Home Remedy त्वचेसाठी मसूर डाळीपासून तयार करा क्रीम, चेहऱ्यावर दिसेल आश्चर्यकारक बदल

Spread the love

सुंदर, नितळ आणि डागविरहित त्वचा प्रत्येकालाच हवी असते. पण धूळ, माती आणि प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ लागतात. चेहऱ्यावर (Skin Care Routine) जमा झालेले धूळ, मातीचे कण योग्य पद्धतीने स्वच्छ न केल्यास त्वचेचा रंग आणि पोत बिघडण्याची शक्यता असते. काही जणांना मुरुम आणि त्यांच्या डागांचाही सामना करावा लागतो.

त्वचेचे हे नुकसान टाळण्यासाठी नियमित चेहऱ्याची देखभाल करावी. यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नैसर्गिक (Skin Care Tips) उपचारांची मदत घेतल्यास उत्तम. नैसर्गिक उपचारांमुळे (Natural Remedies) आपल्या चेहऱ्याला फायदेच फायदे मिळतात. शिवाय डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपाय केल्यास त्वचेवर दुष्परिणामही होणार नाहीत.
(Skin Care Tips तेलकट त्वचेसाठी बेस्ट आहेत टोमॅटोचे ३ उपाय, असा करा वापर)

​मसूर डाळीपासून तयार करा क्रीम

मसूर डाळीतील गुणधर्म त्वचेसाठी लाभदायक आहेत. आयुर्वेदिक उपचारांमध्येही मसूर डाळीला महत्त्व आहे. याच मसूर डाळीपासून आम्ही तुम्हाला DIY फेस क्रीम करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत या क्रीमचा वापर केल्यास त्वचेचा रंग उजळेल. शिवाय सुरकुत्या, मुरुम आणि चेहऱ्यावरील डाग देखील कमी होतील. डॉक्टरांच्या सल्ला घेऊन तुम्ही या क्रीमचा आपल्या ब्‍युटी केअर रूटीनमध्ये समावेश करू शकता.

(Skin Care मासिक पाळीमध्ये मुरुम का येतात? जाणून घ्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी)

​क्रीम तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

मसूर डाळीपासून DIY फेस क्रीम कशी तयार करायची, जाणून घेऊया पद्धत

दोन ते तीन चमचे लाल मसूर डाळ, आवश्यकतेनुसार गुलाब पाणी, दोन चमचे बदाम किंवा ऑलिव्ह ऑइल, दोन चमचे ग्लिसरीन, दोन चमचे कोरफड जेल

(सारा अली खाननं शेअर केलं सौंदर्याचं रहस्य, तिला आईने दिल्या या ब्युटी टिप्स)

​क्रीम तयार करण्याची पद्धत

सर्व प्रथम मसूर डाळ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि पाच ते सहा मिनिटांसाठी गुलाब पाण्यामध्ये भिजत ठेवा. डाळ भिजल्यानंतर मिक्सरमध्ये दोन्ही सामग्री वाटा आणि त्यातील पाणी गाळून घ्या. आता एका काचेच्या वाटीमध्ये हे पाणी घ्यावे. यामध्ये बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करावे. त्यानंतर ग्लिसरीन आणि कोरफड जेलाचाही समावेश करावा. आता सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या आणि एका डबीमध्ये क्रीम भरून ठेवा.

(Skin Care स्क्रीनच्या दुष्परिणामांपासून त्वचेला जपा, करा ७ उपाय)

​चेहऱ्यासाठी मसूर डाळीचे फायदे

स्वयंपाकघरामध्ये सहजरित्या उपलब्ध होणार मसूरची डाळ आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. या डाळीमध्ये कित्येक प्रकारचे पोषक तत्त्‍व आणि अँटी ऑक्‍सिडेंटचा साठा आहे. यामुळे त्वचेवर जमा झालेले धूळ, मातीचे कण स्वच्छ होण्यास मदत मिळते. ही डाळ आपल्या त्वचेसाठी अँटी एजिंग प्रमाणे कार्य करते. यामुळे चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होण्यास मदत मिळते. या डाळीमध्ये प्रोटीनचाही भरपूर साठा आहे. हे घटक त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्याचे काम करतात.

(VIDEO चमकदार, मऊ आणि डागविरहित त्वचा हवीय? प्या हा स्पेशल घरगुती ज्युस)

​मसूर डाळीचे फेस पॅक

तुम्हाला ही क्रीम तयार करणं शक्य नसल्यास तुम्ही मसूर डाळीचे फेस पॅक वापरू शकता. मसूर डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवावी. डाळ भिजल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करावी. या पेस्टमध्ये मध आणि हळद पूड मिक्स करा. हे मास्क चेहरा आणि मानेवर लावा. मास्क सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. मसूर डाळीमुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे मृत त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

(Skin Care Tips हात मऊ आणि सुंदर दिसण्यासाठी घरामध्येच असे करा मेनिक्युअर)

Note कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *