Health Care Tips आर्ट थेरपीशी गट्टी फायदेशीर!

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
आर्ट थेरपी तणाव दूर करून तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी मदत करते. तुम्हाला आर्टबाबत म्हणावा तसा अनुभव किंवा माहिती गाठीशी नसली तरीही तुम्ही आर्ट थेरपी सहजतेने करू शकता. आर्ट थेरपीचे विविध प्रकार आहेत. शारीरिक समस्या असलेल्या व्यक्तींसाठी कलर थेरपीचा खूप उपयोग होतो, तर सकारात्मकता वाढवण्यासाठी मंडाला थेरपी उपयुक्त ठरते. आजच्या कार्पोरेट युगात कामात लक्ष न लागणं, तणाव येणं, स्वतःकडे दुर्लक्ष होणं अशा अनेक समस्या दिसून येतात.

पण, आर्ट थेरपीमुळे काम करण्याचा वेग, एकाग्रता यासारख्या गोष्टींमध्ये सुधारणा होतात आणि तणावदेखील कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात. तणावग्रस्त आणि नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला आर्ट थेरपीची मदत झाली. आर्ट थेरपीमुळे मूड चांगला झाला आणि आनंद मिळाला, असं मत आर्ट थेरपीचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींनी नोंदवलं.
(Health Care मूड चांगला राहण्यासाठी करा या ७ गोष्टी)

​थेरपी फायदेशीर

आर्ट थेरपीमुळे ‘माइंडफुलनेस’ वाढण्यास मदत होते, असं मत तज्ज्ञ सांगतात. माइंडफुलनेस म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादं काम करत असताना पूर्णपणे त्या कामावर लक्ष केंद्रित करता येण्याची क्षमता. त्यामुळे आर्ट थेरपी केल्यास तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. आजूबाजूला कितीही लक्ष विचलित करणारी परिस्थिती असली तरीही तुम्ही पूर्णपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता.

(मेंदूच्या आरोग्यासाठी या १० फायदेशीर गोष्टींचा करा सराव)

तज्ज्ञांचं मत

लॉकडाउनदरम्यान बाहेरच्या तणावपूर्ण परिस्थितीसोबतच नोकरीसंबंधित असुरक्षितता, आर्थिक अडचणी यासारख्या अनेकविध समस्यांचा सामना बऱ्याच जणांना करावा लागला. अशा वेळी मनावर ताण जाणवणं स्वाभाविक होतं. पण, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी आर्ट थेरपी अनेकांच्या मदतीला धावून आली, असं तज्ज्ञ सांगतात.

(Exercise Tips वयानुसार असू द्या व्यायामाचं प्रमाण)

​करा कलेशी मैत्री

कामातून लक्ष विचलित होतंय किंवा तणाव जाणवतोय असं वाटल्यास काहीवेळ आर्ट ब्रेक घ्या. कलेशी मैत्री करा. यावेळेत तुम्ही डुडल्स, डिझाइन्स काढणं, चित्र काढणं, चित्र रंगवणं यासारख्या विविध गोष्टी करून पाहू शकता. कलेशी मैत्री केल्यानं तुम्हाला आनंदी वाटेल आणि तुम्ही घेतलेला आर्ट ब्रेक निश्चितच सत्कारणी लागेल.

(Diet Plan Tips आहारात घटकांचा साधा समतोल)

​सोप्यापासून करा सुरूवात

आर्ट थेरपी ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असली तरीही तुम्ही सुरुवात सोपी आणि सहज करू शकता, असं तज्ज्ञ सांगतात. यामध्ये पेंटिंग, हस्तकला, कोलाज, क्लेपासून कलाकृती करून पाहणं यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश करता येईल. तणाव, नैराश्य या सर्व गोष्टींना दूर करून मनाला उभारी देण्यासाठी तुम्ही विविध आर्ट प्रकार करून पाहू शकता. यापैकी काही आर्ट प्रकार पुढीलप्रमाणे…

(तुम्ही योग्य पद्धतीने श्वास घेताय? श्वासोच्छवासाचे सोपे ६ व्यायाम प्रकार)

​डोळे बंद करा अन्…

यामध्ये डोळे मिटून एका कागदावर तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे काहाही रेखाटा. ते करताना जास्त विचार करू नका. ही प्रक्रिया मुक्तपणे होऊ द्या. यानंतर तुम्ही काढलेलं चित्र रंगवा. याला फ्री मूव्हमेंट ड्रॉइंग असं म्हणतात.

(Time Management प्राधान्यक्रम ठरवा, नियोजन करा!)

​मनातलं उतरवा कागदावर

आर्ट जर्नलिंग करताना सर्वप्रथम तुमच्या मनात एखादी गोष्ट ठरवा. समजा उत्साह ही गोष्ट तुम्ही ठरवली असेल तर त्या गोष्टीवर आधारित तुमच्या मनात येईल ते चित्र कागदावर रेखाटा. ते चित्र पूर्ण झाल्यावर कसं दिसेल याचा अजिबात विचार करू नका. ते चित्र काढताना तुम्हाला कसं छान वाटतंय यावर लक्ष केंद्रित करा. आर्ट जर्नलिंग रोज अर्धा तास केल्यास उत्तम ठरेल. आर्ट जर्नलिंगमुळे तुमच्या मन:शांती मिळेल आणि आनंदी वाटेल.

(शांत झोप हवीय? मग या ७ गोष्टी कायम ठेवा लक्षात)

​मंडालाची साथ

मंडाला म्हणजे गोलाकार आकारात काढलेली विविध डिझाइन्स. मंडालामुळे तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटण्यास मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात. पारंपरिक मंडालामध्ये भौमितिक आकारांचा वापर केला जातो. या विविध गोष्टींसोबत तुम्ही बॉडी मॅपिंगदेखील करू शकता. बॉडी मॅपिंगमध्ये साधारणपणे तुमच्या मनातील एखादी कल्पना मांडण्यासाठी जर रंगांची मदत घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही कोणता रंग वापराल हा विचार केला जातो.

संकलन- केतकी मोडक, विद्यार्थिनी कॉलेज

(Health Care शरीर फिट ठेवण्यासाठी करा या ७ महत्त्वाच्या गोष्टी)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *