Kareen Kapoor Birthday करीना कपूरने बर्थडे सेलिब्रेशनसाठी परिधान केला होता हा महागडा स्टायलिश ड्रेस

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareen Kapoor Birthday) आपला ४० वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. करीनानं आपल्या कुटुंबीयांसोबत बर्थ- डे सेलिब्रेशन केलं. करिश्मा कपूरनं या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मध्यरात्री झालेल्या या पार्टीपूर्वी तसंच पार्टीदरम्यान अभिनेत्रीचे तीन वेगवेगळे लुक चाहत्यांना पाहायला मिळाले.

बर्थ- डे सेलिब्रेशनपूर्वी परिधान केलेल्या दोन आउटफिटमधील करीनाचा लुक एकदम स्टायलिश होता. पण केक कापताना बेबोने पूर्णतः साध्या आणि कम्फर्टेबल लुकची निवड केली होती. तर दुसरीकडे करीनाची बहीण करिश्मा कपूरची स्टाइल नेहमी प्रमाणे शानदार होती. (सर्व फोटो क्रेडिट: योगेन शाह आणि इन्स्टाग्राम)
(Kareena Kapoor Birthday २० वर्षांत इतकी बदलली करीना कपूरची फॅशन, कधी कौतुक तर कधी झाली होती ट्रोल)

​बेबोने कफ्तान ड्रेसची पुन्हा केली निवड

आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी करीना कपूरने कफ्तान ड्रेस परिधान केला होता. हलक्या हिरव्या रंगाचे हे आउटफिट होते. ड्रेसवर लाल रंगाची फ्लोरल डिझाइन तुम्ही पाहू शकता. यासोबतच बॉर्डरवर फॉरेस्ट ग्रीन लेस देखील होतं. त्यावर लाल रंगाचे फ्लोरल प्रिंट आहे. ड्रेसचे स्लीव्ह्ज बलून पॅटर्नमध्ये आहेत. तर नेकलाइनवरील सुंदर टॅसल्स डिझाइनही तुम्ही पाहू शकता.

(तैमूरनं आईबाबांसारखंच टी-शर्ट केलं परिधान, चाहते म्हणाले ‘छोटा पॅकेट बडा धमाका’)

एवढी आहे ड्रेसची किंमत

बर्थ-डेसाठी करीना नो-मेकअप लुकमध्ये दिसली. तिनं कफ्तान मॅक्सी ड्रेससह कोणत्याही प्रकारची ज्वेलरी मॅच केली नव्हती. एका फोटोमध्ये तिनं केस मोकळे सोडल्याचे दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत बन हेअरस्टाइल केल्याचं पाहायला मिळालं. करीनानं सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर अनिता डोंगरे यांच्या कलेक्शनमधून हा स्टायलिश कफ्तान ड्रेस घेतला आहे. अधिकृत वेबसाइटवर नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार या ड्रेसची किंमत १९ हजार रुपये एवढी आहे. दरम्यान सध्या करीना कपूर अशाच पॅटर्नच्या ड्रेसमध्ये बहुतांश वेळा दिसत आहे.

(करीना कपूर दुसऱ्यांदा होणार आई, गुड न्यूज शेअर केल्यानंतर समोर आली पहिली झलक)

​ग्लॅमरस लुक

वाढदिवसाच्या एक दिवस आधी करीना कपूरचा ग्लॅमरस लुक देखील पाहायला मिळाला. तिनं पांढऱ्या रंगाची फ्लेअर्ड पँट आणि त्यावर मॅचिंग टॉप परिधान केलं होतं. या लुकवर तिनं पांढऱ्या रंगाचीच स्ट्रॅप्ड ब्लॉक हील्स मॅच केलं होतं. बेबोने स्लीक लुक हेअर स्टाइल कॅरी केली होती. तर या ड्रेससाठी तिनं गोल्डन ईअररिंग्सची निवड केली. करीनाने चेहऱ्यावर भलेही फेस मास्क लावलं होतं. पण तिनं मेकअप देखील केल्याचे फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.

(जेव्हा करीना कपूरवर भारी पडली होती या टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल, पाहा फोटो)

​करीनाचा निळ्या रंगाचा ड्रेस

पांढऱ्या रंगाच्या आउटफिटनंतर करीना निळ्या रंगाच्या पोषाखामध्ये दिसली होती. कॉटन पॅटर्नमधील को-ऑर्ड पँट आणि टॉपमध्ये करीनाचा लुक शानदार दिसत होता. या आउटफिटमध्ये अँकल लेंथ कट पँट्स आणि बटण अप शर्टचा समावेश होता. यावर तुम्ही राखाडी रंगाचे प्रिंट डिझाइन देखील पाहू शकता. करीनाने या ड्रेसवरही पांढऱ्या रंगाची ब्लॉक हील्स मॅच केलं होतं.

(करीनापासून ते रायमापर्यंत, या अभिनेत्रींनी फोटोशूटसाठी घेतला असा बोल्ड निर्णय)

​करिश्मा कपूरचा स्टायलिश लुक

आपल्या छोट्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचलेल्या करिश्मा कपूरचा लुक देखील नेहमी प्रमाणे स्टायलिश होता. तिनं Zara चा ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तुम्ही इलास्टिक वेस्टबँड पाहू शकता. या मिडी ड्रेसचे शॉर्ट टर्न अप स्लीव्ह्ज होते. करिश्माने या ड्रेसवर गडद राखाडी रंगाचे हील्स घातले होते. करिश्मा कपूरचा पूर्ण लुक एकदम परफेक्ट होता. अधिकृत वेबसाइटवर नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार या ड्रेसची किंमत २ हजार ९९० रुपये एवढी आहे.

(करीना कपूरचे शूटिंगमधील फोटो केले शेअर, सुंदर फोटो पाहून चाहते झाले घायाळ)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *