Importance Of Nath नथीचा नखरा! जाणून घ्या नथ घालण्याची परंपरा

Spread the love

नाकामध्ये नथ आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी पाहून एखादी महिला विवाहित असल्याचा अंदाज लावला जातो. पण बदलत्या वेळेनुसार नथ आणि पायामध्ये मासोळी घालण्याचा फॅशन ट्रेंड सुरू झाला आहे. आज कित्येक तरुणींच्या नाकामध्ये नथ आणि पायांमध्ये स्टायलिश मोसाळी आपल्याला पाहायला मिळते. भलेही या दोन गोष्टींचा आज फॅशनेबल दागिन्यांमध्ये समावेश झाला असला तरी ‘नथ’ आणि ‘जोडवी’ या सौभाग्य अलंकारांना विशेष महत्त्व आहे. नथ घालण्यामागील परंपरा आणि वेळेनुसार नथीच्या स्टाइलमध्ये झालेला बदल, याबाबत आपण माहिती जाणून घेऊया.


यासाठी महिला नाकामध्ये नथ घालतात…

हिंदू धर्मामध्ये विवाहित महिलांच्या सोळा श्रृंगारास खूप महत्त्व आहे. कपाळावरील कुंकूपासन ते पायातील जोडवी आणि नाकातील नथीपासून ते बांगड्या, हे सारं सोळा श्रृंगाराचा भाग आहे. सुवासिनींनी नाकामध्ये नथ घालण्याची परंपरा जुनी आहे. घरामध्ये एखादे शुभ कार्य असल्यासंही महिला नाकामध्ये नथ घालतात. ‘नथ’ सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
(Hairstyle Tips पारंपरिक ते स्टायलिश लुकसाठी करून पाहा बन हेअर स्टाइल)


नथपासून डायमंड नोझ पिनची फॅशन
जुन्या काळापासून वापरात असलेल्या काही दागिन्यांची फॅशन आज तरुणींमध्ये पाहायला मिळते. सर्वात आधी रिंग डिझाइन असणारी नथ नाकामध्ये घातली जात असे. पाहता – पाहता ही फॅशन आता ट्रेंडमध्ये आली आहे. दरम्यान, रिंग नोझ पिनची फॅशन आजही कायम आहे. बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्री देखील रिंग नोझ पिनची फॅशन फॉलो करतात. कॉलेजमधील विद्यार्थिनींमध्ये रिंग डिझाइन नथीचा ट्रेंड सर्वात जास्त पाहायला मिळतो. कॉलेजमधील कोणत्याही फंक्शनसाठी तरुणींकडून नथीला सर्वात आधी पसंती असते.

(ईशा अंबानीने लग्नासाठी फॉलो केला होता आईसारखा ब्रायडल लुक,पाहा ३५ वर्षांपूर्वीचे हे फोटो)
दरम्यान, सध्या वेगवेगळ्या आकारात, नक्षीकाम तसंच फुलाच्या डिझाइन असलेली नथ बाजारात उपलब्ध आहेत. या फॅशनेबल रिंग नाकामध्ये घालून तुम्ही स्वतःला स्टायलिश लुक देऊ शकता.

(पावसाळ्यात कपाटातील कपड्यांना वास येतो? समस्या दूर करण्यासाठी ७ सोपे उपाय)
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘नथीचा नखरा’ नावाचा ट्रेंड सुरू झाला होता. या ट्रेंडनुसार कित्येक जणींनी ‘नथ’ घातलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. या ट्रेंडमध्ये अभिनेत्रींनी सुद्धा सहभाग नोंदवला होता.

(जेव्हा अंकिता लोखंडेनं परिणिती चोप्राची स्टाइल केली होती कॉपी, चाहते म्हणाले…)
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *