Natural Hair Care माधुरी दीक्षितने सांगितलं सुंदर व काळ्या केसांचे सीक्रेट, आठवड्यातून एकदा लावते हे तेल

Spread the love

​पौष्टिक आहार

केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. केस मजबूत आणि घनदाट देखील होतात.

(Hair Care मऊ आणि चमकदार केस हवे आहेत ? जाणून घ्या कसं फॉलो करायचं ग्लास हेअर ट्रेंड)

​​तेल मसाज

माधुरी दीक्षित आठवड्यातून एकदा ऑलिव्ह ऑइल आणि एरंडेल तेलाने केसांचा मसाज करते. केसांना तेल लावून हलक्या हाताने टाळूचा मसाज करावा. यामुळे केस मुळासह मजबूत होतात. तेल लावल्यानंतर थोड्या वेळाने हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. यामुळे टाळूवर जमा झालेली दुर्गंध, कोंडा आणि अतिरिक्त तेल स्वच्छ होण्यास मदत मिळेल. केसांना कंडिशनर आणि सीरम लावायला देखील विसरू नका.

(Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष)

​ओल्या केसांची कशी काळजी घ्यावी?

घराबाहेर जाण्यापूर्वी आपण हेअर वॉश करत आहात तर मग हलक्या हाताने कंगवा करावा. आवश्यकता नसल्यास ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवू नये. अन्यथा केस तुटण्याची शक्यता आहे. तसंच केस सुकवण्यासाठी ड्रायरचीही मदत घेऊ नये.

(Winter Hair Tips थंडीमध्ये केस होतात जास्त कोरडे? अशी सात प्रकारे घ्या योग्य काळजी)

​केस ट्रिम करा

लांबसडक केस प्रत्येकालाच हवे असतात. पण केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी वेळ कोणाकडेही नसतो. केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ठराविक दिवसांच्या अंतराने केस ट्रिम करा. ट्रिमिंगमध्ये खराब आणि निर्जीव झालेले केस कापले जातात.

(काळ्याशार व घनदाट केसांसाठी वापरा मोसंबीचा रस, जाणून घ्या शॅम्पू तयार करण्याची पद्धत)

​केसगळतीकडे करू नका दुर्लक्ष

संशोधनातील माहितीनुसार, नियमित १०० ते १५० केस गळल्यास, चिंता करण्याचे कारण नाही. पण याहून अधिक केस गळत असतील तर मग या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे.

(क्रीम-लोशनची गरज भासणार नाही, सतेज त्वचेसाठी जाणून घ्या आयुर्वेदिक ब्युटी टिप्‍स)

​निरोगी केसांसाठी कसे तयार करावे घरगुती मास्क व तेल

मध व अंडे

केस निर्जीव आणि कमकुवत झाल्यासारखे वाटत असतील तर घरगुती हेअर मास्कची मदत घ्यावी. एका वाटीमध्ये मध आणि अंडे एकत्र घ्या. दोन्ही सामग्री नीट एकजीव करा. हे मिश्रण टाळू आणि मुळांसह सर्व केसांवर लावा. ३० ते ४० मिनिटांनंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.

(त्वचा भाजणे म्हणजे नेमके काय? यावर कोणते उपचार करावेत, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती)

​​बेसन आणि ऑलिव्ह ऑइल

कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हे मास्क रामबाण उपाय आहे. बेसनमध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर संपूर्ण केसांवर लावा. अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने केस धुवावेत. यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरचा देखील उपयोग करावा.

(नितळ व डागविरहित त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर अशा पद्धतीने लावा कोरफड जेल)

​केळी आणि नारळाचे तेल

वेगवेगळ्या हेअर स्टाइलमुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. केसांच्या नैसर्गिक रंगावरही परिणाम होतो. हे नुकसान टाळण्यासाठी व केसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केळी, नारळाचे तेल, ग्लिसरीन आणि मध एकत्र घ्या व हेअर पॅक तयार करा. पॅक अर्ध्या तासांसाठी केसांवर लावा. यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या.

NOTE : केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नये. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे हेअर केअर रुटीन फॉलो करण्याचीही चूक करू नका.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *