Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष

Spread the love

​पांढरे केस खेचून काढणे

काही जणांना पांढरे केस अजिबात आवडत नाही. यामुळे बहुतांश जण केसांना डाय करतात तर काही जण पांढरे केस खेचून काढतात किंवा कात्रीने कापतात. पण या सवयीमुळे तुमचे केस पातळ होताहेत, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण मुळासकट केस खेचून काढता, तेव्हा टाळूच्या त्वचेवरील रोमछिद्रांवर वाईट परिणाम होतात. परिणामी फॉलिकल पातळ होत जातात.

(Winter Hair Care Tips हिवाळ्यात होणाऱ्या कोरड्या केसांच्या समस्येतून हवीय सुटका?)

​केसांची योग्य देखभाल न करणं

अधिक वेळ उन्हात राहिल्याने हेअर क्युटिकलचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे देखील केस पातळ होऊ शकतात. हे नुकसान टाळण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपले केस टोपी किंवा रुमालाने झाकावेत. याव्यतिरिक्त तुम्ही एसपीएफयुक्त हेअर प्रोडक्टचाही वापर करू शकता. हे उपाय केल्यास तुमच्या केसांचं सूर्यांच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल.

(Hair Care Tips केसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन; मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर)

​चुकीची हेअर स्टाइल

हेअर स्टाइल करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही केस पातळ होऊ शकतात. उदाहरणार्थ टाइट मॅन बन (अंबाडा) किंवा पोनी टेल बांधल्यानं केसांच्या मुळांवर ताण येतो. यामुळे केस पातळ होऊन तुटण्याची समस्या निर्माण होते. ही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी केस सैल बांधावते.

(केसगळती रोखण्यासाठी करा हा रामबाण उपाय, महिन्याभरात केसांमध्ये दिसेल आश्चर्यकारक फरक)

​अति प्रमाणात शॅम्पू करणं

केस नियमित शॅम्पूने धुणे चांगले असते, असा अनेकांचा समज असतो. पण वास्तविक या सवयीमुळे आपले केस कोरडे आणि कमकुवत होतात. अति प्रमाणात शॅम्पूचा वापर केल्यास केस पातळ होऊ लागतात. आठवड्यातून दोनदा शॅम्पूनं केस धुवावेत. तसंच हर्बल शॅम्पूचा वापर करावा. यामुळे आपल्या हेअर फॉलिकलचे संरक्षण होते. केस पातळ होऊ नयेत, यासाठी मॉइश्चराइझिंग शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा.

(पहिल्या प्रेग्नेंसीनंतर करीना केसगळतीमुळे होती त्रस्त, ऋजुता दिवेकरने तिला सांगितले हे उपाय)

​धूम्रपान करू नये

धूम्रपानाच्या सवयीमुळेही केस पातळ होतात. धूम्रपान केल्यानं डोक्याच्या भागातील रक्तप्रवाह कमी होतो. याव्यतिरिक्त धूम्रपानामुळे ऑक्सिडेटिव स्ट्रेस देखील वाढतो. यामुळे केसांच्या वाढीवर वाईट परिणाम होतात. तसंच केस प्रचंड पातळ देखील होतात.

(Essential Oil शुद्ध एसेंशिअल ऑइल कसे ओळखावे? या ५ गोष्टी तपासणं आहे गरजेचं)

​नाश्ता न करणे

निरोगी आरोग्य आणि केसांसाठी पौष्टिक नाश्त्याचे सेवन करणं अतिशय आवश्यक आहे. नाश्त्यातील पौष्टिक खाद्यपदार्थांद्वारे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये दिवसभरासाठी ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. नाश्ता न करण्याच्या सवयीमुळे सुद्धा केस पातळ आणि कमकुवत होऊ शकतात.

(कुरळ्या केसांची कशी करावी देखभाल? कसं तयार करायचं ‘हे’ हेअर पॅक)

या चुकीच्या सवयींमुळे तुमच्या केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. केसांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी धूम्रपान करू नये. तसंच हेअर केअर रुटीन देखील योग्य पद्धतीने फॉलो करावं.

NOTE केसांशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यास सर्व प्रथम आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच औषधोपचार करावेत.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *