Karwa Chauth करवा चौथसाठी हवाय खास लुक, घरच्या घरी तयार करा हे ५ फेस पॅक

Spread the love

​तांदळाचे पीठ आणि चंदन फेस पॅक

किराणामालाच्या दुकानातून तांदळाचे पीठ विकत घ्या अथवा तुम्ही घरातही पीठ तयार करू शकता. या पिठाचा स्क्रब म्हणूनही वापर करू शकता. स्‍क्रब तयार करण्यासाठी एक मोठा चमचा तांदळाच्या पिठामध्ये चंदन तेलाचे दोन ते तीन थेंब किंवा अर्धा चमचा चंदन पावडर आणि एक मोठा चमचा गुलाब पाणी ही सर्व सामग्री एकत्र घ्या. ही पेस्ट पाच मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

(Natural Skin Care Tips आवळ्याच्या फेस पॅकचा कसा करावा वापर? जाणून घ्या पद्धत)

​दही आणि हळद फेस पॅक

या फेस पॅकमुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत मिळते. सोबत टॅनिंगची समस्याही दूर होऊन त्वचा मऊ आणि नितळ होते. फेस पॅक तयार करण्यासाठी अर्धा चमचा हळदीमध्ये दोन मोठे चमचे दही मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

(Natural Skin Care Tips घरातील या सहा नैसर्गिक सामग्रींपासून कसे तयार करायचे)

​चंदन फेस पॅक

चंदन तेलामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. या पोषण तत्त्वांमुळे वृद्धत्वाची लक्षणे आणि पिगमेंटेशनची समस्या कमी करण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त चंदनामुळे चेहऱ्यावरील मुरुम, मुरुमांच्या डागांपासूनही सुटका मिळते.

फेस पॅक कसे तयार करावे? : चंदन तेलाचे दोन ते तीन थेंब, बदामाचे तेल आणि एक चमचा मध एकत्र करा. हे मिश्रण तयार झाल्यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. लेप सुकल्यानंतर त्वचा थंड पाण्याने धुऊन घ्या.

(उन्हामुळे त्वचा होते लाल? क्रीममुळे रॅशेज येतात? संवेदनशील त्वचेशी संबंधित जाणून घ्या ५ गोष्टी)

​मध आणि लिंबू फेस पॅक

लिंबूतील पोषण तत्त्व मृत त्वचेची समस्या दूर करण्याचे कार्य करतात. पण चेहऱ्यावर कधीही लिंबू किंवा लिंबाचा रस थेट लावण्याची चूक करू नये. यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. तर मधामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपली त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत मिळते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. फेस पॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र घ्या. हे मिश्रण त्वचेवर काही मिनिटांसाठी लावून ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

(हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, रवीना टंडनने ब्युटी टिप्ससह सांगितली योग्य पद्धत)

​ओटमील, हळद आणि चंदन फेस पॅक

ओटमीलमुळे सनटॅन आणि मृत त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. ओटमील, चंदन आणि हळदीचे फेस पॅक तयार करा व चेहऱ्यावर लावा. या फेस पॅकमुळे त्वचा उजळण्यास मदत मिळते. यासाठी एका वाटीमध्ये एक मोठा चमचा उकडलेले ओट्स, चंदन तेलाचे दोन ते तीन थेंब, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी एकत्र घ्या. फेस पॅक तयार केल्यानंतर त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने त्वचेचा मसाज करा. लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.

(व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ आणि खाज येते का? जाणून घ्या हे ५ घरगुती उपाय)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *