Navratri 2020: घरच्या घरी मेकअप कसा करावा? जाणून घ्या ही माहिती

Spread the love

तेजल निकाळजे, साठये कॉलेज
यंदा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन खास नवरात्रीसाठी (Navratri 2020) मेकअप आणि मनाप्रमाणे लुक करून घेणं शक्य नाही. पण, काळजी करण्याची आवश्यकता नाही. काही ठरावीक गोष्टी लक्षात ठेवल्यास घरच्या घरी उत्तम मेकअप करता येऊ शकेल. तुम्हाला बेसिक मेकअप टिप्स माहीत असतील तर घरबसल्या स्वतःचा मेकअप नक्कीच करू शकता.


करा सुरुवात

आऊटफिटवर साजेसा मेकअप करायला सर्वांनाच आवडतो. मेकअप करण्याआधी त्याचे टप्पे जाणून घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी चेहरा स्वच्छ पुसा आणि मॉयश्चरायजर लावा. त्यानंतर प्रायमर लावा. प्रायमर लावल्यानं मेकअप व्यवस्थितपणे सेट होण्यास मदत होते. नवरात्रीत गडद मेकअप करण्यावर भर दिला जातो. तुमच्या पेहरावाला शोभून दिसेल अशा शेड्सचे शिमर, हायलायटर, ब्लश वापरावेत. गडद मेकअप करायचा असल्यास चंदेरी, सोनेरी, ब्राँझ रंगाच्या शिमर्सची मदत घ्या. चेहऱ्यावर असणारे डाग लपवण्यासाठी बाजारात खास तीन ते चार रंगाचे करेक्टर्स मिळतात ते विकत घ्या. सणावारानुसार मेकअप कसा करायला हवा याबद्दल असंख्य व्हिडीओज युट्यूबवर उपलब्ध आहेत.
(Navratri 2020 फॅशनमध्ये काय आहेत नवीन ट्रेंड? ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनी जाणून घ्या)


महत्त्वाचा टप्पा

नवरात्रीमध्ये स्मोकी आइज मेकअपची प्रचंड क्रेझ असते. डोळ्यांचा मेकअप शक्यतो चेहऱ्याच्या आधी करावा. त्यामुळे आयशॅडोचे रंग चेहऱ्यावर पडून मेकअप खराब होण्याची शक्यता कमी होते. तुम्ही जर लेन्स वापरत असाल तर ते मेकअप करण्याच्या आधी लावावेत. डोळ्यांचा मेकअप करताना डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळं कलर करेक्टर किंवा कन्सिलरनं लपवा. हायलायटर, फाऊंडेशन आणि कन्सिलर विकत घेताना तुमच्या रंगाच्या एक शेड सौम्य घ्यावं. डोळ्यांच्या मेकअपमध्ये आयब्रो पेन्सिल आणि मस्कारा लावायला विसरू नका. जेल बेस असणाऱ्या लिपस्टिक्स ऐवजी जलरोधक आणि मॅट बेस किंवा लिक्विड मॅट लिपस्टिकची निवड करा.
(Navratri 2020 ज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय? ऐश्वर्या राय-बच्चनचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का)हेअरस्टाइलचे पर्याय

हेयरस्टाइल नेहमी मेकअपआधी करावी. ओढणी घेण्याच्या पद्धतीवरून केशरचना करा. जर ओढणी डोक्यावर घेत असाल तर साधा बन बांधून ऑक्सिडाइज्ड हेअर अ‍ॅक्सेसरीजनं सजवा. ओढणी एका बाजूला घेत असाल तर फिश टेल पोनी आणि ब्रेडस बांधण्याचा पर्याय आहे. गरबा आऊटफिटवर हेअरस्टाइल कशी करावी याबद्दल अनेक व्हिडीओज युट्यूबवर उपलब्ध आहेत. हेअरस्टाइल आणखी खुलून दिसण्यासाठी मांगटिकाची (बिंदी) मदत घ्या.
(गुलाबी रंगाची क्रेझ : कपड्यांपासून ते फॅशनेबल वस्तूंपर्यंत हवाहवासा गुलाबी रंग)


टिप्स

– सणासुदीला मेकअप करताना कायम जलरोधक प्रॉडक्ट्सची निवड करा.
– तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मॅट तर कोरडी त्वचा असणाऱ्यांनी मॉयश्चरायजर किंवा क्रीम बेस फाऊंडेशनचा वापर करावा.
– मान आणि चेहऱ्याचा टोन समान दिसेल या हिशोबानं मेकअप करा.
– नवरात्रीच्या मेकअपमध्ये टिकलीला महत्त्व असतं. मोठ्या आकाराच्या टिकल्यांना प्राधान्य देऊ शकता.

– तुमचा मेकअप किट आणि ब्रशेस इतरांसोबत शेअर करू नका. त्यानं जंतुसंसर्ग होऊ शकतो.
– मेकअप टिकून राहण्यासाठी मेकअप सेट करणारा स्प्रे वापरावा.
– नवरात्रीत चेहऱ्याला सलग नऊ दिवस गडद मेकअप लावल्यामुळे त्याचे परिणाम होऊ शकतात. निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्यावर नियमित मॉयश्चरायजर आणि इसेसेन्शियल ऑइल्स लावा.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *