Natural Skin And Hair Care बहुगुणी केळ्याच्या फुलाचे फायदे, त्वचा व केसांसाठी असा करू शकता वापर

Spread the love

केळ्यामुळे आपल्या आरोग्याला भरपूर पोषक घटकांचा पुरवठा होतो, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण केळ्याचे सौंदर्यवर्धक गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत का? केळ हे एक पौष्टिक फळ आहे. यातील पोषण तत्त्वे त्वचा आणि केसांसाठी लाभदायक आहेत. ब्युटी केअर रुटीनमध्ये केळ्यासोबतच त्याच्या फुलाचाही समावेश केल्यास तुम्हाला दुप्पट लाभ मिळू शकतात. पण हे उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

एखादे महागडे फेशिअल ऑइल, हेअर सीरम, स्क्रब आणि क्रीममधील सामग्री लक्षपूर्वक वाचली तर तुम्हाला त्यामध्येही केळ्याच्या फुलाचा समावेश असल्याची माहिती मिळेल. कित्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये केळ्याच्या फुलाचा समावेश केला जातो. जाणून घेऊया या बहुगुणी फुलाचा उपयोग कसा करावा?
(Natural Hair Care केस आणि टाळूवर रात्रभर लावून ठेऊ शकता हे हेअर मास्क)

​हातांची काळजी

आपल्यापैकी प्रत्येक जण चेहऱ्याच्या त्वचेची काळजी आठवणीने घेतात. पण हात आणि पायांच्या त्वचेकडे बहुतांश जणांचे पूर्णतः दुर्लक्ष होते. परिणाम हात- पायांची त्वचा काळवंडलेली, निस्तेज, निर्जीव दिसते. यासाठी तुम्ही केळ्याच्या फुलाचा वापर करू शकता. या फुलाचा हाताची क्रीम आणि बॉडी लोशन तयार करण्यासाठीही वापर केला जातो. यामध्ये अँटी ऑक्सिडेंट एजेंट गुणधर्म आहेत. जे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

(Home Remedies अंडरआर्मच्या त्वचेची योग्य काळजी घेता का? आंघोळ करण्यापूर्वी नियमित करा या गोष्ट)

​एक्‍सफोलिएशन

अक्रोड आणि जर्दाळूचे स्क्रब तुम्ही त्वचेसाठी वापरत असाल तर यामुळे चेहऱ्याच्या नाजूक त्वचेचं नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी मायक्रोबीड्स किंवा छोट्या स्वरुपात असलेल्या दाण्यांचे स्क्रब वापरावे. ज्या स्क्रबमध्ये केळ्याच्या फुलाचा समावेश आहे, अशा प्रोडक्टचा वापर करून पाहा. चेहरा आणि मानेवर हे स्क्रब लावून हलक्या हाताने मसाज करा. १० मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यातील पोषक घटक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे कार्य करते.

(Steaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत)

​बाम

केळ्याच्या फुलाचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास कित्येक शारीरिक आजार बरे होण्यास मदत मिळते, असे म्हणतात. यामध्ये इथेनॉलचे गुणधर्म आहेत. यामुळे शरीरावरील जखम भरण्यास मदत मिळते. हे घटक तुमची त्वचा आतून स्वच्छ करण्याचे कार्य करतात आणि त्वचेला नैसर्गिकरित्या ओलावा देखील मिळतो.

(Home Remedies For Skin या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक)

​अँटी एजिंग

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंटचा साठा आहे. यास नैसर्गिक स्वरुपातील बोटोक्स म्हणूनही ओळखले जाते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि अन्य वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. तुमच्याकडे केळ्याचे फुल उपलब्ध असेल तर याचा आपल्या क्रीममध्ये समावेश करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये केळ्याचे फुल वाटून घ्या. यानंतर घरगुती मॉइश्चराइझरमध्ये केळ्याच्या फुलाची पेस्ट मिक्स करा आणि त्याचा आपल्या त्वचेसाठी वापर करा.

(Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा)

​कोंडा कमी करण्यासाठी

केळ आणि त्याच्या फुलापासून तयार केलेल्या हेअर पॅकमुळे कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते. यासाठी केळ्याचे फुल पाण्यामध्ये उकळून घ्या. यानंतर त्याचे पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्या. मिक्सरमध्ये केळे, केळ्याचे फुल, थोडेसे दूध आणि मध मिक्स करा. ही पेस्ट मुळांसह केसांना लावा. पेस्ट सुकल्यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. पण हेअर पॅकचा वापर करण्यापूर्वी कोपराच्या त्वचेवर पॅच टेस्ट करून घ्या.

(Hair Care घरच्या घरी तयार करा लसूण हेअर पॅक, जाणून घ्या फायदे)

​केसांच्या वाढीसाठी उपाय

केळ्याच्या फुलाची पेस्ट तयार करा आणि यामध्ये थोडेसे केळ देखील मॅश करा. ही पेस्ट टाळू आणि केसांवर लावा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. कारण या पॅकमध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात. यामुळे तुमचे केस मजबूत होण्यास मदत मिळते.

(Skin Care Tips चेहरा धुताना तुम्ही देखील या चुका करता का? जाणून घ्या या ५ गोष्टी)

Note त्वचा आणि केसांसाठी कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या त्वचा आणि केसांचा पोत आणि प्रकार वेगवेगळा असतो.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *