Navratri Fasting – आजारी लोकांनी उपावासादरम्यान करु नये ‘या’ चूका!

Spread the love

काही आजार असे असतात जे उपचार केल्यानंतर बरे होतात तर काही आजार असे असतात जे एकदा जडले की मग आयुष्यभर साथ सोडत नाहीत. यामध्ये हाय ब्लड प्रेशर, मधुमेह (diabetes), फॅटी लिवर आणि किडणीशी निगडीत काही समस्या व डिसऑर्डर याचा समावेश आहे. जे लोक या आजारांनी ग्रस्त असतात त्यांना आयुष्यभर आपल्या आजाराला लक्षात ठेऊनच आहाराचं नियोजन करावं लागतं. आयुष्याचील प्रत्येक छोट्या-मोठ्या सेलिब्रेशनची प्लानिंग ही या आजारांना लक्षात ठेऊनच करावी लागते.

तर नवरात्रीचे किंवा इतर कोणत्या सणांचे उपवास कसे याला अपवाद राहतील? काही लोकांच्या सणांशी भावनिक व अध्यात्मिक भावना जोडल्या गेलेल्या असतात त्यामुळे काळजी घेत का होईना त्यांना सण साजरे करताना उपवास करणं गरजेचं वाटतं. तुम्ही देखील अशाच कोणत्या आजाराने ग्रस्त असाल पण तुम्हाला नवरात्रीचं व्रत-उपवास करायचा असेल तर आम्ही आज तुमच्या कामाच्या काही टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही नवरात्रीचे उपवास देखील सुफळ संपूर्ण पूर्ण करु शकता आणि स्वस्थ देखील राहू शकता.

तहान-भूक रोखून धरु नका

ज्या लोकांना बल्ड प्रेशर, मधुमेह किंवा इतर गंभीर व्रत किंवा उपवास असताना कधीच तहान-भूक रोखून धरु नये. कारण यामुळे सामान्य लोकांच्या तुलनेत अशा लोकांच्या शरीरावर नकारात्मक परिणाम जास्त आणि अधिक जलद होऊ शकतो. कारण मधुमेह आणि ब्लड प्रेशर या आजारांनी ग्रसित असलेल्या लोकांचे शरीर सामान्य लोकांपेक्षा अधिक कमजोर असते. त्यामुळे अधिक काळ पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते तर अधिक काळ उपाशी राहिल्याने अशक्त वाटणं, चक्कर येणं यासारखे त्रास होऊ शकतात.

(वाचा :- Navratri Fating : वजन व ओटीपोटावरील चरबी करायची आहे कमी? मग ताबडतोब करा ‘या’ टिप्स फॉलो!)

मेंदूला मिळतात चुकीचे संकेत

बहुतांश वेळा खूप काळासाठी उपाशी असताना तुम्ही किचन मध्ये स्वयंपाक बनवता किंवा उपवासासाठी स्पेशल डिशेश तयार करण्याच्या कामात व्यस्त असता, त्यावेळी पदार्थांच्या सुगंधानेच पोट भरल्यासारखं वाटू लागतं. असं यामुळे होतं की सतत येणा-या पदार्थाच्या सुगंधाने मेंदूला हा संकेत मिळत राहतो की जणू काही आपण या पदार्थाची चव चाखतोय. या कारणामुळे आपला मेंदू पचनक्रियेला जेवण पचवण्याचे संकेत देतो. अशारितीने खाली पोटात अॅसिड बनल्यामुळे पोटात गरमी आणि छातीत जळजळ या समस्या सुरु होऊ शकतात. त्यामुळे उपवास असताना जास्त काळ उपाशी राहू नका. थोड्या थोड्या वेळाचा गॅप ठेवून दूध, सुका मेवा, फळ याचं सेवन करत राहा.

(वाचा :- Navrtari Fasting: हवाय उपवासाचा आरोग्यवर्धक पदार्थ? मग लक्ष्मी देवीच्या ‘या’ आवडत्या पदार्थासारखा उत्तम पर्याय नाही!)

लिवर आणि किडणी स्वस्थ ठेवण्यासाठी

उपवास किंवा व्रत असताना लिवर आणि किडणी निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी पर्याप्त मात्रेत पाणी पिणं अत्यंत आवश्यक असतं. जर पोट खाली असताना पाणी प्यायल्याने सतत लघुशंकेची समस्या होत असेल तर कधी ज्यूस, कधी दूध तर कधी लस्सी असे द्रव्य पदार्थ तुम्ही घेऊ शकता. पण लिक्विड डाएट म्हणजेच द्रव पदार्थांचं सेवन जरुरु करत राहा. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमी होणार नाही. ज्या लोकांचं लिवर कमजोर असतं किंवा किडणीची काही मोठी समस्या असते त्या लोकांनी दर तासाभराने अर्धा ते एक ग्लास पाणी प्यायलच पाहिजे. असं केल्याने शरीर हायड्रेटेड राहतं आणि लिवर-किडणीची सफाई होत राहते.

(वाचा :- निस्तेज डोळ्यांत हवी आहे नवी चमक? मग तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत साधेसोपे रामबाण उपाय!)

असा आहार घ्या

दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी व्रत असताना कोकोनट वर्जिन ऑईल मध्ये बनवलेल्या आहाराचेच सेवन करावे. कारण हे तेल खूपच लाईट आणि पचनास हलके असते आणि अनावश्यक चरबीला शरीरात जमा होण्यापासून रोखते. त्यामुळे पचनतंत्रावर या तेलात बनवलेला आहार पचवताना जास्त दबाव पडत नाही. उपवासाचा फराळ करताना एका वेळी एकाच पदार्थाचे सेवन करा. जसं की तुम्ही कुट्टूच्या पीठापासून बनवलेले पदार्थ खात असाल तर त्यासोबत फक्त भाजी किंवा दहीच खा. राजगीरा, शिंगाडा किंवा फळ खाऊ नका. कारण तुम्ही जितक्या प्रकारचा आहार घ्याल लिवरला तितक्याच प्रकारचे एजांइम्स तयार करावे लागतात. अशामुळे लिवरच्या समस्या जडलेल्या लोकांच्या समस्येत वाढ होऊ शकते. कारण यामुळे जास्त उर्जा खर्च होते व कमजोरी वाढते.

(वाचा :- शरीरासारखीच चरबी लिवरवर वाढून देऊ शकते गंभीर आजारांना निमंत्रण, असं ठेवा आपलं लिवर निरोगी!)

मधुमेहींनी घ्यावी विशेष काळजी

रक्तात साखरेचे प्रमाण ७० मिली ग्रॅमपेक्षा कमी असेल तर उपवास करु नये. टाईप २ मधुमेह असणा-या लोकांनी उपवास करण्यास हरकत नाही. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करावा. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचा बदलही करावा. उपवास सुरु करण्याआधी डाळी, फळे, कडधान्ये असा प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. उपवासादरम्यान पाणी पिणे वर्ज्य असेल तर उपवास सुरु होण्याआधीच द्रव पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करुन घ्यावे. इन्सुलिन घेणा-या रुग्णांनी डोसची मात्रा कमी-जास्त करताना डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

(वाचा :- नाश्त्यातील बटाट्याची कमतरता पूर्ण करतात ‘हे’ पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *