Lakme Fashion Weekमध्ये मृणाल ठाकूरने परिधान केला होता ‘हा’ ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का

Spread the love

‘लॅक्मे फॅशन वीक’ यंदा डिजिटलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाद्वारे प्रसिद्ध डिझाइनर्सना आपापल्या शानदार आउटफिट कलेक्शनचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. दरम्यान ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या ग्रँड फिनालेमध्ये ‘सुपर 30’ सिनेमाची अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या (Mrunal Thakur) फॅशनचा जलवा चाहत्यांना पाहायला मिळाला. मृणालने शोमध्ये स्टायलिश आउटफिट परिधान केले होते, ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

डिझाइनर लेहंगे, क्लासिक ड्रेप्ड साडी, हेव्ही एमब्लिशड गाउन आणि को-ओर्ड्स सेट अशा सुंदर आणि ट्रेंडी आउटफिटमध्ये मृणालला आतापर्यंत तुम्ही पाहिलं असावं. पण नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये मृणालचा अवतार निराळा होता. तिने प्रसिद्ध डिझाइनर साक्षा आणि किन्नीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. काही लोकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर काही जणांना तिच्या ड्रेसचं डिझाइनच समजलं नाही. दुसरीकडे या ड्रेसची किंमत ऐकूनही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (Photos: Lakmé Fashion Week)
(प्रसिद्ध डिझाइनर तरुण तहिलियानीने लाँच केले ब्रायडल लेहंग्यांचे नवं कलेक्शन)

​ड्रेसचे डिझाइन कसं होतं?

लॅक्मे फॅशन वीकच्या (Lakme Fashion Week) ग्रँड फिनालेमध्ये मृणाल ठाकूरने पुनीत बलाना आणि रिमझिम दादूच्या कलेक्शनमधील आउटफिट परिधान केले होते. तसंच डिझाइनर साक्षा आणि किन्नीसाठी शो- स्टॉपर होऊन रॅम्प वॉक देखील केला. आपल्या डेब्यु वॉकसाठी मृणाल ठाकूरने बंजारा आणि बंधानी प्रिंट असलेलं आउटफिट घातलं होतं. यावर तिनं पॉपलिन जॅकेटसह शिफॉन स्कर्टची निवड केली होती. या अवतारासाठी तिनं मोहक मेकअप, स्मोकी आईज, गुलाबी रंगाचे लिपस्टिक आणि मिडिल पार्टेड बन असा लुक कॅरी केला होता.

(बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा ग्लॅमरस अवतार, तिचे हे स्टायलिश फोटो पाहिले आहेत का?)

​कसा होता ओव्हरऑल लुक?

मृणाल ठाकूरने वर्च्युअल ग्रँड फिनालेसाठी ‘साक्षा आणि किन्नी’ने डिझाइन केलेला ब्लँक अँड रस्ट मस्टर्ड येलो पॉपलिन जॅकेटसह शिफॉन फॅब्रिकपासून तयार केलेला मयुरी स्कर्ट परिधान केला होता. या डिझाइनर ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मृणालच्या ओव्हरऑल ड्रेसिंगबाबत सांगायचं झालं तर तिनं परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या जॅकेटवर सुंदर वर्क करण्यात आलं होतं. यावर चंदेरी धाग्यांसह मिरर वर्क आणि मेटल एम्ब्रोयडरी करण्यात आली होती. हिरव्या रंगाच्या स्कर्टवर आकर्षक रफल पॅनल डिझाइन देखील तुम्ही पाहू शकता.

(Shilpa Shetty शिल्पा शेट्टीची बुट आणि जीन्सची अनोखी स्टाइल, पाहा फोटो)

​ड्रेस तयार करण्यासाठी लागले इतके तास

फॅशन शोसाठी मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) परिधान केलेल्या ड्रेसची किंमत दोन लाख ५८ हजार रुपये एवढी होती. या पोषाखामध्ये बंजारा आणि बांधनी प्रिंटसह थ्रेड वर्क, मिरर डिझाइनिंग करण्यात आलं होतं. पण काही जणांना अभिनेत्रीच्या पोषाखाचं डिझाइन समजलंच नाही. हा पोषाख तयार करण्यासाठी २०० हून अधिक तासांचा कालावधी लागला होता, असे म्हटलं जात आहे.

(ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर)

​हील्सवरही केला इतका खर्च

मृणालचा ड्रेसच नव्हे तर तिनं घातलेल्या सँडल्स देखील प्रचंड स्टायलिश होत्या. आपल्या पहिल्या रॅम्प वॉकसाठी अभिनेत्रीने ‘मेलिसा इंडिया’ ब्रँडने डिझाइन केलेल्या ब्लॉक हील्स घातल्या होत्या. या हील्सची किंमत संबंधित ब्रँडच्या वेबसाइटवर ६ हजार ९९९ रुपये एवढी नमूद करण्यात आली आहे.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

दरम्यान काही लोकांनी मृणालच्या या लुकचे कौतुक केलं आहे तर काहींनी नापसंतीही दर्शवली.

(सोनमच्या लग्नात जॅकलीनने परिधान केला होता साडेसात लाख रुपयांचा लेहंगा, तर करीनाच्या ड्रेसची होती एवढी)

मृणाल ठाकूरचा सुंदर व मोहक लुक
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *