Health Tips पोट आरामात जाईल आतमध्ये, फक्त नियमित करा हे ५ एक्सरसाइज

Spread the love

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठून नियमित एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. पण पहाटे उठणं सर्वांसाठीच सोपे नसते. उशिरा उठल्याने बहुतांश लोक व्यायामांचा सराव करू शकत नाहीत. ज्यामुळे पोटावर अतिरिक्त चरबी वाढू लागते. याव्यतिरिक्त तुमच्या वाईट सवयींमुळेही शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. शारीरिक नुकसान टाळण्यासाठी नियमित वर्कआउट करणं आवश्यक आहे.

पोट आणि ओटीपोटावर चरबी वाढल्यास आपले शरीर बेढब दिसू लागते. यामुळे कधी-कधी आपल्याला मनाप्रमाणे फॅशनेबल कपडेही परिधान करता येत नाही. तसंच शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यास अन्य शारीरिक समस्यांचाही सामना करावा लागण्याची शक्यता असते. बहुतांश लोक शरीरात वाढणाऱ्या अतिरिक्त चरबीमुळे त्रस्त असतात. यावर त्यांना योग्य तोडगा सापडत नाही. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत आहात का? तर यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण घरच्या घरी पाच सोपे व्यायाम प्रकार करू शकता. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
(आठवड्यातून दोनदा सैंधव मिठाने आंघोळ करण्याचे फायदे, मिळतील हे तीन लाभ)

​प्लँक

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जिममध्ये जाण्याचा कंटाळा येत असेल तर आपण घरच्या घरी प्लँक हा सोपा व्यायाम प्रकार करू शकता.

  • बेडवर पुश-अप पोझिशनमध्ये या आणि हातांचे कोपर ९० अंश डिग्रीमध्ये मोडा. यामुळे शरीराचं वजन तुमच्या हातांवर येईल.
  • कोपर तुमच्या खांद्यांशी समांतर असावेत. आपले हात घट्ट धरून ठेवा. शरीर डोक्यापासून ते पायांपर्यंत सरळ रेषेत असले पाहिजे, हे लक्षात ठेवा.
  • १० ते १५ मिनिटे या पोझिशनमध्ये राहा आणि त्यानंतर रिलॅक्स व्हा. आपल्या कोर कंडिशनिंगसाठी हा व्यायाम प्रकार सर्वोत्कृष्ट आहे.
  • तसंच पोटाचे स्नायू आणि कमरेसाठीही हा एक उत्तम एक्सरसाइज आहे.

(डान्स करा, ताण विसरा! शफल डान्स व हुपिंगचे ‘हे’ आहेत फायदे)

​रोल-अप

रोल अप एक्सरसाइज करण्यासाठी बेडवर किंवा जमिनीवर झोपा. आपले पाय सरळ ठेवा आणि दोन्ही हात सरळ रेषेत आपल्या डोक्याच्या वर न्या. आपल्या पायांच्या बोटांपर्यंत पोहोचण्यासाठी हळूहळू ‘सी’ कर्वमध्ये रोल करा. काही सेकंदांसाठी या पोझिशनमध्ये राहा. यानंतर पुन्हा आरामदायी स्थितीमध्ये या. बेडवर हा एक्सरसाइज करताना त्रास होत असल्यास आपण पाय गादीवरही ठेवू शकता. हा वर्कआउट करताना आपण उशीचाही उपयोग करू शकता.

(झोपेत सुरू आहे का मेसेजिंग? जाणून घ्या आजारामागील कारणे)

​बाइसिकल क्रंच

  • आपल्या पाठीवर झोपा आणि पाय गुडघ्यांमध्ये मोडा. आपले पाय जमिनीवर ठेवा आणि आपले हात डोक्याच्या मागे न्या.
  • कमरेचा भाग जमिनीवरच ठेवा आणि आपल्या पोटाचे स्नायू घट्ट ठेवा.
  • आता आपले डोकं, खांदे आणि पाठ वरील बाजूस उचला.
  • आपला उजवा पाय सरळ ठेवा आणि उजवे कोपर व डावा गुडघा एकमेकांजवळ आणा.
  • यानंतर उजवा गुडघा मागे खेचा आणि डावा पाय सरळ करा. डावे कोपर व उजवा गुडघा एकमेकांजवळ आणा. ही क्रिया काही वेळासाठी करत राहा.
  • सायकल चालवत असल्याप्रमाणे आपल्या शरीराची हालचाल करावी. अ‍ॅब्ससाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे.

(स्मृतीभ्रंश टाळण्यासाठी तरुणपणीच करा हे साधेसोपे उपाय, जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली माहिती)

अ‍ॅब्ससाठी ​V-अप्‍स एक्सरसाइज

-v-

हा व्यायाम प्रकार करण्यासाठी आपल्या पाठीवर झोपा. हात आणि पाय सरळ रेषेत ठेवा. यानंतर आपल्या तळहाताने पायांच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी एका वेळी एकच पाय वर उचलावा. कंबर जमिनीवरच टेकवलेली असावी. आपले हात पायांच्या दिशेनं न्या आणि शरीर V-शेपमध्ये आणा. काही सेकंदांसाठी हा व्यायाम करत राहा. यानंतर आरामदायी स्थितीमध्ये या. अपर आणि लोअर अ‍ॅब्ससाठी हा व्यायाम प्रकार फायदेशीर आहे.

(जास्त राग येणं हे सुद्धा आहे पित्त वाढण्याचे लक्षण, उपाय म्हणून काय खावं व खाऊ नये? जाणून घ्या)

कसा करावा V-अप्‍स एक्सरसाइजचा सराव? पाहा व्हिडीओ

बटरफ्लाय क्रंच

जमिनीवर झोपा आणि दोन्ही पायांचे तळवे एकमेकांजवळ आणा. या स्थितीमध्ये शरीर फुलपाखरांप्रमाणे दिसतं. आपले हात हळूहळू डोक्याच्या मागे घेऊन जा. पोटाच्या स्नायूंना स्ट्रेच देऊन आपले डोक व खांदे वरील बाजूस उचलावेत. दोन्ही हात पुढील बाजूस न्यावेत आणि पुन्हा आपली पाठ जमिनीवर टेकवावी. पाठीच्या हाडांवर दबाव येऊ नये, यासाठी आपण गादीवर झोपूनही हा व्यायाम प्रकार करू शकता. हा थोडासा कठीण व्यायाम प्रकार आहे. NOTE कोणत्याही व्यायाम प्रकारांचा सराव करण्यापूर्वी आपल्या ट्रेनरचा सल्ला घ्यावा. तुमच्या आरोग्याच्या समस्या आणि आवश्यकता जाणून घेतल्यानंतर ट्रेनरकडून तुम्हाला काही एक्सरसाइज सुचवले जातात.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *