Korean Skincare चेहऱ्यावर मेकअप टिकून राहण्यासाठी कोरियन तरुणी करतात ‘हा’ उपाय

Spread the love

​Jamsu टेक्निक म्हणजे?

जाम्सू हा कोरियन शब्द आहे. ‘एकजीव होणे’ किंवा ‘एकत्र होणे’ असा या शब्दाचा अर्थ आहे. हा अतिशय प्रसिद्ध कोरियन उपाय आहे. या उपायाची मदत घेतल्यास चेहऱ्यावर मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत मिळतेच. शिवाय तेलकट त्वचेची समस्याही दूर होते. उन्हाळ्यामध्ये हा उपाय करणं लाभदायक ठरू शकते. या टेक्निकमुळे दमट हवामानातही आपला मेकअप फार काळ टिकून राहतो.

(Natural Skin Care मुरुमांच्या डागांमुळे त्रस्त आहात? जाणून घ्या हळद, मध व कोरफड फेस पॅकची माहिती)

​त्वचेसाठी कसे कार्य करते जाम्सू टेक्निक?

सर्व प्रथम आपला चेहरा एखाद्या चांगल्या क्लींझर किंवा टोनरने स्वच्छ करून घ्यावा. यानंतर चेहऱ्यावर फाउंडेशन किंवा कन्सीलर लावावे. फाउंडेशननंतर फेस पावडर देखील लावा. यानंतर आपला चेहरा बर्फाच्या पाण्यामध्ये १० ते १५ सेकंदांसाठी बुडवा आणि बाहेर काढावा. टिशू पेपरच्या मदतीनं चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे फाउंडेशन तुमच्या त्वचेवर योग्य पद्धतीने एकरुप होईल. मेकअपसाठी परफेक्ट बेस तयार करण्याची ही कोरियन पद्धत आहे.

(Natural Hair Care दही आणि केळ्यापासून घरामध्ये कशी तयार करायची हेअर स्पा क्रीम? जाणून घ्या माहिती)

​या गोष्टींची घ्यावी काळजी

फाउंडेशन किंवा कन्सीलर लावण्यापूर्वी आपला चेहरा योग्य पद्धतीने मॉइश्चराइझ करून घ्यावा. ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने फाउंडेशन योग्य पद्धतीने ब्लेंड करा आणि फ्लफी ब्रशने चेहऱ्यावर पावडर लावा. आपला बेसिक मेकअप झाला असेल तर जाम्सू टेक्निकचा वापर करावा. एक मोठ्या बाउलमध्ये बर्फाचे पाणी घ्या, आपला चेहरा त्यात बुडवा आणि बाहेर काढावा. चेहरा जास्त काळ पाण्यामध्ये बुडवून ठेवण्याची चूक करू नये. हा उपाय करताना केस बांधून ठेवावेत.

(Hair Care Tips केस रोज धुण्याची आहे सवय? यामुळे होणारे नुकसान तुम्हाला माहिती आहेत का)

​त्वचा कोरडी असल्यास काय करावे?

आपला चेहरा १५ सेकंदांपेक्षा अधिक काळ पाण्यामध्ये बुडवू ठेवू नये. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी शक्यतो ही टेक्निक वापरणं टाळावे. तसंच ज्यांना श्वसनाशी संबंधित काही आजार किंवा समस्या असतील त्यांनी हा उपाय करू नये.

(Natural Skin Care स्किन केअर रुटीनमध्ये अक्रोडचा कसा आणि किती प्रमाणात समावेश करावा?)

​बर्फाने मसाज करण्याचे फायदे

चेहऱ्यावरील ओपन पोअर्समध्ये जमा झालेली दुर्गंध स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बर्फाने देखील मसाज करू शकता. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर बर्फाच्या तुकड्यानं त्वचेवर हलक्या हातानं मसाज करावा. यामुळे रोमछिद्रांचा आकार कमी होण्यास मदत मिळते. पण चेहऱ्यावर थेट बर्फाचा वापर करण्याची चूक कधीही करू नये. एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये बर्फ घ्यावे आणि चेहऱ्याचा मसाज करावा.

(Aloe Vera Benefits कोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते? वाचा माहिती)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टर सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार एकसारखा नसतो. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे प्रोडक्ट किंवा उपचार पद्धती अवलंबू नये.

इंग्रजीमध्ये हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *