Heart Disease Risk आहारामध्ये या पदार्थाचे अतिरिक्त सेवन करू नये, कारण…

Spread the love

आपल्या देशामध्ये आहारात गहूनंतर सर्वाधिक वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. देशभरात वेगवेगळ्या प्रकारे निरनिराळे खाद्यपदार्थ तसंच पक्वान्न तयार करण्यासाठी तांदळाचा आवर्जून वापर केला जातो. देशाच्या पूर्व आणि उत्तर भागांमध्ये ‘तांदूळ’ दैनंदिन आहाराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. म्हणजे या ठिकाणी भाताशिवाय दुपारचे जेवण पूर्ण होऊच शकत नाही. पूर्वीच्या काळातील आरोग्याच्या गरजांनुसार ही सवय ठीक होती, परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार भाताचे अति सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

का केली जातेय अशा प्रकारची चर्चा?

शतकानुशतके तांदूळ हा आपल्या भोजनाचा एक भाग आहे आणि आरोग्यासाठी देखील भात फायदेशीर असतो. मग आहारामध्ये नियमित तांदळाचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकते, अशी चर्चा का सुरू झाली आहे?
(Right Time For Green Tea ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीत आहे का?)

​अभ्यासातील महत्त्वपूर्ण माहिती

आपल्या देशात मधुमेह आणि हृदय विकारांशी संबंधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता त्यांच्या दैनंदिन जीवनावर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार तांदळाचे जास्त सेवन केल्यामुळे आणि शारीरिकदृष्ट्या फार सक्रिय नसल्याने भातामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर तांदळाच्या सेवनावर चर्चा करण्यात येत आहे.

(Evening Exercise And Yoga संध्याकाळी योगासने किंवा व्यायाम करण्याचे फायदे)

​यापूर्वी का होत नव्हते नुकसान?

यावरून तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच डोकावला असेल की, आमच्या आधीच्या पिढ्यांमधील लोक बर्‍याच काळापासून भात खात आहेत, परंतु तरीही त्यांना दीर्घ आयुष्य लाभले आणि महत्त्वाचे म्हणजे ते निरोगी जीवन जगले. अशा परिस्थिती आम्हालाच आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना का करावा लागत आहे? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे आहे. आपल्या दररोज बदलणाऱ्या जीवनशैलीमध्ये शारीरिक श्रम जवळपास नाहीच. पूर्वीची बहुतेक लोक शेती करत असत.

(Health Care Tips शरीरामध्ये ही ५ लक्षणे आढळल्यास करून घ्या मधुमेहाची तपासणी)

​शारीरिक श्रमाचे महत्त्व

पूर्वीची माणसे प्रत्येक दिवशी कित्येक किलोमीटर पायी चालत असते. कारण त्या काळी प्रवास करण्यासाठी आताप्रमाणे वाहने उपलब्ध नव्हती. जास्त प्रमाणात होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळे शरीराचे आरोग्य आणि पचन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने कार्य सुरू राहते. या तुलनेत आज आपल्या शारीरिक हालचाली करण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. सोबतच तांदळामध्ये आर्सेनिक नावाच्या घटकाचे प्रमाण अधिक असते. हा घटक हृदयसंबंधित विकारांची लागण होण्यास कारणीभूत ठरतो.

(बद्धकोष्ठता किंवा अतिसारामुळे आहात त्रस्त? दोन्ही समस्यांपासून या ड्रायफ्रुटमुळे मिळेल आराम)

​तांदळामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर आजार

मॅनचेस्टर आणि सलफोर्ड विद्यापीठातील संशोधकांना त्यांनी केलेल्या संशोधनात अशी माहिती आढळली आहे की, ज्या ठिकाणी शेतकरी भाताची लागवड करतात त्या ठिकाणी मातीमध्ये आर्सेनिकची मात्रा अधिक प्रमाणात असते. यासह संबंधित भागामध्ये पूर येण्याचे प्रमाण जास्त असेल तर तांदळामध्ये आर्सेनिकचे प्रमाण आणखी वाढते. हेच आर्सेनिक इतर विषारी पदार्थांसह मिसळल्यास हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित रोगांची लागण होण्यास कारणीभूत ठरते.

(तुमच्यातही विसराळूपणा वाढतोय का? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ सोपे उपाय)

​हे घटक वाढवतात जोखीम

नियमित स्वरुपात आहारामध्ये तांदळाचे सेवन करणाऱ्या लोकांचे वजन जास्त असेल तसंच धूम्रपान करण्याचीही सवय असल्यास त्यांना हृदय विकार होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. याच पार्श्वभूमीवर भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू नयेत, यासाठी धूम्रपान तसंच आरोग्यास घातक असणाऱ्या सवयींवर वेळीच नियंत्रण आणावे. तसंच आहारामध्ये भाताचे सेवन देखील मर्यादित प्रमाणात करावे व शारीरिक स्वरुपात सक्रिय राहणं देखील आवश्यक आहे.

NOTE : निरोगी आरोग्यासाठी आहारामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(पाठ, कंबर, पायांच्या दुखण्यापासून सुटका हवीय? करा हे सोपे आसन)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *