सर्वात पहिले काय करावे?
साबणांच्या तुकड्यापासून हँडवॉश बनवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ पाण्याची गरज आहे. तुम्ही शक्य असल्यास वॉटर प्युरीफायर मधून पाणी घेऊ शकता. ते पाणी स्वच्छ असते. पण तुमच्याकडे वॉटर प्युरीफायर नसेल तर तुम्ही घरच्या घरी स्वच्छ पाणी तयार करू शकता. यासाठी पाणी उकळवून घ्या आणि मग ते थंड होऊ द्या. यामुळे पाण्यातील जंतू मारून पाणी निर्जंतुक आणि स्वच्छ होईल. हे पाणी घेण्यापूर्वी शेवटची प्रक्रिया म्हणून ते गाळणीने गाळून घ्यावे.
(वाचा :- ‘या’ ५ लोकांसाठी धोकादायक ठरु शकतं हळदीचं अतिसेवन, जाणून घ्या का?)
साबणाचे उरलेले तुकडे

स्वच्छ पाणी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणून साबणाचे उरलेले तुकडे एकत्र करा. हे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या किंवा हाताने कुटून घ्या. काही आयुर्वेदिक साबण सोडले तर बाकीचे साबण आरामात तुम्ही हाताने कुटू शकता. बारीक पेस्ट होई पर्यंत हे तुकडे कुटून घ्या. मेहनत कमी करायची असेल तर मिक्सरलाच वाटून घेतलेले बरे! यामुळे त्रासही वाचेल आणि अगदी बारीक पेस्ट तुम्हाला मिळेल. हाताने कुटण्यामध्ये वेळ जाईल आणि मेहनत सुद्धा खूप लागेल. शिवाय मिक्सर इतकी बारीक पेस्ट होणार नाही.
(वाचा :- रक्तशुद्धीकरणाचं काम चोख बजावणारा हा ड्राय फ्रुट प्रत्येक वयातील व्यक्तीसाठी आहे लाभदायक!)
हँडवॉश तयार करण्याची पद्धत

उकळून थंड केलेल्या पाण्याला वा वॉटर प्युरीफायर मधील पाण्याला आता गॅस वर गरम होण्यासाठी ठेवा. जेव्हा हे पाणी उकळून लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि आता यात वाटून वा कुटून घेतलेली साबणाच्या तुकड्यांची पेस्ट टाका. पाण्यात साबणाची पेस्ट टाकताना ते सतत ढवळत राहा. यासाठीएखादा चमचा वा लाकडाचा तुकडा घ्या आणी त्याने पाणी ढवळत राहा. जेव्हा साबण यात योग्य प्रकारे मिसळेल तेव्हा तुम्ही ढवळणे थांबा.
तुम्ही किमान 15 ते 20 मिनिटे हे मिश्रण ढवळत राहा आणि पूर्णपणे साबण त्यात मिक्स झाल्यावर तुम्ही हे मिश्रण थंड व्हायला ठेवा. किमान 24 तास हे मिश्रण असेच ठेवा मग ते जमू लागेल. आणि तयार झाला आहे आता तुमचा हँडवॉश! आता हा हँडवॉश पाण्यात टाकून तुम्ही त्याचा वापर करण्यास सुरुवात करू शकता.
(वाचा :- हॅंगओव्हर उतरवण्यासोबतच हा ज्यूस ७ दिवसांत करतो आरोग्याच्या समस्यांचा कायापालट!)
हात सॉफ्ट ठेवण्यासाठी

साबण बनवताना हात सॉफ्ट ठेवण्यासाठी त्यामध्ये ग्लिसरीन आणि इतर ऑईल्सचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही साबणापासून हँडवॉश बनवता तेव्हा या प्रक्रियेमध्ये एकादा पुन्हा ग्लिसरीन किंवा ऑलीव्ह ऑईल आवर्जून टाका. जेणेकरून तुमची त्वचा रखरखीत होणार नाही. एक लिटर हँडवॉश असेल तर त्यामध्ये एक छोटा चमचा ग्लिसरीन टाका. जर ग्लिसरीन नसेल तर अर्धा चमचा ऑलीव्ह ऑईल टाका. यामुळे तुम्ही याचा वापर केलात तर तुमचे हात सॉफ्ट राहतील.
(वाचा :- सांधेदुखी वाढल्यास समजून जा हा आजार घालतोय विळखा, आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!)
हे हँडवॉश किती प्रभावी असते?

साबणापासून बनवले हँडवॉश हे साबणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. साबण जर चांगल्या गुणवत्तेचा असेल आणि जंतूंवर प्रभावी असले तर साहजिकच त्यातील गुण हँडवॉश मध्ये सुद्धा आढळतील. जर तुम्ही कमी गुणवत्तेचा साबण वापरात असाल आणि त्यापासून तुम्ही या पद्धतीने हँडवॉश बनवला तर तो नक्कीच तितका प्रभावी बनणार नाही. सध्याच्या काळात आपण शक्य तितके चांगल्या गुणवत्तेचे आणि जंतूपासून सुरक्षा देणारे हँडवॉश वापरायला हवेत.
(वाचा :- वजन कमी करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ फूड कॉम्बिनेशन, काही दिवसांतच व्हाल सडपातळ!)
Source link
Recent Comments