Natural Hair Care लांबसडक केसांसाठी करा आपल्या आजीनं सांगितलेले ‘हे’ घरगुती उपाय

Spread the love

​कडुलिंबाच्या पानांची पेस्ट

हिवाळ्यामध्ये केसांमधील ओलावा कमी होतो, ज्यामुळे कोंडा होणे आणि केसगळतीसारख्या समस्या उद्भवतात. ही समस्या दूर करण्यासाठी आपण कडुलिंबाच्या पानांपासून हेअर पॅक तयार करू शकता. कडुलिंबाची पाने मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. या पेस्टमध्ये आवश्यकतेनुसार दही मिक्स करा. हे पॅक मुळांसह संपूर्ण केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस हर्बल शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्या.

(Hair Care लांबसडक केस असल्यास ‘या’ चुका करणं तुम्हाला पडू शकतं महाग)

​दही आणि मेंदी

दही आपल्या केसांसाठी पोषक मानले जाते. आपण दही आणि मेंदीच्या पानांपासून हेअर पॅक तयार करू शकता. हे पॅक आपल्या केसांसाठी कंडिशनरप्रमाणे कार्य करते आणि यामुळे मऊ व चमकदार होतात. ही पेस्ट अर्धा तासासाठी केसांवर लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. केस सुकल्यानंतर नैसर्गिक तेलाने केसांचा मसाज करावा. ३० मिनिटांनंतर केस हर्बल शॅम्पूने धुऊन घ्यावेत.

(Natural Hair Care केसांच्या वाढीसाठी ‘हे’ व्हिटॅमिन्स आहेत पोषक, केसगळतीची समस्याही होते दूर)

​प्रोटीन

आपल्या केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रोटीनचा पुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी आपण अंड्याची मदत घेऊ शकता. दोन चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये एक अंडे मिक्स करा आणि हेअर पॅक तयार करा. हे पॅक केसांवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर केस हर्बल शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्या. या पॅकमुळे केसांवर नैसर्गिक चमक येईल आणि दुभंगलेल्या केसांचीही समस्या कमी होईल.

(Hair Loss in Men या वाईट सवयींमुळे ३० वर्षांचे तरुणही करताहेत टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना)

​​​ब्राह्मी

लांबसडक केसांसाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती ब्राह्मी, जटामांसी, आवळा आणि भृंगराज एकत्र घ्या आणि वाटा. या औषधी वनस्पतींचा रस काढा आणि मुळांसह केसांना लावा. हलक्या हाताने टाळूचा मसाज करावा. हा उपाय नियमित केल्यास केसांची वाढ होण्यास मदत मिळेल.

(Ayurvedic Remedies टाळूला येणारी खाज कमी करण्यासाठी करा हे आयुर्वेदिक उपाय, केसगळतीही होईल कमी)

​शिकेकाई आणि सुकवलेला आवळा

शिकेकाई आणि सुकवलेला आवळा दूध व पाण्यामध्ये मिक्स करा. या सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने वाटून घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर मिश्रण एका वाटीमध्ये गाळून घ्या आणि या पेस्टनं मुळांसह केसांचा हलक्या हाताने मसाज करा. यानंतर एका तासाने केस स्वच्छ धुऊन घ्या. केस सुकल्यानंतर नारळ किंवा बदामाच्या तेलाने केसांचा मसाज करावा. या नैसर्गिक उपचारांमुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळू शकते.

(Natural Care चमकदार व लांबसडक केसांसाठी घरच्या घरी तयार ‘हे’ प्रोटीन पॅक हेअर मास्क)

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *