Navratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय? जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की असुरक्षित?

Spread the love

गर्भावस्थेच्या नऊ महिन्यां दरम्यान गर्भवती स्त्रियांना आपल्या गर्भातील बाळाच्या निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी आणि डिलिव्हरी मध्ये कोणत्याही समस्या येऊ नयेत यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणं आणि सावध राहणं अत्यंत आवश्यक असतं. अशा महिलांनी आपल्या डाएट प्लान मध्ये फक्त अशाच पदार्थांचा समावेश केला पाहिजे जे पोषक तत्वांनी परिपूर्ण असतील आणि ते प्रेग्नेंसी मध्ये खाल्ल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. सध्या नवरात्रीचा सण सुरु आहे. उपवास आणि व्रत करणा-या लोकांमध्ये महिलांचा जास्तीत जास्त समावेश असतो.

नवरात्रच काय तर इतर उपवास करण्यामध्येही महिलाच पुढे असतात. अशावेळी उपवास असताना प्रेग्नेंट महिलांनाही साबुदाण्याचे विविध पदार्थ खावे लागतात. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर किंवा इतर काही पदार्थ खाण्याआधी प्रेग्नेंट महिलांनी त्यातील पोषक तत्वांची माहिती आणि फायदे व नुकसान याबद्दल जाणून घेतले पाहिजे. चला तर जाणून घेऊया साबुदाण्याचे फायदे व नुकसान!

साबुदाणा काय आहे?

साबुदाणा एनर्जीसोबतच कार्बोहायड्रेटने परिपूर्ण असतो. साबुदाण्यापासून पुडिंग, खिचडी, खीर, साबुदाणा वडा, उपमा असे स्वादिष्ट पदार्थ बनवले जाऊ शकतात. कित्येक कार्बोनेटेड ड्रिंक्स मध्ये देखील साबुदाण्याचा वापर केला जातो.

(वाचा :- हिवाळ्यात डिलिव्हरी होण्याचे ‘हे’ आहेत फायदे!)

प्रेग्नेंसीमध्ये साबुदाणा खाणं सुरक्षित आहे का?

प्रेग्नेंसी डाएट प्लान मध्ये आई व बाळ दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक आणि सुरक्षित पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं आणि साबुदाणा त्यातीलच एक आहे. आई व बाळ दोघांसाठी साबुदाणा पौष्टिक आणि सुरक्षित देखील असतं. उपवास असताना साबुदाण्याचे पदार्थ खाणं सुद्धा सुरक्षित व एक चांगला पर्याय आहे. यामध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात जे बाळाच्या विकासात मदत करतात आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे साबुदाणा सहजपणे पचतो.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर स्त्रियांना करावा लागतो स्तनांच्या अनेक समस्यांचा सामना! कशी करावी यावर मात?)

गर्भावस्थेत साबुदाणा खाण्याचे फायदे

  • पचनक्रियेत सुधारणा – प्रेग्नेंसी मध्ये बद्धकोष्ठता होणं सामान्य गोष्ट आहे. साबुदाणा मध्ये उच्च मात्रेत डायट्री फायबर उपलब्ध असतात. यामुळे पचनक्रिया सुरुळीत होऊन बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते.
  • जन्मत: होणारे आजार रोखता येतात – साबुदाण्यामध्ये उच्च मात्रेत व्हिटॅमिन ब कॉम्प्लेक्स आणि फॉलिक अॅसिड असतं. जे बाळामधील जन्मत: निर्माण होणारे विकार रोखतं. ही दोन्ही पोषक तत्वं बाळाच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावतात.
  • स्नायूंचा विकास – १०० ग्रॅम साबुदाण्यामध्ये ०.२ ग्रॅम प्रोटीन असतं. यामुळे प्रेग्नेंसी मध्ये स्नायू मजबूत होतात.
  • रक्तप्रवाहात सुधार – प्रेग्नेंसी दरम्यान रक्तप्रवाह सुरुळीत राहणं अत्यंत गरजेचं असतं. यामध्ये योग्य प्रमाणात पोटॅशियम असतं जे की ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यास मदत करतं.
  • हाडांना मजबूती – साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी तुम्ही आहारात साबुदाण्याचा समावेश करु शकता.

(वाचा :- बॉलीवूडमधील हे सेलिब्रेटी IVF व surrogacy प्रक्रियेद्वारे झाले आहेत आई-बाबा! नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान?)

साबुदाण्यातील पोषक तत्व

साबुदाणा खाल्ल्याने आरोग्यास अनेक लाभ होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ब कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि डायट्री फायबर असतात. त्यामुळे प्रेग्नेंसी डाएटमध्ये साबुदाण्याचा समावेश नक्की करावा. पोषक तत्व असल्यामुळे डिलिव्हरी नंतरही साबुदाणा खाण्याचा सल्ला डॉक्टर महिलांना देतात. तर बाळाच्या ठोस आहाराची सुरुवात करताना त्याला साबुदाणा नक्की द्यावा.

(वाचा :- Navratri :- प्रेग्नेंसीमध्ये करताय नवरात्रीचे व्रत? मग जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी!)

साबुदाण्याची रेसिपी

वर म्हटल्याप्रमाणे साबुदाण्याची खिचडी, खीर, उपमा, वडे बनवले जाऊ शकतात. नवरात्रीचं व्रत याच पदार्थांनी सोडलं जातं आणि आता तर तुम्हाला समजलं आहेच की प्रेग्नेंसी मध्ये साबुदाणा खाणं किती लाभदायक असतं. त्यामुळे आता तुम्ही बिनदिक्कतपणे आपल्या नवरात्रीच्या किंवा इतर कोणत्याही उपवासात साबुदाण्याचा समावेश करु शकता.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ अन्यथा गर्भातील बाळाला पोहचू शकतो धोका!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *