Health Tips तुम्ही आहारामध्ये फक्त पोळीच खाता का? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Spread the love

शरीर निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पौष्टिक आहारामध्ये पोळीचा समावेश असणं आवश्यक आहे. पण काही जण पोळी खायला कंटाळा करतात. पोळीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात, हे तुम्हाला माहिती आहे का? फायबरमुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. गहूव्यतिरिक्त कुट्टू, बाजरी, मका इत्यादी धान्यांपासूनही तुम्ही पोळी तयार करू शकता.

याच्या सेवनामुळे शरीरात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही आणि इन्सुलिन देखील योग्य पद्धतीने कार्य करते. दरम्यान शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ नये, यासाठी आहारातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण देखील कमी करावे परंतु हा घटक पूर्णपणे वगळणे योग्य देखील ठरणार नाही. योग्य प्रमाणात शरीराला कार्बोहायड्रेट्सचा पुरवठा होण गरजेचं आहे. पोळीद्वारे शरीराला पोषक घटकांचा पुरवठा कसा करावा? यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे? जाणून घेऊया माहिती
(पत्नी जेनेलियासह रितेश देशमुखने फिटनेस व अवयवदानासाठी घेतला ‘हा’ निर्णय)

​गव्हातील पोषण तत्त्व

भारतीय आहारामध्ये गव्हाची पोळी आणि भाताचा समावेश असतोच. हे खाद्यपदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेटचा उत्तम स्त्रोत मानले जातात. आपल्यापैकी बहुतांश जण नियमित पोळी आणि भाताचे सेवन करतात. पण जेव्हा शरीर फिट ठेवण्याची वेळ येते तेव्हा दिवसभरात केवळ एकच पोळी का खावी? याचे उत्तर अनेकांना जाणून घ्यायचे असते.

चला जाणून घेऊया माहिती

गव्हाच्या पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त अन्य आवश्यक पोषक तत्त्व देखील असतात. गव्हामध्ये प्रोटीन, फॅट्स, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, फॉलेट आणि लोह हे घटक देखील असतात. पोळीचे सेवन केल्यास संपूर्ण शरीराला आवश्यक पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.

(स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या या आजाराचा सामना करतेय सोनम कपूर, चाहत्यांसोबत शेअर केल्या टिप्स)

दिवसभरात किती पोळ्या खाणे योग्य ठरेल?

कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फॅट्स या तत्त्वांना सूक्ष्म पोषक घटक असेही म्हणतात. शरीरातील विविध कार्ये सुरळीत पार पाडण्यासाठी या घटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक असते. यासाठी सर्व प्रथम तुम्ही नियमित आपल्या आहाराद्वारे किती प्रमाणात कार्बोहायड्रेचे सेवन करता, याची माहिती जाणून घ्या. त्यानुसार आपण दिवसभरात किती पोळ्या खाव्यात, हे ठरवावे.

(आरोग्यासाठी अंडे खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या अंडे शिजवण्याची योग्य पद्धत)

पौष्टिक पोळी

​पोळीतील कॅलरीचे प्रमाण

सहा इंच आकाराच्या पोळीमध्ये जवळपास ७१ कॅलरी असतात. जर दुपारच्या जेवणाद्वारे ३०० कॅलरी पोटात जात असतील तर तुम्ही दोन पाळ्या खाऊ शकता. याद्वारे शरीराला १४० कॅलरी मिळतील आणि उर्वरित कॅलरीचा पुरवठा तुम्हाला भाजी व सॅलडच्या माध्यमातून होईल. अन्य भाज्या आणि फळांमध्येही कार्बोहायड्रेटचा समावेश असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. यानुसार दिवसभरात किती पोळ्यांचे सेवन करावे, याचे गणित ठरवा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

(ऑफिसमध्ये किंवा कमी जागेत पवनमुक्तासन कसे करावे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली पद्धत)

न्याहरीसाठी भाजी आणि पोळी

​पोळीला अन्य पर्याय

जर तुम्हाला गव्हाची पोळी खाण्यास कंटाळा येत असेल तर पर्याय म्हणून बाजरी किंवा ज्वारीच्या पोळीचा आहारात समावेश करू शकता. या पोळ्या गव्हाच्या पोळ्यांच्या तुलनेत अधिक पौष्टिक असतात. यामध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा देखील कमी असते, पण अन्य पोषण तत्त्वांचा साठा जास्त असतो.

(तास-न्-तास एकाच जागी बसून काम करताय का, हृदयाची काळजी कशी घ्यावी?)

​या गोष्टी देखील लक्षात ठेवा

आहारामध्ये केवळ कार्बोहायड्रेटेच प्रमाण कमी करणं आरोग्यासाठी लाभदायक ठरत नाही. यासाठी अन्य गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. आपली जीवनशैली, झोपण्याची- सकाळी उठण्याची वेळ आणि नियमित व्यायाम करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. निरोगी आणि पौष्टिक आहाराच्या सेवनासह या गोष्टींचीही विशेष काळजी घ्यावी.

(Health Care Tips पोट बिघडल्यानंतर खिचडी खाण्याचा सल्ला का दिला जातो?)

NOTE आहारामध्ये कोणतेही बदल करायचे असल्यास त्यापूर्वी आपल्या ओळखीच्या आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतेही उपाय करणं टाळावे.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *