KBC १२च्या सेटवरील बिग बी अमिताभ बच्चन यांचा कूल लुक

Spread the love

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) केवळ बी-टाउनपुरतेच नव्हे तर ते खऱ्या अर्थाने ‘शहेनशाह’ आहेत. आजही अभिनय क्षेत्रामधील तसंच सिनेरसिकांच्या हृदयातील त्यांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. अमिताभ यांचे वय ७७ वर्ष एवढे आहे. त्यांचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. तसंच प्रश्न गॅजेट्सचा असो किंवा फॅशन स्टाइलचा, बिग बींना तरुणवर्गासोबत खांद्याला खांदा लावून चालणे पसंत आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाइल बाबत सांगायचे झाले तर बऱ्याचदा ते आगळ्यावेगळ्या फॅशन लुक मध्ये आपल्याला दिसतात. त्यांचा पेहराव इतका अप्रतिम असतो की तरुणी देखील त्यांचे भरभरून कौतुक करतात. केबीसी १२ (KBC 12) च्या शुटिंग सेटवर असेच काहीसे पाहायला मिळाले.
(आराध्याने आई ऐश्वर्या रायला अशी केली होती मदत, फोटो पाहून चाहते म्हणाले…)

केबीसीच्या सेटवर घडलेला किस्सा खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटर पोस्ट द्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. अमिताभ बच्चन यांनी आपला चष्मा बदलला आहे. व्हिंटेज लुक असलेल्या त्यांच्या चष्माला काळ्या रंगाची स्टायलिश फ्रेम आहे. या स्टायलिश चष्म्याचे होत असलेल्या कौतुकासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

(बिग बी अमिताभ बच्चन जुन्या कपड्यांचं काय करतात?)

ट्विटर पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, ‘कुछ देवियां आज शूटिंग पर मेरे चश्मे को देखकर बोलीं Cool… मैंने मन में सोचा, चलो बच गए, वातावरण अनुकूल है।’ ही पोस्ट पाहिल्यानंतर युजर्सकडूनही त्यांची स्टाइल आणि चष्म्याचे कौतुक केले जात आहे.

बिग बींचा कूल अवतार

दरम्यान, यापूर्वीही अमिताभ यांनी केबीसीच्या शुटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्येही त्यांचा कूल लुक पाहायला मिळाला. या या फोटोंमध्ये त्यांनी काळ्या रंगांचा स्वेटशर्ट आणि त्यावर मॅचिंग जॉर्गर्स परिधान केल्याचे दिसत आहे. हुडीच्या बॉर्डर आणि पायजमावर पांढऱ्या रंगाची पट्टीदार डिझाइन आणि कोट्स दिसत आहे. या आउटफिटमध्ये महानायक अमिताभ बच्चन कूल दिसत आहेत.

(आराध्या आणि ऐश्वर्या राय-बच्चनची सेम-टू-सेम स्टाइल, पाहा फोटो)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *