Natural Skin Care हिवाळ्यात चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो, त्वचेसाठी करा हे ७ नैसर्गिक उपचार

Spread the love

​हळद

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. या घटकांमुळे त्वचा चमकदार होते. यातील पोषण तत्त्व कोलेजनचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

कसा करावा हळदीचा वापर? : एक कप बेसनमध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करा. यानंतर आवश्यकतेनुसार दूध ओता आणि जाडसर पेस्ट तयार करा. हवे असल्यास आपण यामध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब देखील मिक्स करू शकता. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावावी. लेप सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.

(Skin Care त्वचेतील ‘हे’ बदल दर्शवतात मधुमेह, जाणून घ्या सविस्तर माहिती)

​दूध

दुधामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चराइझर मिळते. दुधामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी आणि अल्फा हायड्रॉक्सी अ‍ॅसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात. दुधामुळे आपल्या त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे रक्त प्रवाह देखील वाढतो आणि त्वचा स्वच्छ देखील होते.

त्वचेसाठी दुधाचा कसा करावा वापर? : तुम्ही आपल्या चेहऱ्यावर थेट दूध लावू शकता किंवा अन्य सामग्रींमध्ये दूध मिक्स करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा.

(फेस मास्कमुळे त्वचेचं नुकसान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी? डॉक्टरांकडून जाणून घ्या)

​ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल आपल्या त्वचेसाठी अँटी-ऑक्सिडंटच्या स्वरुपात कार्य करतं. यातील पोषण तत्त्व चेहऱ्यावरील फाइन लाइन्‍स दूर करतात आणि सन टॅनची समस्येविरोधातही लढतात. या तेलामुळे आपली त्वचा चमकदार होते.

  • रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑइल लावून त्वचेचा मसाज करावा.
  • यानंतर गरम पाण्यात भिजवलेलं कापड काही वेळासाठी आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि वाफ घ्या.
  • टॉवेल पुन्हा गरम पाण्यात बुडवा-पिळून घ्या आणि चेहरा तसंच मानेवरील अतिरिक्त तेल हलक्या हाताने पुसून घ्या.
  • यानंतर चेहरा आणि मान पुसण्यासाठी एका स्वच्छ टॉवेलचा वापर करावा.

(फेस स्टीमरने पोअर्समधील दुर्गंध काढणं आहे सोपं, चेहऱ्यावर येतो नॅचरल ग्लो)

​​बेसन

  • बेसन आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक एक्सफोलिएटरच्या स्वरुपात कार्य करते. यातील पोषक घटक डेड स्‍किनची समस्या दूर करण्याचे कार्य करतात. बेसनमुळे चेहरा चमकदार होतो आणि चेहऱ्यावरील डाग देखील दूर होतात.
  • बेसनमध्ये पाणी किंवा दूध मिक्स करा आणि हे मिश्रण पॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. एक्सफोलिएशन नीट होण्यासाठी आपण पॅकमध्ये साखर देखील मिक्स करू शकता.

(Foot Care ‘या’ दगडच्या मदतीने दूर करा टाचांच्या भेगा व दुर्गंध, जाणून घ्या योग्य पद्धत)

​काकडी

  • काकडीतील घटक आपल्या त्वचेतील पीएच पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करतात. यातील पोषण तत्त्व आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. थंडगार काकडीमुळे आपल्या त्वचेवर चमक येते आणि सुरकुत्यांची समस्या देखील दूर होते.
  • काकडीचे स्लाइस आपल्या डोळ्यांवर ठेवू शकता किंवा काकडी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून त्याची पेस्ट देखील तयार करू शकता. काकडीच्या रसामध्ये अन्य नैसर्गिक सामग्री मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि त्याचा वापर करावा.

(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)

​मध

मध हे एक नैसर्गिक स्वरुपातील सर्वोत्तम मॉइश्चराइझर आहे. यातील घटक आपली त्वचा हायड्रेट ठेवण्याचं कार्य करतात. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर असतात. ज्यामुळे त्वचा संसर्ग आणि मुरुम कमी होण्यास मदत मिळते.

त्वचेवर मधाचा वापर कसा करावा? : आपण चेहरा आणि मानेवर थेट मध लावू शकता. यानंतर काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा, यामुळे आपली त्वचा मधातील औषधी गुणधर्म शोषून घेईल. यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.

(ग्लुटाथिओनमुळे चेहऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण शरीराची त्वचा उजळते, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती)

संत्रे

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्‍सिडंटची मात्रा भरपूर असते. यामुळे काळवंडलेल्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. सुंदर आणि नितळ त्वचेसाठी आपण नियमित संत्र्याचा रस पिऊ शकता. यामुळे त्वचा उजळण्यास आणि मुरुम कमी होण्यास मदत मिळेल.

त्वचेसाठी कसा करावा वापर? : संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब मिक्स करा. पॅक तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

(घरच्या घरी या ६ नैसर्गिक सामग्रींपासून तयार करा फेस पॅक, संमिश्र त्वचा होईल तजेलदार व चमकदार)

Note त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *