Navratri :- प्रेग्नेंसीमध्ये करताय नवरात्रीचे व्रत? मग जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी!

Spread the love

उपवास ठेवावा का?

गरोदरपणात बाळाला आईच्या आहारातूनच पोषण मिळते. जे आई खाते तेच बाळापर्यंत पोहोचते आणि बाळासाठी गरोदरपणाचे 9 महिने अत्यंत निर्णायक असतात. या काळात जर त्याचे योग्य प्रकारे पोषण होऊ शकले नाही तर खूप मोठ्या गंभीर समस्या उत्पन्न होऊ शकतात. म्हणून काही जणांचे हे स्पष्ट मत आहे की गरोदरपणात स्त्रीने उपवास करू नये. अनेक समाजात सुद्धा गरोदर स्त्रीला उपवास न करण्याबद्दलच सांगितले जाते. 9 महिन्यांच्या या काळात तिला उपवासामधून सूट दिली जाते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ अन्यथा गर्भातील बाळाला पोहचू शकतो धोका!)

उपवास ठेवावा

मात्र एक गट असाही आहे जो मानतो की गरोदर स्त्रीने उपवास ठेवल्याने जास्त फरक पडत नाही आणि तिला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. त्यांच्या मते उपवास ठेवणे याचा अर्थ काहीच खाऊ नये असा नाही आहे. उपवास म्हणजे नेहमीचा आहार कमी करून अन्य उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे पुरेसा आहार घेऊन स्त्री आपला उपवास पूर्ण करू शकते. तर समाजात असे हे दोन गट आहेत. दोन्ही गटांच्या बाजू या संतुलित आहेत आणि त्यानुसार अनेक समाजात गरोदर स्त्रीने उपवास ठेवावा किंवा ठेवू नये ते ठरवले जाते.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर अंगदुखीचा त्रास सतावतोय? मग ट्राय करा ‘हे’ रामबाण घरगुती उपचार!)

पहिली तिमाही

गरोदरपणाची पहिली तिमाही बाळासाठी अत्यंत महत्त्वाची असते कारण या काळात बाळाच्या विविध अंगांच्या विकासासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर पोषणाची गरज असते. या काळात पोषणाची कमी निर्माण होणे बाळासाठी अत्यंत घातक ठरू शकते आणि बाळाला गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये उपवास न ठेवणेच उत्तम! गरोदरपपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये गरोदर स्त्री उपवास ठेवू शकते कारण या काळात बाळाच्या गरजांबाबत शरीर स्वत:च काही गोष्टी जुळवून घेत असते आणि बाळाचा विकास हा आईच्या आहारावर जास्त अवलंबून राहत नाही.

(वाचा :- सिझेरियन डिलिव्हरीनंतर ताबडतोब व्हायचं असेल फिट, तर आवर्जून खा ‘हे’ ५ पदार्थ!)

उपवास करताना काय काळजी घ्यावी

गरोदरपणात उपवास करायचा असेल तरी गरोदर स्त्रीने काही काळजी घेणे आवश्यक आहे. जर गरोदरपणात काही त्रास होत असेल जेस्‍टेशनल डायबिटीज, एनीमिया किंवा हाय ब्‍लड प्रेशर सारख्या समस्या उद्भवत असतील तर अजिबात उपवास ठेवू नये. या स्थितीमध्ये उपवास ठेवल्यास तुम्ही कोणत्याही प्रकारची फळे वा धान्य खाऊ शकत नाही आणि ही गोष्ट आई व बाळ दोघांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. बाळासाठी आवश्यक असणारी पोषण तत्वे बाळाला वेळच्या वेळी मिळायला हवीत.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये किती तास झोप घेणं आवश्यक असतं?)

उपवास करण्याचे दुष्परिणाम

उपवासात गरोदर स्त्री केवळ एकाच प्रकारचे पदार्थ खाते यामुळे शरीरातील शुगर लेव्हलवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जर गरोदर स्त्रीने पुरेश्या प्रमाणात पाणी घेतले नाही तर डिहाइड्रेशन सुद्धा होऊ शकते आणि गंभीर प्रमाणात मळमळ व उलटीचा त्रास उद्भवू शकतो. नवरात्रीमध्ये उपवास करताना स्त्रीने तिचा आहार अत्यंत विचारपूर्वक निवडला पाहिजे. आपल्या कॅलरीची मात्र कमी करू नये आणि नवरात्रीमध्ये फळे आणि भाज्या खाव्यात. उपवास हा झेपत असले तरच स्त्रीने करावा अन्यथा बाळाचे आरोग्य आणि आयुष्य दोन्ही धोक्यात येऊ शकते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये सतत भूक लागत असल्यास घाबरू नका, जाणून घ्या ‘ही’ माहिती!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *