Care मूड चांगला राहण्यासाठी करा या ७ गोष्टी)

३. स्वतःला दोष देणं


मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली मंडळी कोणतंही काम पूर्ण जबाबदारीनं स्वीकारतात. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हटलं जातं. त्यामुळे अपयश आलं तर काही व्यक्ती उगाच स्वत:ला दोष देत बसत नाहीत. तसं करणं त्यांच्या लेखी निरुपयोगी आणि आत्मविश्वास कमी करणारं असतं. वेळोवेळी स्वतःला माफ करून किंवा मनाची समजूत काढून पुढे कसं जाता येईल याचा विचार करतात.

४. जर-तरमध्ये अडकणं

जर असं असतं तर मी असं केलं असतं. जर मला अमुक एक गोष्ट मिळाली असती तर मी तसं केलं असतं, यामध्ये अनेक जण अडकलेले असतात. सतत याचा विचार करण्यात वेळ वाया घालवतात. यामुळे आत्मविश्वास कमी होतोच शिवाय आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. कदाचित पालकांनी आपल्याला अजून चांगली वागणूक दिली असती, मालकानं आपल्याला जास्त काम करायला लावले नसते, असा विचार करण्यात वेळ घालवणं चुकीचं आहे. त्यापेक्षा हातात असलेल्या वेळेत कामं करुन मोकळं झालं पाहिजे. तसंच जर-तरचा विचार करत बसल्यानं वस्तुस्थिती बदलत नाही. उलट वेळ आणि ऊर्जा वाया जाते. म्हणून आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करुन पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे.
(Health Care शरीर फिट ठेवण्यासाठी करा या ७ महत्त्वाच्या गोष्टी)

५. नकारात्मक विचार करणं


माझ्यासोबत किती वाईट झालं, याचा विचार करणारी अनेक मंडळी आपल्या अवतीभोवती असतात. आपल्यावर संकट ओढवण्याची किंवा वाईट प्रसंगाना सामोरं जाण्याची भीती अनेकांना सतावत असते. असा नकारात्मक विचारांचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. संकटाला कशा प्रकारे सामोरं जाता येईल याचा विचार करायला हवा.
(पोटावर झोपण्याची सवय आहे? या ६ समस्या उद्भवण्याची शक्यता)

६. मदत करणाऱ्याची तक्रार करणं


आत्मविश्वास कमी असलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी अनेक जण धावून आल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण काही मंडळी मदत करणाऱ्यांची तक्रार करण्यात वेळ घालवतात. असं न करता प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बघता आली पाहिजे.

७. भूतकाळाचा विचार करणं

सर्वात नकारात्मक आणि आत्मविश्वास कमी करणारी गोष्टी म्हणजे भूतकाळाचा विचार करणं. गत जीवनात घडलेल्या नकारात्मक गोष्टींचा आणि झालेल्या चुकांचा विचार करत बसणारी अनेक मंडळी आहेत. अशा व्यक्ती मानसिकदृष्ट्या अशक्त असतात. यामुळे मनात वाईट आणि नकारात्मक विचार घोळत राहतात. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर असं करणं प्रकर्षानं टाळलं पाहिजे. भूतकाळाचा जास्त विचार न करता भविष्याचा विचार केला पाहिजे.

संकलन- कौस्तुभ तिरमल्ले, कॉलेज क्लब रिपोर्टर


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *