Kareena Kapoor करीना कपूरने पार्टी लुकसाठी ‘या’ लाख रुपयांच्या फुटवेअर केली निवड

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर – खान आपल्या शानदार अभिनयाव्यतिरिक्त हटके स्टाइलसाठीही ओळखली जाते. करीनाचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. फॅशनच्या बाबतीत करीना कपूर- खान बी-टाउनमधील तरूण अभिनेत्रींनाही तगडी टक्कर देताना दिसते. दरम्यान प्रेग्नेंसीमध्येही करीना स्टायलिश लुक कॅरी करताना दिसत आहे. करीनाला आपल्या स्टाइलसोबत तडजोड करणं अजिबात पसंत नाही. तिची स्टाइल फॉलो करणाऱ्यांची संख्या भलीमोठी आहे.

नुकतेच या अभिनेत्रीचे नवीन अवतारातील काही फोटो चाहत्यांना सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पण आता तिच्या ड्रेसऐवजी फुटवेअरचीच जास्त चर्चा सुरू आहे. करीनानं आपल्या ड्रेसवर अतिशय महागडे फुटवेअर मॅच केले होते. पण किंमतीनुसार करीनाचे हे हील्स फारसे आकर्षक नसल्याचे दिसून आले.
(फोटो क्रेडिट : योगेन शाह)
(आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)

​करीनाचे हटके डिझाइनचे फुटवेअर

करीना कपूरने आपला लाडका लेक तैमूर अली खानसाठी हॅलोवीन पार्टीचे आयोजन केले होतं. या पार्टीसाठी बेबोने अतिशय साधं आउटफिट परिधान केलं होतं, पण हटके डिझाइनच्या फुटवेअरची निवड केली होती. तिनं आपल्या आउटफिटसह पिवळ्या रंगाची हील्स मॅच केली होती. हे फुटवेअर इटलीतील लक्झरी ब्रँड ‘Bottega Veneta’ चे आहे. भारतीय चलनानुसार या हील्सची किंमती जवळपास लाख रुपये एवढी आहे. लेदरपासून तयार करण्यात आलेली ही हील्स चालण्या-फिरण्यासाठी कम्फर्टेबल असावी. पण करीनाने परिधान केलेल्या आउटफिटशी हे फुटवेअर अजिबात मॅच करत नव्हतं.

(Kareena Kapoor करीना कपूरची ही साडी पाहून लोक भडकले होते, म्हणाले…)

बेबोचा कम्फर्टेबल कॉटन ड्रेस

करीनाने परिधान केलेला ड्रेस सुंदर होता. प्रेग्नेंसीनुसार तिनं स्टाइलसह कम्फर्टेबल लुक कॅरी केल्याचं दिसतंय. बेबो सध्या कफ्तान आणि अनारकली ड्रेस परिधान करण्यास पसंती देत आहे. पण हॅलोवीन पार्टीसाठी तिनं कॉटन पॅटर्नमधील नी-लेंथ ड्रेसची निवड केली होती. कॉटनचे कपडे परिधान करणं आपल्या त्वचेसाठी चांगले असते.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

करीनाचा कम्फर्टेबल लुक

करीना कपूरच्या या ड्रेसवर बटण अप डिजाइन आणि कॉलर डिझाइन तुम्ही पाहू शकता. यावर पांढऱ्या रंगाची लेस देखील जोडण्यात आलीय, ज्यामुळे हा साधा ड्रेस देखील आकर्षक दिसत आहे. या आउटफिटचे फुल स्लीव्ह्ज बेल डिझाइन होते. यावरही पांढऱ्या रंगाची लेस दिसत आहे. करीनाचा हा जांभळ्या रंगाचा ड्रेस साधा पण कम्फर्टेबल आणि हटके दिसत आहे.

(प्रसिद्ध डिझाइनर तरुण तहिलियानीने लाँच केले ब्रायडल लेहंग्यांचे नवं कलेक्शन)

​बबीता यांचा स्टायलिश आणि कम्फर्टेबल लुक

पार्टीमध्ये करीनाची आई देखीस सहभागी झाली होती. करीनाची आई बबीता यांनीही अतिशय कम्फर्टेबल ड्रेसची निवड केली होती. बबीता कपूर यांनी कॉटनचे आउटफिट परिधान केलं होतं. त्यांनी पांढऱ्या रंगाची स्ट्रेट कट पँट आणि त्यावर पांढरा व राखाडी रंगाचा टॉप मॅच केला होता. या टॉपवर पोल्का डॉट्स डिझाइन देखील होतं.

(Lakme Fashion Weekमध्ये मृणाल ठाकूरने परिधान केला होता ‘हा’ ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का)

​अनारकली ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती करीना कपूर

यापूर्वी करीना कपूर गुलाबी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसली होती. या ड्रेसमध्ये करीना कपूर अतिशय सुंदर आणि मोहक दिसत आहे. या अनारकली ड्रेसवर गोल्डन प्रिंट तुम्ही पाहू शकता. यावर करीनाने सोनेरी रंगाचे फ्लॅट्स घातले होते. तसंच पर्ल ईअररिंग्स तिनं मॅच केले होतं. या साध्या लुकमध्येही करीना प्रचंड स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे.

(सारा अली खान व कृति सेनॉनने परिधान केलं एकसारखं आउटफिट? कोणाचा लुक आहे सुपर स्टायलिश)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *