Health Care Tips ऐश्वर्या राय-बच्चनच्या फिटनेसचं ‘हे’ आहे सीक्रेट

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय – बच्चन (Aishwarya Rai Bachchan) मोहक सौंदर्य, प्रतिभा आणि शानदार अभिनयासाठी ओळखली जाते. ऐश्वर्या रायने मोठ्या पडद्यावर आतापर्यंत कित्येक दमदार भूमिका साकारल्या आहेत. एकेकाळी ऐश्वर्या रायचा ‘ग्लॅमरस डॉल’ म्हणून उल्लेख केला जात असे. या अभिनेत्रीनं वयाची ४०शी ओलांडली आहे, पण आजही फिटनेस आणि सौंदर्य पाहता तिच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण ठरते.

ऐश्वर्याला जिममध्ये जाणं पसंत नाही
अ‍ॅशला जिममध्ये जाऊन वर्कआउट करणं पसंत नाही. आता तुम्ही म्हणाल की जिमशिवाय ऐश्वर्या इतकी फिट कशी काय राहू शकते? तर याचे उत्तर आहे योगासने आणि पौष्टिक डाएट. योग आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत ती किचिंतसेही दुर्लक्ष करत नाही. ऐश्वर्या आपल्या दिवसाची सुरुवात योगासनाच्या अभ्यासानं करते. तर डाएट चार्ट फॉलो करणं हे आपल्या रुटीनचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्याचे ती मानते.
(चालण्याचा व्यायाम कोणत्या वेळेस करणं आरोग्यास असते अधिक फायदेशीर? जाणून घ्या)

​ऐश्वर्या रायचे फिटनेस रुटीन

 • जॉगिंग आणि ब्रिस्क वॉकनंतर दररोज ४५ मिनिटांसाठी योगाभ्यास करत असल्याची माहिती ऐश्वर्या राय – बच्चनने एका मुलाखतीत सांगितले होती.
 • अगदीच आवश्यकता वाटल्यास ती आठवड्यातून दोनदा जिममध्ये जाते.
 • अ‍ॅश कधी- कधी घरातच कार्डियो एक्सरसाइज करते. याव्यतिरिक्त आपल्या योग सेशनमध्ये ती पॉवर योगचाही सराव करते.

(अक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट ‘या’ पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत)

​ऐश्वर्याचे डाएट रुटीन

 • ऐश्वर्या आपल्या दिवसाची सुरुवात एका हेल्दी पेयाने करते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून तयार केलेले पेय ती पिते. दिवसाचे वेळापत्रक कितीही व्यस्त असले तरी ऐश्वर्या आठवणीने नाश्ता करते. निरोगी जीवनशैली आणि फिटनेससाठी सकाळचा नाश्ता करणं आवश्यक आहे, असं तिचं म्हणणंय.
 • ऐश्वर्याच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर युक्त खाद्यपदार्थांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या डाएटमुळे शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते.

(इंटरव्ह्यू आणि परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हालाही ‘हा’ त्रास होतो का? जाणून घ्या कारण)

​हे खाद्यपदार्थ आहारातून वर्ज्य

 • फास्ट फूड, तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाणे ऐश्वर्या टाळते. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात.
 • कारण या खाद्यपदार्थांद्वारे आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. ज्यामुळे शरीरात आळस निर्माण होतो आणि आपल्या पचनसंस्थेवरही दुष्परिणाम होतात. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य आणि सौंदर्यावरही होतो.

(भुजंगासनाची पारंपरिक पद्धत माहीत आहे? हे ६ लाभही जाणून घ्या)

​ऐश्वर्याला आवडते अशा प्रकारचे भोजन

 • ऐश्वर्या एकाच वेळेस भरपूर प्रमाणात खाद्यपदार्थांचे सेवन करत नाही. तर ती थोड्या- थोड्या अंतराने पौष्टिक पदार्थ खाते.
 • अशा पद्धतीने अन्नपदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला अधिक लाभ मिळतात. कारण शरीराच्या पचनसंस्थेला आपण खाल्लेल्या अन्नाचे योग्य रितीने पचन आणि त्याचे शोषण करण्यास मदत मिळते.
 • या प्रक्रियेद्वारे आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांतील पोषक घटकांचा पुरवठा संपूर्ण शरीराला होतो.

(पचनाशी संबंधित समस्येमुळे त्रस्त आहात का? कोणत्या वेळेस ताक पिणं ठरेल योग्य)

​दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात काय असते?

 • ऐश्वर्याला कोशिंबीर, उकडलेल्या भाज्या, डाळ आणि पोळी खायला आवडते. तिच्या दुपारच्या जेवणामध्ये अशा स्वरुपातच खाद्यपदार्थांचा समावेश असतो.
 • तर रात्रीच्या जेवणामध्ये ऐश्वर्या अतिशय हलका – फुलका आहार घेणे पसंत आहे. रात्रीच्या जेवणात कोशिंबीर, उकडलेल्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असतो. महत्त्वाचे म्हणजे ऐश्वर्या रात्रीचे जेवण वेळेतच जेवते.
 • रात्री उशिरा जेवणे आरोग्यासाठी हानिकारक असते, त्यामुळे डॉक्टरांकडूनही दुपारचे तसेच रात्रीचे जेवण वेळत जेवण्याचा सल्ला वारंवार दिला जातो.

(भूक लागल्यानंतर या ३ सूपचा घेऊ शकता आस्वाद, जाणून घ्या ही माहिती)

NOTE तुम्हाला आपल्या आहारात काही बदल करावयाचे असल्यास आपल्या ओळखीच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दुसऱ्या व्यक्तीचे डाएट प्लान फॉलो करू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *