Natural Remedies केसांच्या वाढीसाठी टाळूचे करा स्क्रबिंग, असे तयार करा घरगुती स्कॅल्प स्क्रब

Spread the love

​स्कॅल्प स्क्रबिंग म्हणजे काय?

केसांची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी टाळूची त्वचा निरोगी असणं आवश्यक आहे. आपल्या केसांचे आरोग्य निरोगी ठेण्यासाठी टाळूची त्वचा एक्सफोलिएट करणं महत्त्वाचे आहे. एक्सफोलिएशनमध्ये टाळूवरील मृत त्वचा, दुर्गंध आणि अतिरिक्त तेल स्वच्छ केले जातं. प्रदूषणामुळे किंवा केमिकलयुक्त हेअर प्रोडक्टमुळे टाळूवर धूळ, मातीचे कण जमा होऊ शकतात. आपल्यापैकी बहुतांश लोक केसांची काळजी घेतात पण टाळूच्या त्वचेकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. याच कारणामुळे टाळूवर मृत त्वचा वाढू लागते. परिणामी केसांची योग्य पद्धतीने वाढ होत नाही.

(कुरळ्या केसांची कशी करावी देखभाल? कसं तयार करायचं ‘हे’ हेअर पॅक)

​स्कॅल्प स्क्रबिंगचे फायदे

मृत त्वचेची समस्या होते दूर

जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने केस तसंच टाळू स्वच्छ करत नाही तेव्हा त्यावर धूळ, माती जमण्यास सुरुवात होते. परिणामी केसांमध्ये कोंडा देखील होऊ लागतो. याव्यतिरिक्त आपण कित्येक प्रकारच्या हेयर प्रोडक्ट्सचाही वापर करतो, उदाहरणार्थ हेअर जेल, हेअर स्प्रे इत्यादी. यामुळे टाळूच्या त्वचेवरील रोमछिद्रांवर दुष्परिणाम होतात. परिणामी केसांची वाढ खुंटते. टाळूचे स्क्रबिंग केल्यास धूळ, मातीचे कण, अतिरिक्त तेल इत्यादी काढण्यासाठी मदत मिळते.

(Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष)

​केसांच्या वाढीसाठी लाभदायक

स्कॅल्प स्क्रबिंगमुळे टाळूवरील मृत त्वचा काढण्यास मदत मिळते. यामुळे केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. केसांचे आरोग्य निरोगी राहते. तसंच टाळूवर जमा झालेले धूळ, मातीचे कण स्वच्छ होऊन नवीन केस येऊ लागतात.

(Hair Care Tips या ६ कारणांमुळे सुरू होते केसगळती; दुर्लक्ष करू नका, लवकरच करा योग्य उपाय)

​टाळूची कोरडी त्वचा आणि कोंड्याची समस्या

टाळूची त्वचा कोरडी असल्यास कोंड्याची समस्या निर्माण होऊ लागते. यामुळे आपल्या केसांमध्ये नैसर्गिक स्वरुपात तेलाचा स्त्राव होत नाही. टाळूची त्वचा एक्सफोलिएट केल्यास कोरड्या त्वचेची समस्या आणि कोंडा दूर होण्यास मदत मिळते. टाळूवर नैसर्गिक स्वरुपात स्त्राव होणाऱ्या तेलामुळे केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि टाळूची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.

(Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष)

​DIY स्कॅल्प स्क्रब

diy-

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅल्प स्क्रब उपलब्‍ध आहेत. पण या केमिकलयुक्त हेअर प्रोडक्टचा वापर करण्याऐवजी आपण घरगुती नैसर्गिक स्क्रब तयार करू शकता.

सामग्री:

१/४ कप ऑलिव्ह ऑइल

१/२ कप ब्राउन शुगर

स्‍कॅल्‍प स्‍क्रब तयार करण्याची विधि:

एका वाटीमध्ये दोन्ही सामग्री एकत्र घ्या आणि योग्य पद्धतीने मिक्स करा. या मिश्रणाने आपल्या टाळूच्या त्वचेचा मसाज करा आणि थोड्या वेळानंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

(केसगळती रोखण्यासाठी व केसांच्या वाढीसाठी रामबाण आहे ‘हे’ आयुर्वेदिक तेल)

​टाळूची त्वचा कशी करायची एक्सफोलिएट?

टाळू आणि केसांच्या प्रकारानुसार स्कॅल्प एक्सफोलिएटिंग प्रोडक्टची निवड करावी. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रोडक्ट खरेदी करावे. केसांचा मध्यातून भांग पाडून टाळूवर स्क्रब लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.

(Hair Care मऊ आणि चमकदार केस हवे आहेत ? जाणून घ्या कसं फॉलो करायचं ग्लास हेअर ट्रेंड)

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. केसांचे नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञमंडळीच्या मार्गदर्शनानुसारच हेअर केअर प्रोडक्टचा वापर करावा. तसंच दुसऱ्या व्यक्तींचे हेअर केअर रुटीन फॉलो करू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *