Natural Hair Care केसांना चांगला रंग येण्यासाठी मेंदीमध्ये काय मिक्स करावे?

Spread the love

​हेअर पॅकसाठी लागणारी ​सामग्री

दोन कप मेंदी पावडर, दोन चमचे कॉफी पावडर, अर्धा कप इंडिगो पावडर, एक अंड

हेअर पॅक तयार करण्याची पद्धत :

मोठ्या लोखंड्याच्या वाटीमध्ये मेंदी पावडर घ्या. गॅसवर दुसऱ्या भांड्यामध्ये एक ग्लास पाण्यात कॉफी पावडर उकळत ठेवा. थोड्या वेळाने या पाण्यामध्ये मेंदीची पावडर मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट तुम्हाला कोरडी वाटत असल्यास त्यात आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्या. यानंतर सहा तासांसाठी ही पेस्ट एका भांड्यात ठेवून द्यावी.

(Hair Oil केमिकलयुक्त हेअर डाय ठेवा दूर, केसांसाठी वापरा हे नैसर्गिक तेल)

​इंडिगो पावडर

यानंतर एका वाटीमध्ये इंडिगो पावडर घ्या. यामध्ये थोडे-थोडे पाणी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट १५ मिनिटांसाठी तशीच ठेवून द्यावी. ही पेस्ट थोड्या वेळानंतर मेंदीमध्ये मिक्स करा. सर्वात शेवटी यात अंड मिक्स करा. आपल्याला अंड्याचा वापर करायचा नसल्यास हा पर्याय तुम्ही सामग्रीतून वगळू शकता.

(Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा)

​केसांना मेंदी कशी लावावी?

केसांना कंगवा करा आणि तीन भागांमध्ये केसांची विभागणी करून घ्यावी. प्लास्टिकचे ग्लोव्ह्ज हातात घालून संपूर्ण केसांना चांगल्या पद्धतीने मेंदी लावा. मुळांपासून ते केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत मेंदी लावावी. मेंदी लावून झाल्यानंतर केसांचा अंबाडा बांधावा आणि शॉवर कॅप घालावी. दोन ते तीन तासांसाठी केसांमध्ये मेंदी राहू द्यावी. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. केस धुतल्यानंतर तुम्हाला ते कोरडे वाटतील. केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तेल मसाज करावा. तेल रात्रभर केसांमध्ये राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हर्बल शॅम्पूने केस धुऊन घ्या.

(Home Remedies For Skin या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक)

​इंडिगोमुळे केस होतात काळे

इंडिगो ही एक वनस्पती आहे, याची पाने सुकवून पावडर तयार केली जाते. केसांना काळा रंग येण्यासाठी तुम्ही इंडिगोचा डाय स्वरुपात वापर करू शकता. हा उपाय पूर्णतः नैसर्गिक आहे. यामुळे केसांवर दुष्परिणाम होत नाहीत. या पानांची पावडर तुम्ही मेंदीमध्ये मिक्स करून लावू शकता अथवा थेट केसांवर याचा वापर करू शकता.

(Natural Hair Care दही आणि केळ्यापासून घरामध्ये कशी तयार करायची हेअर स्पा क्रीम? जाणून घ्या माहिती)

​केसांना मेंदी लावण्याचे फायदे

मेंदी थंड असते आणि यामध्ये अँटी फंगल व अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत. या गुणधर्मांमुळे कोंडा, टाळूला खाज सुटणं यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. मेंदीमुळे केसगळती रोखण्यास मदत मिळते आणि केसांची वाढही चांगली होती. यातील औषधी गुणधर्मामुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते.

(Hair Care Tips मुळ्यापासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक?)

​फायद्याची गोष्ट

केसांना मेंदी लावण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवा. यासाठी लोखंडाच्या भांड्याचा वापर करावा. कधीही स्टील, सेरेमिक किंवा प्‍लास्‍टिकच्या भांड्याचा उपयोग करू नये. तसंच केसांना रात्रभर मेंदी लावून ठेवून नये. यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते.

(Natural Hair Care मेथी व सुकलेल्या आवळ्यापासून तयार केलेलं पाणी केसांसाठी कसे वापरावे?)

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा, तज्ज्ञमंडळीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *