Navratri 2020 नवरात्रीमध्ये ट्राय करून पाहा ‘या’ खास हेअरस्टाइल

Spread the love

नवरात्रीच्या उत्सवास प्रारंभ झाला आहे. नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसांत दुर्गा मातेच्या नऊ रुपांची भाविक मनोभावे पूजा-अर्चना करतात. हा उत्सव महिलांसाठी अतिशय खास असतो. महिलावर्ग पारंपरिक साड्या, दागिने परिधान करून श्रृंगार करतात. नवरात्रीचे व्रत करून दुर्गा मातेची मनोभावे सेवा करतात. कालानुरुप सण-उत्सव साजरे करण्याचे स्वरुपही बदलत आहे. पोषाख, दागिन्यांसह वेगवेगळ्या हेअरस्टाइलचीही क्रेझ महिलांमध्ये वाढत असल्याचे दिसते. यंदाच्या नवरात्रौत्सवासाठीही काही खास हेअरस्टाइल करून तुम्ही स्वतःला हटके लुक देऊ शकता.

अशा कित्येक हेअर स्टाइल आहेत, ज्या पारंपरिक साडी आणि ड्रेसवर खुलून दिसतात. विशेष म्हणजे यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचीही आवश्यकता नाही. थोडीशी प्रॅक्टिस केल्यास तुम्ही घरच्या घरीच आपल्या वेशभूषेनुसार हेअरस्टाइल करू शकता. चला जाणून घेऊया यंदाच्या नवरात्रौत्सवादरम्यान आपण कोणकोणत्या केशरचना नक्की ट्राय केल्या पाहिजेत.
(Natural Hair Care केसांना चांगला रंग येण्यासाठी मेंदीमध्ये काय मिक्स करावे?)

​अंबाडा आणि गजरा

साडी नेसल्यानंतर गजऱ्यासह अंबाड्याची ही हेअरस्टाइल अतिशय सुंदर दिसते. तसं पाहायला गेलं तर ही हेअरस्टाइल फार जुनी आहे. या साध्या आणि सोप्या हेअरस्टाइलमुळे सौंदर्यात अधिक भर पडते आणि हटके लुक देखील मिळतो. साधा अंबाडा बांधल्यानंतर यावर तुमच्या आवडत्या फुलांचा गजरा माळा.

(Aishwarya Rai Bachchan मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचं ब्युटी सीक्रेट माहीत आहे का?)

​ब्रेडेड बन

अंबाड्यामध्येही सध्या तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या स्टाइल पाहायला मिळतील. ब्रेडेड बन देखील एक सुंदर हेअरस्टाइल आहे, जी साडीवर अतिशय छान दिसते. केसांचा मधोमध भांग पाडा आणि केसांच्या छोटी-छोटी वेण्या बांधा. यानंतर स्टायलिश अंबाडा बांधून घ्या. यावर तुम्ही एखादे फुल किंवा गजरा माळू शकता.

(Natural Hair Care केसगळतीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या हा नैसर्गिक उपाय)

स्टायलिश अंबाडा

​लो बन

महिलावर्गामध्ये ही हेअरस्टाइल अतिशय लोकप्रिय आहे. लो बन हेअरस्टाइल कशी करावी, हे सांगणारे कित्येक व्हिडीओ तुम्हाला यु-ट्युबवर पाहायला मिळतील. अंबाडा बांधून झाल्यानंतर त्यावर आवडत्या अ‍ॅक्सेसरीजचा वापर तुम्ही करू शकता.

(Natural Hair Care केसगळती कशी रोखावी? अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला नैसर्गिक उपाय)

यामुळे लो बन हेअर स्टाइल आकर्षक दिसेल.

(Hair Care Tips या ५ हेअरस्टाइल कधीही करू नका, जाणून घ्या केसांवर कसा होतो परिणाम?)

​साइड वेणी

ही हेअरस्टाइल अतिशय सोपी आहे. यंदाच्या नवरात्रौत्सवामध्ये साइड वेणी हेअरस्टाइल नक्की ट्राय करून पाहा. केस हलकेसे कुरळे दिसण्यासाठी कर्लिंग आयरन टुलचा तुम्ही वापर करू शकता आणि एका बाजूने केसांमध्ये भांग पाडून फ्रेंच वेणी बांधून घ्या. पुढील बाजूनेही तुम्ही वेणी बांधू शकता.

(Navratri 2020 उपवासादरम्यान चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो? डाएटमध्ये या ६ गोष्टींचा करा समावेश)

साधी आणि मोहक वेणी

ही हेअरस्टाइल साध्या कपड्यांवरही अतिशय छान दिसते. पफ करून काही बॉबी पिन वापरून केस मागील बाजूस न्या. यानंतर एका बाजूने वेणी बांधून घ्या. वेणी सैल बांधायची आहे, हे लक्षात ठेवा.

​मेसी बन

मेसी बन अतिशय सुंदर आणि क्लासिक हेअरस्टाइल आहे. ही हेअरस्टाइल साडी आणि ड्रेस दोन्हीवर चांगली दिसते. केसांचा पफ बांधा आणि त्यानंतर पोनी देखील बांधून घ्यावा. यानंतर साध्या-सोप्या पद्धतीने अंबाडा बांधावा.

(Hair Care Tips केसांच्या वाढीसाठी नेमकी काय घ्यावी काळजी? हेअर प्रोडक्ट्सचा कोणत्या क्रमाने करावा वापर)

यावर एखादे अ‍ॅक्सेसरीज, गजरा किंवा फुल माळावे. यंदा नवरात्रौत्सवामध्ये या हेअरस्टाइल नक्की ट्राय करून पाहा.

(Navratri 2020 नवरात्रौत्सव 2020 : उपवास करण्याचे सौंदर्यवर्धक व आरोग्यवर्धक लाभ)
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *