Natural Hair Care मेथी व सुकलेल्या आवळ्यापासून तयार केलेलं पाणी केसांसाठी कसे वापरावे?

Spread the love

बदलत्या हवामानामुळे केसांशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. काहींचे केस गळण्यास सुरुवात होते तर काही लोक कोंड्यामुळे त्रस्त असतात. केसगळती थांबत नसल्याने तुम्ही देखील त्रासले आहात का? ही समस्या दूर होण्यासाठी आतापर्यंत भरपूर उपाय केले का? चिंता करू नका. केसगळती रोखण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपचारांची मदत घेऊ शकता. मेथी आणि आवळ्याच्या पाण्याचा केसांसाठी वापर करावा. या दोन्ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा योग्य वापर केल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.

आवळा आणि मेथीच्या पाण्यानं केस धुतल्यास काही दिवसांत तुम्हाला केसांमध्ये चांगले फरक दिसतील. पण यासाठी आवळा पावडर किंवा ताज्या आवळ्यांचा वापर करू नये. सुकलेल्या आवळ्याचा वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. मेथीचे दाणे तर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहजरित्या आढळतात. आता जाणून घेऊया हा आयुर्वेदिक फॉर्म्युला तयार करण्याची आणि केसांसाठी वापरण्याची सर्वात सोपी पद्धत.
(Hair Care Tips कसे तयार करायचे मुळ्यापासून घरगुती हेअर पॅक? )

​आयुर्वेदिक पाणी : लागणारी सामग्री

तीन चमचे मेथी, मुठभर सुकलेले आवळे, मुठभर पुदिन्याची पाने, तीन ते चार मोठे ग्लास पाणी

पाणी तयार करण्याची पद्धत : पॅनमध्ये मेथीचे अख्खे दाणे, सुकलेले आवळे, पुदिन्याची पाने आणि पाणी एकत्र घ्या. यावर झाकण ठेवा आणि सर्व सामग्री रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी उठल्यानंतर पाच ते १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर सर्व सामग्री गरम करत ठेवा. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्यावे. यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गाळून घ्यावे.

(Natural Hair Care दही आणि केळ्यापासून घरामध्ये कशी तयार करायची हेअर स्पा क्रीम? जाणून घ्या माहिती)

​कसा करावा वापर?

हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. थोड्या वेळाने केसांना कंडिशनर लावा आणि पाण्याने केस पुन्हा स्वच्छ धुवावेत. यानंतर तयार केलेल्या हर्बल पाणी हळूहळू आपल्या केसांवर ओतावे. हे पाणी मुळांसह संपूर्ण केसांपर्यंत पोहोचेल, याची काळजी घ्यावी. १५ ते २० मिनिटांसाठी हर्बल पाणी केसांमध्ये राहू द्यावे. थोड्या वेळानंतर साध्या पाण्याने आपले केस पुन्हा धुऊन घ्या.

(Natural Hair Care नैसर्गिक सामग्रींपासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक)

​किती वेळा करावा उपाय?

हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. यामुळे तुम्हाला केसांमध्ये लगेचच फरक जाणवणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य पद्धत फॉलो केल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल. केसांमध्ये सकारात्मक बदल पाहण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा लागेल. सलग सात ते आठ आठवडे या हर्बल पाण्याचा उपयोग करावा. म्हणजे केसगळती, कोंडा इत्यादी त्रास दूर होण्यास मदत मिळेल.

(Home Remedies For Skin या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक)

​आवळ्यामुळे केसगळती कशी दूर होते?

आवळा आपल्या केसांसाठी एक सूपरफुडप्रमाणे कार्य करते. यामध्ये पोषक तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आवळा हे फळ केसगळती रोखण्यासाठी रामबाण उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिजे, अमिनो अ‍ॅसिड आणि फायटोन्युट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक आपल्या टाळूच्या भागातील रक्तप्रवाह वाढवतात. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. केस तुटणे आणि केस गळतीची समस्या बरीच कमी होते.

(Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा)

​मेथीमुळे केसांवर येते नैसर्गिक चमक

मेथीमधील नैसर्गिक घटकांमुळे आपल्या केसांवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. निर्जीव, निस्तेज आणि कोरड्या केसांची समस्या कमी होते. मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असते. या घटकांमुळे केस गळणे आणि कोंड्याची समस्या दूर होते. टक्कल पडणे, केस पातळ होणे, इत्यादी कित्येक समस्या मेथीच्या वापरामुळे कमी होऊ शकतात.

(Hair Care Tips केस रोज धुण्याची आहे सवय? यामुळे होणारे नुकसान तुम्हाला माहिती आहेत का)

NOTE : केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *