Natural skin Care तांदळाच्या पाण्याने कशी तयार करायची मॉइश्चराइझिंग क्रीम, जाणून घ्या पद्धत

Spread the love

भात करण्यापूर्वी तांदूळ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतले जातात. काही जण हे पाणी फेकून देतात. पण या पाण्याचा तुम्ही आपल्या त्वचेसाठी वापर करू शकता, हे तुम्हाला माहिती आहे का? त्वचेसाठी पोषक असलेल्या कित्येक घटकांचा या पाण्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे तांदळाचे पाणी फेकण्याची चूक करू नका. त्वचा सुंदर आणि निरोगी दिसावी, यासाठी कित्येक महिला (Skin Care) तांदळाच्या पाण्याचा वापर करतात.

त्वचा रोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही देखील या नैसर्गिक उपचाराचा आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये समावेश करू शकता. दरम्यान कित्येक स्किन केअर प्रोडक्टमध्ये महत्त्वाची सामग्री म्हणून तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. यापासून तयार करण्यात येणारे क्रीम, लोशन आणि मॉइश्चराइझर इत्यादी ब्युटी प्रोडक्ट महागडे असतात. खर्च टाळण्याासाठी आणि नैसर्गिक उपचार म्हणून तुम्ही घरच्या घरी देखील तांदळाचे पाणी वापरुन मॉइश्चराइझर तयार करू शकता.
(Skin Care Tips त्वचा निरोगी राहण्यासाठी हे ५ व्हिटॅमिन आहेत आवश्यक)

​तांदळाचे पाणी आणि त्याचे फायदे

बहुतांश जण तांदूळ धुतल्यानंतर त्याचे पाणी फेकून देतात. पण तुम्ही ही चूक करू नका. याचे बहुपयोगी फायदे जाणून घेतल्यानंतर कोणीही तांदळाचे पाणी फेकण्याची चूक करणार नाही. तसंच तुम्ही स्वतःहूनच याचा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये समावेश कराल, यात शंकाच नाही.

अद्भुत मॉइश्चराइझर आणि टोनर

तांदळाचे पाणी हे एक अद्भुत मॉइश्चराइझर आणि टोनर आहे. पाण्यातील पोषक घटक आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत करतात. तसंच त्वचेवरील हायपर पिगमेंटेशन, काळे डाग किंवा सन टॅनिंग देखील दूर होण्यास मदत मिळते.

(घरामध्येही राहूनही त्वचा काळवंडलेली वाटते? ही आहेत कारणे)

कोलेजन वाढण्यात मदत मिळते

तांदळाच्या पाण्याचा नियमित वापर केल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होते. महत्त्वाचे म्हणजे या नैसर्गिक उपचारामुळे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तांदूळमधील घटक आपली त्वचा पुनरुज्जीवित करतात आणि नवीन पेशींच्या वाढीसाठी उत्तेजनही देतात. तांदळाच्या पाण्याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल. यातील औषधी गुणधर्म त्वचेतील कोलेजन वाढवण्यासही मदत करतात.

(तेलकट त्वचा असणाऱ्यांनी असे तयार घरगुती क्लींझर, चेहऱ्यावर दिसतील आश्चर्यकारक बदल)

​धूळ, माती, प्रदूषणापासून संरक्षण

तांदळामध्ये फेरुलिक अ‍ॅसिड नावाचे अँटी ऑक्सिडेंट असते. हे अ‍ॅसिड आपल्या त्वचेचे धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्याचे काम करते. धूळ, मातीच्या कणांमुळे आपल्या त्वचेचं नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.

(मुरुम आणि सुरकुत्यांवर हा आहे आयुर्वेदिक रामबाण उपाय, चेहऱ्यावर असा करावा वापर)

​DIY तांदूळ मॉइश्चराइझरसाठी लागणारी सामग्री

diy-

एक तांदूळ, दोन कप पाणी, हवाबंद डबा, कापूस

मॉइश्चराइझर तयार करण्याची पद्धत

हवाबंद डब्यामध्ये तांदूळ आणि दोन कप पाणी भरून ठेवा. चमच्याच्या मदतीने तांदूळ आणि पाणी ढवळत राहा. यानंतर डब्याला झाकण लावा. दोन तास तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. दोन तासांनंतर पाण्याचा रंग पांढरा झाल्याचे तुम्हाला दिसेल. यानंतर चमच्याने पुन्हा तांदूळ ढवळा म्हणजे त्यातील पोषण तत्त्व पाण्यामध्ये मिक्स होतील.

(हँडसम दिसण्यासाठी पुरुष देखील करू शकतात मेकअप, जाणून घ्या योग्य पद्धत)

​कसा करायचा मॉइश्चराइझरचा वापर

कापसाच्या मदतीने तांदळाचे पाणी आपल्या चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर लावलेले कापसाचे पाणी दोन मिनिटांसाठी राहू द्यावे. चेहरा सुकल्यानंतर तांदळाचे पाणी पुन्हा आपल्या चेहऱ्यावर लावा. तांदळाच्या पाण्यातील पोषण तत्त्वांचा आपल्या त्वचेला खोलवर पुरवठा होतो. यामुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते आणि त्वचा मऊ देखील होते. हे उपाय केल्यास तुम्हाला बाजारातील टोनर वापरण्याची आवश्यकता भासणार नाही. तांदळाच्या पाण्यापासून तयार केलेल्या मॉइश्चराइझरचा उपयोग तुम्ही हात, मान आणि अन्य अवयवांवरील त्वचेवरही करू शकता.

NOTE : प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार एकसारखा नसतो, त्यामुळे त्वचेसाठी कोणत्याही प्रकारचे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *