Natural Remedies काळवंडलेल्या अंडरआर्म्सची समस्या कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय, नियमित १० मिनिटे काढा वेळ

Spread the love

​कच्चा बटाटा

काखेची त्वचा काळी पडली असेल तर यावर नैसर्गिक उपाय म्हणून आपण कच्च्या बटाट्याचा उपयोग करू शकता. नियमित २० मिनिटे कच्च्या बटाट्याने काखेच्या काळ्या पडलेल्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करावा. बटाट्यातील पोषण तत्त्व आपल्या त्वचेसाठी लाभदायक असतात. योग्य पद्धतीने उपाय केल्यास काळवंडलेल्या अंडरआर्म्सची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळेल.

(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)

​कसा करावा बटाट्याचा वापर?

एक मध्यम आकारातील बटाटा घ्या व पाण्याने स्वच्छ धुऊन त्याची साल काढा. यानंतर बटाटा किसून घ्या. बटाट्याचा रस फेकू नका. किसलेला बटाटा आपल्या अंडरआर्म्सच्या त्वचेवर लावा आणि १० मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर १० मिनिटांसाठी बटाट्याचा रस कापसाच्या मदतीने काखेवर लावा. रस सुकल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करावी.

(ग्लुटाथिओनमुळे चेहऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण शरीराची त्वचा उजळते, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती)

​कोरफड

त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी ‘कोरफड’ रामबाण उपाय आहे. आयुर्वेदामध्ये या औषधी वनस्पतीला भरपूर महत्त्व आहे. तुमच्या घरामध्ये कोरफडीचे रोप असल्यास त्यापासून घरच्या घरी नैसर्गिक स्वरुपात जेल तयार करा. हे जेल आपण अंडरआर्म्स तसंच चेहऱ्यावरही लावू शकता. यासाठी कोरफडीचे एक पान कापून घ्या. यातील गर एका वाटीमध्ये काढा. कोरफडीचा गर आपण थेट अंडरआर्म्सवर लावू शकता किंवा जेलचाही वापर करू शकता. कोरफड जेल लावल्यानंतर हलक्या हाताने अंडरआर्म्सचा मसाज करावा.

(द्राक्षबियांच्या तेलाचे त्वचा आणि केसांसाठी फायदे, जाणून घ्या कसा करायचा वापर)

​कोरफडीचे त्वचेसाठी फायदे

व्हिटॅमिन आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत म्हणजे कोरफड. हे घटक निर्जीव आणि निस्तेज त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करतात. त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी कोरफड प्रभावी उपाय आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोरफड जेलने अंडरआर्म्सचा मसाज केल्यास तुम्हाला त्वचेमध्ये हळूहळूफरक जाणवेल. कोरफड जेल अंडरआर्म्सवर लावा, १० मिनिटांसाठी मसाज करा. त्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी जेल त्वचेवर लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने आंघोळी करावी.

(थंडीत बॉडी मसाज का करावा, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ? जाणून घ्या)

​मुलतानी माती

आयुर्वेदिक उपचारांमध्ये मुलतानी मातीला महत्त्वाचे स्थान आहे. यातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचेवरील मृत पेशी काढण्यास मदत मिळते. त्वचेवरील रोमछिद्र देखील स्वच्छ होतात. काळवंडलेल्या अंडरआर्म्सची समस्या दूर करण्यासाठी आपण मुलतानी मातीचा उपयोग करू शकता. यासाठी मुलतानी मातीमध्ये कच्चे दूध मिक्स करा. हा उपाय केल्यास तुम्हाला त्वचेमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील तसंच त्वचेला नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चराइझरचाही पुरवठा होईल.

(त्वचेचा कर्करोग, जाणून घ्या मुख्य लक्षणे व उपचार)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *