Natural Skin Care हळद, मध आणि कोरफडपासून घरगुती फेस पॅक कसे तयार करायचे?

Spread the love

चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यासाठी काही जण घरगुती, नैसर्गिकपासून ते कित्येक महागड्या ट्रीटमेंट करून पाहतात. पण या समस्येपासून काही केल्या लवकर सुटका मिळत नाही. यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात. मुरुम, मुरुमांच्या डागामुळे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचं नुकसान होतं. मुरुमांमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का? तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ग्लायकोलिक आणि सॅलिसिक अ‍ॅसिड या घटकांचा समावेश असलेल्या फेश वॉशचा वापर करावा. हे घटक त्वचेवरील हानिकारक बॅक्टेरियांचा खात्मा करतात.

याव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही नैसर्गिक सामग्रींचाही चेहऱ्यासाठी वापर करू शकता. ज्या सामग्रींमध्ये अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे, अशाच गोष्टींचा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करावा. यातील पोषण तत्त्वांमुळे मुरुम, डागांची समस्याही दूर होण्यास मदत मिळेल. मध, ग्रीन टी, हळद, मुलतानी माती इत्यादी नैसर्गिक सामग्रींमध्ये त्वचेस पोषक असणाऱ्या घटकांचा समावेश आहे. जाणून घेऊया या सामग्रींपासून फेस पॅक कसे तयार करायचे?

​चारकोल आणि कोरफड फेस पॅक

कोरफडमधील घटकांमुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळतो, तर चारकोल आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कार्य करते. मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत फायदेशीर आहेत.

सामग्री : एक मोठा चमचा कोरफड जेल, एक मोठा चमचा अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल, एक थेंब टी ट्री ऑइल.

विधि : एका वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या. जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

(Steaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत)

​​हळदीचे फेस पॅक

हळदीमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात. हे घटक आपल्या त्वचेवरील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्याचे कार्य करतात.

सामग्री : एक मोठा चमचा मध, अर्धा चमचा हळद, एक चमचा दूध

फेस पॅक तयार करण्याची पद्धत : एका वाटीमध्ये मध आणि हळद एकत्र घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर १५ मिनिटांसाठी लावा. डोळ्यांच्या आसपास फेस पॅक लावू नये. यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुऊन घ्या. हळदीमुळे चेहरा पिवळा दिसत असल्यास कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर दूध लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

(Natural Hair Oil केसांसाठी घरामध्ये कसे तयार करायचे कोरफडीचे तेल)

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर व मुलतानी माती फेस मास्क

त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये जमा झालेल्या दुर्गंध, धूळ, माती स्वच्छ करण्यासाठी मुलतानी रामबाण उपाय आहे. फार पूर्वीपासून मुलतानी मातीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग केला जातोय. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमुळे मृत त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते

सामग्री : एक मोठा चमचा मुलतानी माती, एक प्रोबायोटिक कॅप्सूल, दोन चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

विधि : पेस्ट तयार करण्यासाठी सर्व सामग्री एकत्र करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. यानंतर मॉइश्चराइझर देखील लावावे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थेट चेहऱ्यावर लावण्याची चूक करू नये.

(Natural Skin Care घरच्या घरी कसे तयार करायचे ऑरेंज पील ऑफ मास्‍क?)

​डाळिंब आणि टी फेस पॅक

डाळिंबा आणि ग्रीन टीमध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. सोबत यामध्ये अँटी ऑक्सिडंटचाही साठा आहे. हे घटक चेहऱ्यावरील मुरुम, सूज, त्वचा लाल होणे, जळजळ होणे इत्यादी समस्या दूर करण्यास मदत करतात. यामध्ये पॉलीफेनोल्स देखील असतं, जे त्वचेसाठी पोषक आहे.

सामग्री : एक मोठा चमचा ग्रीन टी पावडर, एक मोठा चमचा डाळिंब पावडर, एक मोठा चमचा मध, एक मोठा चमचा दही

फेस पॅक तयार करण्याची पद्धत : सर्व सामग्री एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. लेप सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

(Aloe Vera घरच्या घरी कसे तयार करायचे अ‍ॅलोव्हेरा जेल?)

​डाळिंब खाण्याचे फायदे

याव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही आपल्या आहारामध्ये डाळिंबाचा समावेश देखील करू शकता. डाळिंबमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फॉलिक अ‍ॅसिड आणि अन्य कित्येक अँटी ऑक्सिडंटचा समावेश आहे. डाळिंबातील पोषण तत्त्वांमुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.

(Hair Oil केमिकलयुक्त हेअर डाय ठेवा दूर, केसांसाठी वापरा हे नैसर्गिक तेल)

NOTE प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तजेलदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा ज्युस


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *