Malaika Arora Style मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा

Spread the love

फ्लोर स्वीपिंग गाउन असो वा मिनी ड्रेस, स्टायलिश ड्रेस असो किंवा आकर्षक प्रिंट असणारे डिझाइनर ड्रेस; ग्लॅमरस अवतार कसा कॅरी करायचा याची मलायका अरोराला चांगलीच माहिती आहे. शॉर्ट ड्रेस, स्लिप ड्रेस, कफ्तान ड्रेस इत्यादी प्रकारच्या आउटफिटचे शानदार कलेक्शन मलायका अरोराच्या वॉर्डरोबमध्ये पाहायला मिळतं. पण या अभिनेत्रीचे ऑन-स्क्रीन लुक सहजासहजी कॅरी करणं सोपी बाब नाही.
(वादविवादांव्यतिरिक्त ‘Bigg Boss 14’ अभिनेत्री गौहर खानच्या ‘या’ गोष्टीमुळे आहे चर्चेत)

स्टायलिश आणि फॅशनेबल दिसण्याचा व वयाचा काहीही संबंध नसतो, हे मलायकाने (Malaika Arora) आतापर्यंत कित्येकदा सिद्ध केले आहे. तिचा प्रत्येक लुक पाहण्यासारखा असतो. ही अभिनेत्री सध्या टेलिव्हिजनवरील एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोसाठी तिनं मोनोक्रोमॅटिक व्रॅप ड्रेस परिधान केला होता. मलायकाचा हा ड्रेस प्रचंड बोल्ड आणि स्टायलिश होता. हा फॅशनेबल ड्रेस परिधान करून मलायका जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा उपस्थितांची नजर तिच्यावरच खिळली होती.
(Lakme Fashion Weekमध्ये मृणाल ठाकूरने परिधान केला होता ‘हा’ ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का)

​कसे होतं आउटफिट?

डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडसाठी मलायका अरोराने ऑस्ट्रेलियन फॅशन डिझाइनर Toni Maticevski ने डिझाइन केलेला मिनी ब्लॅक व्रॅप ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर तुम्ही PVC Fabric पासून तयार करण्यात आलेलं नेकलाइन डिझाइन पाहू शकता. फुल स्लीव्ह्ज आणि कोर्सेट बेल्टमुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे. याव्यतिरिक्त ड्रेसमध्ये ब्लॅक अँड व्हाइट डबल शेड रंगासह Asymmetric बो पॅटर्न देखील जोडण्यात आलं आहे.

(बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा ग्लॅमरस अवतार, तिचे हे स्टायलिश फोटो पाहिले आहेत का?)

​मलायकाचा स्टायलिश लुक

या मोनोक्रोम ड्रेसला परफेक्ट टच देण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त गोष्टी जोडण्याची अथवा परिधान करण्याची खरंतर आवश्यकता नाही. पण मलायकाने ‘Roopa Vohra Fine Jewellery’च्या कलेक्शनमधील गोल्डन ब्रेसलेट आणि स्टड ईअररिंग्ज परिधान केले होते.

(गुलाबी रंगाची क्रेझ : कपड्यांपासून ते फॅशनेबल वस्तूंपर्यंत हवाहवासा गुलाबी रंग)

Maneka Harisinghaniने मलायकाला हा स्टायलिश लुक दिला होता. स्मोकी आईज, लाइट टोन लिपस्टिक, आयशॅडो, हाइलाइटर, मस्कारा अशा स्वरुपातील मेकअप मलायकाने केला होता.

(प्रसिद्ध डिझाइनर तरुण तहिलियानीने लाँच केले ब्रायडल लेहंग्यांचे नवं कलेक्शन)

​​ड्रेसची किंमत ऐकून बसेल धक्का

मलायका अरोराचा हा ड्रेस अतिशय स्टायलिश आणि सुंदर आहे. आपल्याही वॉर्डरोब कलेक्शनमध्ये स्टायलिश पॅटर्नचा ड्रेस असावा, अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. पण या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

मलायका अरोराने परिधान केलेला हा ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस डिझाइनरच्या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे या ड्रेसची किंमत ८४ हजार ३३६ रुपये एवढी आहे.

(प्रेग्नेंसीमध्ये अनुष्का शर्मा परिधान करतेय अशा प्रकारचे स्टायलिश आउटफिट)

ड्रेसची किंमत कितीही असो, पण चाहत्यांना मलायकाचा हा लुक प्रचंड आवडला आहे. तिच्या लुकवर चाहते फिदा झाले आहेत.

​PVC फॅब्रिक म्हणजे काय ?

pvc-

PVC फॅब्रिक मऊ असते. जे प्लास्टिकच्या पातळ पिशवीसमान दिसते. या फॅब्रिकचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय चमकदार असते. दरम्यान मलायका हा ड्रेस पूर्णतः पीव्हीसी फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेला नाही.

(इतक्या वर्षांनंतर जेव्हा माधुरी दीक्षितच्या स्टायलिश ड्रेसबद्दल ट्रोलर्स म्हणाले, ‘अखियाँ मिलाऊँ या चुराऊँ…’)

या व्रॅप ड्रेसचा केवळ नेकलाइनचा भाग PVC फॅब्रिकपासून डिझाइन करण्यात आला आहे.

(सारा अली खानची ‘ही’ साडी पाहून नेटिझन्सना हसू आवरेना, अशा केल्या होत्या कमेंट्स)

फॅशनिस्ता मलायका अरोरा
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *