Kanga Ranaut बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतच्या सौंदर्याचे रहस्य माहीत आहे का?

Spread the love

कंगना राणौत (Kanga Ranaut) बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री आणि सौंदर्याची राणी आहे, ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. २००४ मध्ये या अभिनेत्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. यानंतर कित्येक सिनेमांमध्ये तिनं प्रशंसनीय भूमिका साकारल्या आहेत. उदाहरणार्थ ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’, ‘सिमरन’, ‘जजमेंटल है क्या’, पंगा इत्यादी.

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमध्ये कंगना राणौतच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान कित्येकदा तिनं मेकअप नसलेले स्वतःचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगना ‘नो मेकअप’ लुकमध्येही तितकीच सुंदर दिसते. ‘नॅचरल ब्युटी’ असलेल्या या अभिनेत्रीच्या सौंदर्यामागील रहस्य सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. चला तर जाणून घेऊया कंगणा राणौतच्या सीक्रेट ब्युटी टिप्सची माहिती
(Home Remedies अंडरआर्मच्या त्वचेची योग्य काळजी घेता का? आंघोळ करण्यापूर्वी नियमित करा या गोष्ट)

​कंगनाचे ब्युटी सीक्रेट

ही अभिनेत्री चांगले टोनर, मॉइश्चराइझर आणि आय-क्रीमचाच वापर करते. चेहऱ्यावरील मेकअप काढल्यानंतर ती आपल्या त्वचेवर कोणतेही ब्युटी प्रोडक्ट लावत नाही. कंगनाची त्वचा अतिशय संवेदनशील आहे. यासाठी ती क्वचितच क्लीनअपची मदत घेते आणि आपल्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेण्याचा प्रयत्न करते. पण फेशिअल ट्रीटमेंटपासून ती स्वतःला कायम दूर ठेवते. कारण संवेदनशील त्वचा असल्याने याचे उलट परिणाम होण्याची शक्यता असते.

(Natural Hair Oil केसांसाठी घरामध्ये कसे तयार करायचे कोरफडीचे तेल, जाणून घ्या फायदे)

​साबणाचा वापर करत नाही

चेहरा स्वच्छ करण्यासाठी कंगना साबणाचा वापर करत नाही. साबणामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक स्वरुपात जमा होणारे तेल थोड्या वेळापुरते कमी होते. यानंतर चेहरा पुन्हा तेलकट दिसू लागतो. यामुळेच कंगना चेहऱ्यासाठी साबणाचा उपयोग करत नाही. या ‘मणिकर्णिका’ने ज्या स्टायलिश लुकने सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले होते, अशा काही क्षणांची माहिती आपण जाणून घेऊया.

(Hair Care घरच्या घरी तयार करा लसूण हेअर पॅक, जाणून घ्या फायदे)

कान फिल्म फेस्टिव्हलमधील कॅटसूट

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या पहिल्या उपस्थितीत कोणीही कुरळ्या केसांसह एक शानदार कॅटसूट परिधान करण्याची हिंम्मत दाखवणार नाही. पण कंगना राणौतसाठी सारं काही शक्य आहे. ती काहीही करू शकते. या कार्यक्रमासाठी कंगनाने स्टायलिश कॅटसूट परिधान केला होता. तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे सर्व जण आश्चर्यचकित झाले होते. कारण या गोष्टीचा कोणीही अंदाज बांधला नव्हता.

(Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा)

​कंगनाचा ऑड्रे साडीतील लुक

रेट्रो विंग्ड लायनर, पेल लिप्स 1970, एक वॉल्युमिनस अपडू, कंगनाचा हा लुक कोण कसं विसरू शकतं. या लुकमध्ये कंगना एखाद्या ‘महाराणी’ प्रमाणे दिसत आहे. दरम्यान यानिमित्ताने चाहत्यांना कंगनाचा कान फिल्म फेस्टिव्हलमधील व्हिंटेज, रीगल ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला.

(Homemade Kajal अभिनेत्री यामी गौतमने घरामध्ये तुपापासून तयार केले काजळ, तिच्या आजीने शिकवली होती ही पद्धत)

​एम्पायर-स्टेट टॉप क्नॉट आणि स्पॉक स्टाइलचे आयब्रो

जेव्हा आपण फ्युचरिस्टिक लुकबाबत (futuristic look) चर्चा करतो तेव्हा वेगवेगळ्या कल्पना समोर येतात. हे लुक कधी चांगले दिसतात किंवा पूर्णतः फसतात. पण कंगनाने कॅरी केलेला लुक एकदम परफेक्ट असल्याचे सिद्ध झाले होते. तिच्या बोल्ड स्टाइलमुळे कोणत्याही लुकला Space Age Look मिळू शकतो. दरम्यान सर्वांमध्ये वेगळे दिसण्यासाठी कोणत्याही सेलिब्रिटीने हाय क्नॉट आणि जाड भुवया ठेवल्या नसतील. पण कंगनासाठी सर्व काही शक्य आहे.

(Steaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत)

​कंगनाची खास हेअर स्टाइल

कंगनाच्या हेअरस्टाइलशिवाय तिच्या सुंदर लुकची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाइलद्वारेही तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उदाहरणार्थ एकदा कंगनाने मुकुटाप्रमाणे हेअरस्टाइल केली होती.

कंगना राणौतला नेहमी हटके राहायला आवडते, हे सर्वांनाच माहिती आहे. मग एखादा सिनेमा असो, फॅशन किंवा मेकअप करण्याची पद्धत असो, तिला प्रत्येक गोष्टींमध्ये प्रयोग करायला आवडते

(Home Remedies For Skin या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *