Natural Skin Care गुलाब पाण्याने घरच्या घरी फेशिअल कसे करावे, जाणून घ्या योग्य पद्धत

Spread the love

​स्‍टेप 1: क्लींझिंग

सामग्री : दोन चमचे गुलाब पाणी आणि एक चमचा कच्चे दूध

विधि : एका वाटीमध्ये एक चमचा कच्चे दूध आणि दोन चमचे गुलाब पाणी एकत्र घ्या. गुलाब पाणी हे एक उत्तम क्लींझर आहे. ज्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होण्यात मदत मिते. मिश्रण तयार झाल्यानंतर कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेले धूळ, मातीचे कण स्वच्छ होण्यास मदत मिळेल.

(Ice Cubes For Face जाणून घ्या हळद-दुधाच्या आइस क्युबने चेहऱ्यावर मसाज करण्याची पद्धत)

​स्टेप 2 : एक्सफोलिएटिंग (स्क्रबिंग)

-2-

सामग्री : एक चमचा साखर आणि दोन चमचे गुलाब पाणी

विधि : एका वाटीमध्ये एक चमचा साखर आणि दोन मोठे चमचे गुलाब पाणी एकत्र घ्या. दोन्ही सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करा. थोडे-थोडे मिश्रण हातावर घ्या आणि गोलाकर दिशेनं चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा. साखरेमुळे त्वचा मऊ होते. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. मसाज केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

(हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, रवीना टंडनने ब्युटी टिप्ससह सांगितली योग्य पद्धत)

​स्‍टेप 3 : फेशिअल मसाज

-3-

सामग्री: एक चमचा मध आणि एक चमचा गुलाब पाणी

विधि : एका वाटीमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा गुलाब पाणी मिक्स करा. हे मिश्रण हातावर घेऊन हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा. दोन ते तीन मिनिटांसाठी गोलाकार दिशेनं चेहऱ्याचा मसाज करावा. मधामुळे आपली त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास मदत मिळते.

(Natural Skin Care Tips आवळ्याच्या फेस पॅकचा कसा करावा वापर? जाणून घ्या पद्धत)

​स्‍टेप 4: फेस पॅक

-4-

सामग्री : एक चमचा चंदन पावडर आणि दोन चमचे गुलाब पाणी

विधि : एका वाटीमध्ये एक चमचा चंदन पावडर आणि दोन चमचे गुलाब पाणी मिक्स करा. जाडसर फेस पॅक तयार करावे. मान आणि चेहऱ्यावर फेस पॅक लावा. १० ते १५ मिनिटांनंतर लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या पॅकमुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील रोमछिद्रे स्वच्छ होतात. त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.

(घरच्या घरी या ६ सामग्रींपासून कसं तयार करावं बॉडी पॉलिशिंग स्क्रब, जाणून घ्या माहिती)

​स्‍टेप 5: मॉइश्चराइझिंग

-5-

सामग्री : दोन चमचे गुलाब पाणी आणि एक चमचा ग्लिसरीन

विधि : प्लेटमध्ये दोन चमचे गुलाब पाणी आणि एक चमचा ग्लिसरीन एकत्र घ्या. त्वचा तेलकट असल्यास त्यामध्ये एक 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करू शकता. मिश्रण तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करावा. मॉइश्चराइझरमुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. हे नॅचरल फेशिअल महिन्यातून एकदा तुम्ही करू शकता.

(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)

NOTE : त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी किंवा ब्युटी प्रोडक्ट वापरण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला आठवणीने घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *