Health Tips: पांढरा कांदा निरोगी आरोग्यासाठी आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे

Spread the love

कांदा हा पारंपरिक भारतीय पाककृतींमधील एक अविभाज्य भाग आहे. पण बहुतांश जण स्वयंपाकामध्ये लाल कांद्याचाच उपयोग करतात. रीसर्चमधील माहितीनुसार, पांढरा कांदा आरोग्यासाठी भरपूर पोषक आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड आणि फायटोन्युट्रिएंटचे गुणधर्म आहेत. कांद्यामध्ये असणारे फ्लेव्होनॉइड कित्येक प्रकारचे आजार उदाहरणार्थ पार्किंसन, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

याव्यतिरिक्त कांद्यामध्ये फायबर, फॉलिक अ‍ॅसिड, अँटी- ऑक्सिडंट्स आणि अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म देखील आहेत. पांढऱ्या कांद्याचे कोणत्याही स्वरूपात सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. बर्‍याच अभ्यासांद्वारे अशीही माहिती समोर आलीय की या कांद्यामध्ये रक्तातील शर्करेची पातळी संतुलित ठेवण्याची क्षमता आहे. औषधोपचाराव्यतिरिक्त पांढरा कांदा चवीला स्वादिष्ट देखील आहे. पांढरा कांदा खाण्याचे फायदे आपण सविस्तर जाणून घेऊया…
(व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? वेळीच ओळखा हा धोका : तज्ज्ञांची माहिती)

​पुरुषांसाठी रामबाण उपाय

पांढऱ्या कांद्याचा उपयोग वीर्य वाढीसाठीही केला जाऊ शकतो. पांढऱ्या कांद्याचे मधासह सेवन केल्यास आरोग्यास भरपूर लाभ मिळतात. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे नैसर्गिक स्वरुपात स्‍पर्म वाढवण्याचे कार्य करतात. पण हा उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(भात खाल्ल्याने शरीरावर होतात हे परिणाम, किती प्रमाणात सेवन करणं ठरेल आरोग्यासाठी योग्य?)

​​हृदयाच्या आरोग्याची देखभाल

पांढऱ्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि कम्पाउंड आढळतात. हे घटक शरीरावरील सूज कमी करण्याचे कार्य करतात. तसंच ट्रायग्लिसराइडची पातळी देखील कमी करतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी घटण्यास मदत मिळते. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

(Health Tips पोट आरामात जाईल आतमध्ये, फक्त नियमित करा हे ५ एक्सरसाइज)

​पचनसंस्थेचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे कार्य

फायबर आणि प्रीबायोटिक्सचा उत्तम स्त्रोत म्हणजे पांढरा कांदा. यामुळे आपल्या पोटाचे आरोग्य निरोगी राहते. कांद्यामध्ये प्रीबायोटिक इनुलिन आणि फ्रुक्टो ओलिगोसॅचेराइड्सची मात्रा भरपूर असते. योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आपल्या पोटामध्ये निरोगी बॅक्टेरियांची संख्या वाढण्यास मदत मिळते.

(सॅनिटायझर बर्न्स टाळणे शक्य, तज्ज्ञांच्या माहितीनुसार ‘या’ खबरदारी बाळगणे आवश्यक)

​कर्करोगाशी लढणारे गुणधर्म

पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर, फ्लेव्होनॉइड आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत; ज्यामध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. कांद्यामधील सल्फर, क्वेर्सेटिन फ्लेव्होनॉइड आणि अँटी ऑक्सिडंट ट्युमरची वाढ रोखण्याचे कार्य करतात.

(सायकलिंगला सुरुवात करताय? मग आरोग्यासाठी या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक)

​रक्त पातळ करण्याचे गुणधर्म

पांढऱ्या कांद्यातील औषधी गुणधर्मांमुळे रक्त पातळ होण्यासही मदत मिळते. यामधील फ्लेव्होनॉइड आणि सल्फर शरीरातील रक्त पातळ करण्यास मदत करतात. रक्त पातळ करणारे एजंट किंवा ब्लड थिनर शरीराच्या नसांमध्ये (रक्तवाहिन्या आणि नसा) रक्तप्रवाह सुरळीत सुरू ठेवण्याचे कार्य करतात.

(घोरण्याच्या समस्येपासून हवीय सुटका? झोपण्यापूर्वी या आयुर्वेदिक तेलांचा करा उपयोग)

​रोगप्रतिकारक क्षमता

पांढऱ्या कांद्यामध्ये सेलेनियम शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत करतात. शरीराची ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यामध्ये सेलेनियम महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

  • केसांच्या आरोग्यासाठी

केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी पांढऱ्या कांद्याचा रस एक रामबाण घरगुती उपाय मानला जातो. या रसामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते. तसंच कोंड्याची समस्याही कमी होते.

(चमकदार दात, सुंदर केसांसह मिळतील हे ६ लाभ; तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित खा काळे मनुके)

​रक्तातील शर्करेची पातळी राहते नियंत्रणात

पांढऱ्या कांद्यातील क्रोमियम आणि सल्फर हे घटक रक्तातील शर्करा घटवण्याचे कार्य करतात व शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदतही करतात. जे मधुमेहग्रस्त आहेत किंवा ज्यांना मधुमेहाचा धोका आहे, अशा लोकांसाठी पांढऱ्या कांद्याचे नियमित व मर्यादित स्वरुपात सेवन करणे फायद्याचे आहे; अशी माहिती अभ्यासाद्वारे समोर आली आहे. तसेच यामध्ये आढळणारी क्वेर्सेटिन आणि सल्फर यासारखी काही संयुगे अँटी- डायबेटिक असतात.

(शारीरिक वेदना व सांधेदुखीच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी करा थाय मसाज)

NOTE आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आपल्या डाएटमध्ये बदल करावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *