#MeanestMonsterEver : Samsung Galaxy M51 च्या कॅमेऱ्याची Mo-B वर मात; Galaxy M51 3: Mo-B 0

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून Samsung Galaxy M51 आणि Mo-B यांच्यातील #MeanestMonsterEver साठी सुरू असलेल्या लढाईची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्या दोन फेरींमध्ये Samsung विरोधात Mo-B चितपट झाला. सलग दोन फेऱ्यांमध्ये पराभव झाल्यामुळे Mo-B ने Samsung Galaxy M51 चं वर्चस्व मान्य करावं, असं नेटिझन्सचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी Mo-B आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण किती दिवस हा आत्मविश्वास पुरणार याची खात्री नाही. Samsung Galaxy M51 ने आपल्या कॅमेऱ्याची ताकद सिद्ध करत Meanest Monster Ever टायटल मिळवलंय खरं, पण Mo-B ऐकायला तयार नाही. दोन पराभवांनंतर त्याने आणखी एक चॅलेंज दिलं आणि हे चॅलेंज आहे #MonsterCamera साठी. कॅमेरा ही M Series ची नेहमीच ओळख राहिलेली आहे आणि Galaxy M51 च्या कॅमेऱ्याला आव्हान देऊन संकट ओढावून घेण्यासारखं आहे.

Mo-B साठी हा आणखी एक अपमानास्पद पराभव होता, की स्वतःची प्रतिष्ठा राखली ते पाहणं औत्सुक्याचं होतं. काय झालं ते तुम्हीच पाहा.


आता, Samsung Galaxy M51 ने #MonsterCamera फेरीत Mo-B वर मात कशी केली हे सांगण्याची गरज आहे का? Samsung ने गेल्या काही वर्षात आपल्या M Series च्या फोनद्वारे फोटोग्राफीचा अनुभवच बदलून टाकला आहे. Galaxy M51 मध्येही असेच स्पेसिफिकेशन आहेत. त्यामुळेच या प्रकारातही Mo-B ने Samsung ला आव्हान दिलं. #MeanestMonsterEver Galaxy M51 मध्ये दमदार Quad-Cam आहे. Samsung Galaxy M51 मध्ये Single Take फीचरही असल्यामुळे Samsung ची फोटोग्राफी आणखी खास बनते. या फोनला खास बनवणारे फीचर्स पाहा.

दमदार रिअर कॅमेरा सेटअप

Samsung Galaxy M51 चं वैशिष्ट्य म्हणजे यात 64MP कॅमेरा आहे, ज्याला Sony IMX 682 लेन्स f/1.8 Aperture Size आणि of 0.7 um Pixel सह आहे. म्हणजेच या कॅमेऱ्याची क्षमता दुप्पट होते. #MeanestMonsterEver होण्यासाठी या फोनमध्ये अजून बरंच काही आहे. यात 12MP Ultra-wide lens आहे, ज्याला 123-degree field of view सपोर्ट आहे. तुमच्या इंस्टाग्राम फोटोंसाठी यात 5 MP लाइव्ह फोकस कॅमेरा आहे, जो पोर्ट्रेट फोटोंसाठी खास आहे. तुम्हाला फक्त मायक्रो फोटोग्राफी करायची असेल, तर यात 5MP मायक्रो कॅमेराही आहे.

फ्रंट कॅमेरा

सेल्फीसाटी Samsung Galaxy M51 मध्ये f/2.2 Aperture सह 32MP कॅमेरा आहे. यातील Single Take फीचरसुद्धा अत्यंत उपयोगाचं आहे. तुम्ही Front Slow Motion व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकता. या 32MP कॅमेऱ्यात तुम्ही 4K व्हिडीओ सुद्धा घेऊ शकता. आणखी सुंदर अनुभवासाठी AR Doodle आणि AR Emoji चा पर्यायही वापरून पाहू शकता.

Single Take

Samsung च्या फोनमध्ये नेहमीच नाविन्यता असते आणि Monster Galaxy M51 यापैकीच एक उदाहरण आहे. या फोनच्या Single Take फीचरमुळे तुम्हाला एकाच क्लिकमध्ये 10 प्रकारचे शॉट्स घेता येतात. यासाठी फक्त कॅमेरा ओपन करा आणि Single Take पर्याय निवडा. या फीचरमधून विविध प्रकारचे 10 फोटो आणि व्हिडीओ काढू शकता. शिवाय रिअर कॅमेरा ते फ्रंट कॅमेरा स्विच करण्याचीही सुविधा यात आहे. जास्त फोटो काढायची सवय असेल तर हे फीचर गेम चेंजर आहे.

अद्वितीय व्हिडीओ अनुभव

#MeanestMonsterEver टायटलच्या लढतीत Mo-B वर मात करण्यासाठी हे फीचर पुरेसे होते, पण यादी इथेच संपत नाही हे त्याला माहित नव्हतं. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात वाइड अँगल ऑटो स्विचही आहे. स्विचिंग फीचर व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्येही आहे, ज्यात युझर्स फ्रंट आणि रिअर कॅमेरा रेकॉर्डिंग चालू असतानाही स्विच करू शकतात. रात्री फोटो काढण्याचीही चिंता करू नका. कारण, या फोनमध्ये Night Hyperlapse अद्ययावत Night mode आहे, ज्यामुळे अत्यंत कमी उजेडातही स्पष्ट फोटो येतात.

Galaxy M51 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या 99 फिल्टर्सचा पर्याय मिळतो, ज्याने तुमच्या मुडनुसार फोटो काढू शकता. यामधील सीन ऑप्टिमायझरच्या माध्यमातून तुम्ही Exposure, Contrast, White Balance आणि बरंच काही नियंत्रित करू शकता. विशेषतः व्हिडीओसाठी यात UHD (4K) व्हिडीओ रेकॉर्डिंगसह Super Slo-Mo, Hyperlapse पर्याय आहे. अल्ट्रा वाइड लेन्स आणि अल्ट्रा वाइड नाइट शॉट्सच्या मदतीने तुम्ही पॅनोरमा शुट करू शकता. विशेष म्हणजे Galaxy M51 मध्ये Super Steady मोड आहे, ज्याने व्हिडीओ शेक होण्याची भीती राहत नाही.

video

तिसरी चूक: Mo-B चुकांमधून शिकत नाही

#MeanestMonsterEver च्या लढाईतील तिसरी फेरी #MonsterCamera मध्येही Mo-B चा पराभव झाला. पहिल्या फेरीत Galaxy M51 च्या Monster 7000mAh बॅटरीने Mo-B वर मात केली. यानंतर अपेक्षा होती, की Mo-B आता #MeanestMonsterEver मधून माघार घेईल. पण त्याने Samsung Galaxy M51 ला आणखी एक आव्हान दिलं आणि ते होतं #MeanestProcessor! निकाल काय होता? Galaxy M51 च्या वेगवान Qualcomm® Snapdragon™ 730G Processor ने Mo-B ला त्याची जागा दाखवून दिली आणि 2-0 असा निकाल लावला.

#MonsterCamera फेरीतही Mo-B पिछाडीवर पडल्यानंतर Mo-B ला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींनीही त्यांचं मत बदललं. टायगर श्रॉफनेही मान्य केलं, की Galaxy M51 हा Mo-B वर भारी भरला.

Samsung Galaxy M51 च्या दमदार फीचर्सने Mo-B वर मात केली आहेच, त्यामुळे आता तो माघार घेऊन Samsung Galaxy M51 हाच #MeanestMonsterEver आहे हे मान्य करणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे. अगोदरच तीन गुणांनी पिछाडीवर असल्यामुळे आता सन्मानपूर्वक माघार घेणंच सोयीचं आहे. पण Mo-B चा आत्मविश्वास पाहता थोडं आश्चर्य वाटू शकतं. Mo-B पुढे काय करतो ते पाहत राहा. सलग तीन पराभवानंतर काही तरी मोठं होणार हे नक्की आहे.

Samsung चा हा #MeanestMonsterEver फोन 10 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता Amazon आणि Samsung.com वर लाँचिंगसाठी सज्ज आहे. तोपर्यंत Mo-B कोणते पत्ते खोलणार आणि जवळपास निश्चित विजेता झालेल्या Galaxy M51 ला टक्कर देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमकडून प्रकाशित करण्यात आली आहे.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *