Health Care Tips ‘व्हिटॅमिन सी’चे अधिक सेवन केल्यास आरोग्यावर होऊ शकतात हे दुष्परिणाम

Spread the love

​‘व्हिटॅमिन सी’मुळे शरीरावर कसे होतात परिणाम?

पोषक तत्त्वांचा साठा असल्याने ‘व्हिटॅमिन सी’ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’चे सेवन केल्यास शरीरावर दुष्परिणाम होण्याचीही शक्यता असते. जर आपण नियमित एक हजार मिलीपेक्षा अधिक प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’चे सेवन केले तर जुलाब, उलटी, छाती जळजळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि निद्रानाश यासारख्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. साधारणतः महिलांनी ७५ मिलीग्रॅम आणि पुरुषांनी ९० मिलीग्रॅम या प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’चे नियमित सेवन करावे.

(मासिक पाळीच्या वेदनांमधून सुटका मिळवण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक पद्धत)

​शरीरासाठी ‘व्हिटॅमिन सी’ का आहे आवश्यक?

कोलेजनचे उत्पादन वाढवण्यामध्ये व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. व्हिटॅमिन सीमुळे सांध्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. सोबत शारीरिक जखमा देखील जलदगतीने ठीक होतात. याव्यतिरिक्त अन्य शारीरिक कार्यप्रणाली सुरुळीत सुरू राहण्यासाठीही व्हिटॅमिन सी आवश्यक आहे.

(थंडीमध्ये अश्वगंधाचा चहा पिण्याचे हे आहेत मोठे फायदे, जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत)

​रक्तदाब नियंत्रणात राहतं

‘व्हिटॅमिन सी’मुळे रक्तवाहिन्यांचे कार्य अडथळ्याविना सुरू राहते. हृदयाला योग्य पद्धतीने रक्ताचा पुरवठा देखील होतो. यामुळे रक्तदाबाची समस्याही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सीच्या सेवनामुळे वयोवृद्धांमधील सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होतं. यामुळे स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अन्य समस्यांचाही धोका कमी होतो.

(काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती)

​तणाव कमी होतो

शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण झाल्यास तणावाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात व्हिटॅमिन सी युक्त आहाराचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यास मदत मिळते आणि आरोग्य निरोगी देखील राहते.

(हृदय विकार दूर ठेवण्यासाठी नियमित खा दोन अक्रोड, जाणून घ्या अन्य आरोग्यदायी लाभ)

​कोलेजन वाढते

त्वचेचं आरोग्य निरोगी ठेवण्यामध्ये कोलेजन महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. व्हिटॅमिन सीमुळे कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.

(Health Care Tips किती मिनिटे करावा मॉर्निंग वॉक? नियमित व्यायाम केल्यास आरोग्याला मिळतील हे लाभ)

​लोहाची कमतरता भरून निघते

शरीराच्या कित्येक क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लोह (Iron) अतिशय आवश्यक असते. लोहाचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.

(उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? किडनीचं आरोग्य जपणं का आहे आवश्यक ? जाणून घ्या)

​रोगप्रतिकारक शक्ती वाढते

व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते. बहुतांश लोक व्हिटॅमिन सीयुक्त आहाराचे नियमित सेवन करतात. यामुळे शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वाढतात. ज्या संसर्गाविरोधात लढण्याचे कार्य करतात आणि आपल्या शरीराचे आजारांपासून संरक्षण देखील करतात. ‘व्हिटॅमिन सी’ आरोग्यासाठी पोषक आहे. पण कोणत्याही गोष्टीचे मर्यादित स्वरुपात सेवन केल्यासच लाभ मिळतात. अन्यथा आरोग्यास अपाय होण्याचीही शक्यता असते. यानुसार आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास आरोग्यास हानी देखील पोहोचू शकते, हे कायम लक्षात ठेवा.

(डायबेटिक फुट म्हणजे नेमके काय? जाणून घ्या आजाराची कारणे व धोका)

NOTE डाएटमध्ये कोणत्याही पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी किंवा डाएट प्लान बदलण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *