Health Care Tips शरीरामध्ये ही ५ लक्षणे आढळल्यास करून घ्या मधुमेहाची तपासणी

Spread the love

बदलत्या जीवनशैलीमुळे तसंच खाण्यापिण्याच्या सवयीवर आपले आरोग्य अवलंबून असते. पौष्टिक आहाराचा अभाव, व्यायाम न करणं यामुळे आजारांची लागण होण्याची शक्यता असते. हल्ली बहुतांश जण मधुमेहाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. खूप कमी वयातील लोकांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजे मधुमेह (Diabetes).

पण जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक आहाराचे सेवन आणि नियमित व्यायाम केल्यास मधुमेहाचा त्रास नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते. दरम्यान, शरीरामध्ये शर्करेचे प्रमाण वाढू लागते तेव्हा याबाबतचे संकेत आपल्याला मिळतात. योग्य वेळेतच यावर योग्य ते उपचार केले तर भविष्यातील आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवणार नाहीत. जाणून घेऊया मधुमेहाची लक्षणे
(गॅसच्या समस्येमुळे त्रस्त आहात? आरोग्यासाठी या ६ गोष्टी खाणं बंद करणं गरजेचं)

​जास्त प्रमाणात भूक आणि तहान लागणे

शरीरामध्ये शर्करेचे प्रमाण वाढल्यास, अशा परिस्थितीत आपले शरीर जास्त प्रमाणात ग्लुकोजचे उत्पादन करण्यास सुरुवात करते. यासाठी शरीराच्या पेशींमधून पाणी शोषले जाते आणि या पाण्याचा ग्लुकोजच्या उत्पादनासाठी वापर केला जातो. जर हे ग्लुकोज रक्तात मिसळले गेले तर शरीराला पुन्हा ग्लुकोजची आवश्यकता भासते आणि मग ते पुन्हा पेशींमधील पाणी पोषण्याचे काम करतात. हिच प्रक्रिया वारंवार सुरू राहते. याच कारणामुळे शरीरातील शर्करा वाढल्याच्या स्थितीमध्ये भूक आणि तहान जास्त प्रमाणात लागते.

(OCD ओसीडी म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे)

​वारंवार लघवीला होणे

जास्त प्रमाणात तहान लागल्यास सतत पाणी प्यायले जाते. यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजची निर्मिती होत असताना जे अतिरिक्त द्रवपदार्थ असते, ते बाहेर फेकण्यासाठी मूत्रपिंड आपले कार्य सुरू करते. याच कारणामुळे थोड्या- थोड्या अंतराने लघवी येण्याची समस्या निर्माण होते. सोबत यामुळे आपल्या किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

(पाठ, कंबर, पायांच्या दुखण्यापासून सुटका हवीय? करा हे सोपे आसन)

​सतत थकवा जाणवणे

एखाद्या व्यक्तीला थकवा जाणवण्यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात. पण थकवा येणे हे देखील शरीरामध्ये शर्करेचे प्रमाण वाढण्याचेच एक संकेत आहे. तुमची दैनंदिन जीवनशैली सामान्य असल्यास, तसंच तुम्ही जास्त प्रमाणात शारीरिक किंवा मानसिक कार्य करत नसतानाही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्हाला रक्तातील शर्करेच्या प्रमाणावर लक्ष देणे आवश्यक आहे.

(बद्धकोष्ठता किंवा अतिसारामुळे आहात त्रस्त? दोन्ही समस्यांपासून या ड्रायफ्रुटमुळे मिळेल आराम)

​वारंवार यीस्ट इंफेक्शन होणे

ज्या लोकांच्या शरीरामध्ये शर्करेचे प्रमाण वाढत असते, त्यांना यीस्ट इंफेक्शनचाही वारंवार त्रास होत असतो. जर एखाद्या व्यक्तीला या समस्येचा सतत सामना करावा लागत असेल तर त्यांनी अन्य आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसह मधुमेहाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कारण रक्तातील शर्करा वाढल्यानंतर शरीरामध्ये जे बदल घडून येतात, त्यामुळे यीस्ट संसर्ग होण्याची भीती असते. यीस्ट संसर्गाची समस्या महिलांप्रमाणेच पुरुषांनाही होऊ शकते. दरम्यान, ही समस्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळते.

(Tips For Better Sleep शांत झोप हवी असेल तर हे एक काम नक्की करून पाहा)

​रक्तवाहिन्यांचे होते नुकसान

शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर काही पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या निर्माण होते. ही समस्या सामान्य आहे. कारण शर्करेचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूचे भरपूर नुकसान होते. तुम्ही देखील अशा समस्यांचा सामना करत आहात तर आपल्या डॉक्टरांना संपर्क साधून त्यांच्याकडून योग्य वेळेतच मार्गदर्शन घ्यावे.

NOTE : आपल्या आरोग्यास अपाय होऊ नये, यासाठी कोणत्याही प्रकारचे उपाय करण्यापूर्वी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(Supta Vajrasana Benefits अपचनाच्या समस्येमुळे आहात त्रस्त? करा सुप्त वज्रासनाचा सराव)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *