Health Care Tips फुफ्फुसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या ११ गोष्टी ठेवा लक्षात

Spread the love

श्वसनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी आपली फुफ्फुसं निरोगी असणं आवश्यक आहे. एकीकडे करोनापासून बचाव म्हणून मास्क घातल्यामुळे अनेकांना श्वास कोंडल्यासारखं वाटतं तर दुसरीकडे प्रदूषणामुळे अनेकांना श्वास घेताना त्रास होतो. फुफ्फुसांचं आरोग्य जपायचं असेल तर कशा प्रकारे काळजी घेणं आवश्यक आहे, याची माहिती आजच्या लेखातून घेऊ या.

मास्क एक, फायदे अनेक

 • मास्क घातल्याने करोनाच्या विषाणूंपासून बचाव होण्याची शक्यता वाढतेच, शिवाय हवेतील प्रदूषण आणि खास करून धुलिकणांपासूनसुद्धा आपलं संरक्षण होतं.
 • मास्क तीन स्तरांचा असेल तर उत्तम. मास्क वापरताना तुमचं नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाणं आवश्यक आहे.
 • कापडाचे ३-४ मास्क तयार करून ते आळीपाळीने वापरू शकता.
 • मास्क पारदर्शी नसावा. अशा मास्कमुळे शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांपासून आपला बचाव होतो. पण, हवेतील प्रदूषणांपासून अशा प्रकारचे मास्क आपलं संरक्षण करू शकत नाहीत.
 • रुमाल किंवा ओढणी वापरून करोना पसरवणाऱ्या थेंबांपासून आपला बचाव होऊ शकतो. पण, प्रदूषणापासून आपला बचाव करण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग होणार नाही.

​घरातील हवा ठेवा स्वच्छ

घराच्या खिडक्या बंद ठेवा. घरामध्ये मेणबत्ती, लाकूड, धूप किंवा उतबत्ती जाळणं टाळा. वेळोवेळी ओल्या फडक्याचा वापर करून घर स्वच्छ करा. प्रदूषण जास्त असल्यास दिवसातून तीन ते चार वेळा घर ओल्या फडक्याने पुसा. जेणेकरून, धोकादायक धुलिकणांपासून घराचं संरक्षण होईल. बाहेर जर खूप जास्त प्रदूषण असेल तर घराचे दरवाजे, खिडक्या शक्य तेव्हा बंद ठेवा.

(फिटनेससाठी लाइफस्टाइलमध्ये कोणते बदल करणं ठरेल लाभदायक? जाणून घ्या)

​या बाबींची विशेष काळजी घ्या

 • एसीचा वापर करणं टाळावं. पंख्याचा वापरसुद्धा आवश्यकतेनुसारच करावा.
 • अनेकजण झोपताना खिडक्या उघड्या ठेवतात. त्यामुळे बाहेरची थंड हवा घरात येऊन खोलीचं तापमान कमी होऊ शकतं.
 • सकाळी उठल्यावर कोमट पाण्यानं गुळण्या करा. त्यानंतर मोहरीच्या तेलानं गुळण्या करा. त्यामुळे हिरड्या मजबूत होतात. तसंच संसर्गापासून बचाव होण्यास मदत होते.
 • पाणी आणि तेलाने गुळण्या केल्यावर पाच ते दहा मिनिटांनी १०-१५ मिनिटांपर्यंत अनुलोम-विलोम आणि कपालभाती करू शकता.

(Health Care गुडघ्यांचे स्नायू मजबूत करण्यासाठी या आसनाचा करा सराव)

​बाहेरून आल्यावर…

जर बाहेरून आल्यावर कोणाला घशामध्ये खवखव जाणवत असेल किंवा थोडा खोकला येत असेल तर एक ग्लास दुधामध्ये पाव चमचा हळद, दोन ते तीन तुळशीची पानं, २-३ लवंग, अर्धा इंच दालचिनी, २-३ काळ्या मिऱ्या टाकून उकळून घ्या. मधुमेह नसल्यास साखर किंवा गूळ सुद्धा वापरू शकता. दहा मिनिटं उकळल्यावर हा काढा गरम असतानाच प्या.

(डिटॉक्स डाएट म्हणजे काय? याचे शरीरावर होणारे महत्त्वाचे परिणाम जाणून घ्या)

​बाहेर जाताना…

 • सध्या थंडी कमी जाणवत असली तरीही बाहेर जाताना तुमचं शरीर पूर्ण झाकलं जाईल असे कपडे घाला.
 • बाहेर जाताना नाकपुड्यांना मोहरी किंवा तिळाचं तेल लावा.

घरात झाडं लावा

घरात कोणती झालं लावावीत आणि त्याचे फायदे काय याची माहिती पुढीलप्रमाणे…

 • पीस लिली- यामुळे हानिकारक धुलिकणांपासून बचाव होतो.
 • रबराचं झाड- वातावरणामध्ये मिसळणाऱ्या हानिकारक घटकांपासून बचाव करतं.
 • मनी प्लांट- हवेच्या शुद्धीकरणासाठी फायदेशीर.
 • तुळस- हवेतील कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायॉक्साइड शोषून घेते.

(व्यायामाला नव्यानं सुरुवात करताना या ५ सोप्या प्रकारांची घ्या मदत)

​फुफ्फुसांची क्षमता वाढवण्याचे पाच मार्ग

पुरेशी झोप आणि योग्य आहार- प्रत्येक व्यक्तीने दररोज सात ते आठ तास झोप घेणं आवश्यक आहे. आहारामध्ये कार्बोहायड्रेट-भात किंवा पोळी, प्रोटीन-डाळ, फॅट्स- मोहरीचं तेल किंवा साजूक तूप, जीवनसत्व- हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा समावेश करावा. प्रत्येक आहारामध्ये प्रथिनांचा जरूर समावेश करावा.

– हंगामी फळं आणि भाज्या- यांचा आहारामध्ये जरूर समावेश करावा. दररोज कमीतकमी दोन ते तीन वाट्या हिरव्या भाज्या आणि दोन फळांचा आहारात समावेश करावा.

– काढा – हिवाळ्यामध्ये काढा पिणं फायदेशीर ठरतं.

(हिवाळ्यात वजन घटवणे होईल सोपे, जाणून घ्या ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंतचा डाएट प्लान)

​सूर्यप्रकाश महत्त्वाचा

शरीरामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता असल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये सकाळी ९ ते १२ या वेळेत ३०-३५ मिनिटांसाठी आणि उन्हाळ्यामध्ये सकाळी ८ ते ११ या वेळेत ३० ते ३५ मिनिटांसाठी सूर्यप्रकाशात उभं राहणं फायदेशीर ठरेल.

– योग आणि व्यायाम- दररोज सकाळी २० ते २५ मिनिटं योग आणि व्यायाम करणं फायदेशीर ठरतं.

संकलन- राहुल पोखरकर, ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

(Health Care Tips किती मिनिटे करावा मॉर्निंग वॉक? नियमित व्यायाम केल्यास आरोग्याला मिळतील हे लाभ)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *