Navratri Fating : वजन व ओटीपोटावरील चरबी करायची आहे कमी? मग ताबडतोब करा ‘या’ टिप्स फॉलो!

Spread the love

उपवास (fasting) हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. आपल्याकडे उपवास करण्याचं एक खास कारण आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने सणांच्या दिवशी उपवास करावा असे म्हणतात. उपवास केल्याने शरीराला फायदेच फायदे होतात. अनेक जण शरीर विषारी घटकांपासून मुक्त व्हावे म्हणून सुद्धा उपवास करतात. असाच एक उपवास आहे नवरात्रीचा! स्त्रियांप्रमाणे पुरुष सुद्धा हा उपवास मोठ्या श्रद्धेने पळतात. तुम्ही सुद्धा नक्की पाळत असाल, मात्र या उपवासामागे वजन कमी करण्याचा तुमचा उद्देश असेल तर तुम्हाला काही खास टिप्स माहित असायला हव्यात.

अनेक जण वजनावर नियंत्रण राहावे, वाढलेले शरीर संतुलित व्हावे म्हणून उपवास करतात. यालाच एकप्रकारे मॉडर्न भाषेत डायट (Diet) असे म्हणतात. ज्यात शरीराला गरजेचे आहे तेवढेच घटक सेवन केले जातात. तर अनेक जण वजन कमी करायला म्हणून उपवास करतात, मात्र उपवासाच्या नादात इतकं काही खातात की त्यांचं वजन जास्त वाढतं. तुम्ही ही चूक अजिबात करू नये आणि या नऊ दिवसांच्या उपवासात तुमचं वजन बऱ्यापैकी कमी व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला काही खास टिप्स आज देणार आहोत.

डायट चार्ट तयार करा

उपवास करताना ही गोष्ट सर्वात प्रथम करायला हवी मात्र सामान्यत: फार कमी लोकं ही गोष्ट करताना आढळतात. उपवास करण्याआधी तुम्ही स्वत:चा एक डायट प्लान तयार करणे गरजेचे असते. जर तुम्ही डायट व उपवास एकत्र करत असला तर हे तुम्ही करायलाच हवे. यामुळे तुम्ही तळलेल्या आणि भाजलेल्या गोष्टी खाण्यापासून दूर राहाल. जर तुम्हाला पूर्ण नऊ दिवसांचा डायट प्लान तयार करता येत नसेल तर तुम्ही दर दुसऱ्या दिवशीच्या आदल्या दिवशी तुमचा त्या दिवशीचा प्लान तयार करा. यामध्ये कर्बोदके, प्रोटीन, फायबर यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश नक्की करा.

(वाचा :- Navrtari Fasting: हवाय उपवासाचा आरोग्यवर्धक पदार्थ? मग लक्ष्मी देवीच्या ‘या’ आवडत्या पदार्थासारखा उत्तम पर्याय नाही!)

थोडा थोडा आहार घ्या

ही एक महत्वाची टीप त्यांच्यासाठी आहे ज्यांना आपले वजन उपवास करून कमी करायचे आहे. अशा लोकांनी तीन वेळेस आहार घेण्याऐवजी दर 2 तासाला काही ना काही खावे. यामुळे शरीरात मेटाबॉलिज्म योग्य प्रमाणात राहते आणि उर्जेचा स्तर सुद्धा संतुलित राहतो. यामुळे शरीरातील ग्लुकोजचा स्तर टिकून राहण्यास सुद्धा मदत होईल. ही पद्धत पाळल्याने शरीरात उर्जा मोठ्या प्रमाणावर टिकून राहील. एका वेळेस खूप जास्त खाण्यापेक्षा थोडे थोडे खाल्ल्याने त्याचा शरीराला सुद्धा फायदाच होतो.

(वाचा :- निस्तेज डोळ्यांत हवी आहे नवी चमक? मग तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत साधेसोपे रामबाण उपाय!)

पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

उपवासात जितकं चांगले खाणे महत्त्वाचे आहे तेवढेच महत्त्वाचे आहे शरीराला सतत पाणी पुरवणे. शरीराला पाण्याची नितांत गरज असते. तुम्ही जेवढे पाणी प्याल तेवढे शरीर निरोगी राहील. केवळ पाणीच नाही तर स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी, ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी आणि भाज्यांचे सूप सुद्धा तुम्ही पिऊ शकता. यामुळे शरीर डिटॉक्‍स अर्थात विषमुक्त होण्यास मदत होईल. शरीरातील विषारी व घातक घटक बाहेर फेकले जातील.

(वाचा :- शरीरासारखीच चरबी लिवरवर वाढून देऊ शकते गंभीर आजारांना निमंत्रण, असं ठेवा आपलं लिवर निरोगी!)

स्नॅक्स योग्य प्रकारे निवडा

टाईमपास म्हणून स्नॅक्स खाण्याची लोकांची सवय असते. पण हे स्नॅक्स अति प्रमाणात खाल्ले तर शरीराला घातक ठरू शकतात आणि ठेवलेला उपवास निरुपयोगी ठरू शकतो. जसे की तळलेले पदार्थ, चिप्स, भजी आणि प्रक्रिया केलेले अन्न यांचे सेवन शक्यतो टाळावे आणि सात्विक आहारच घ्यावा. उपवास आपण स्वत:च्या शरीराच्या भल्यासाठी ठेवतो. त्यामुळे जर तो प्रामाणिक पणे पाळला तरच त्याचा फायद होईल अन्यथा शरीराला मोठे नुकसान सहन करावे लागेल.

(वाचा :- नाश्त्यातील बटाट्याची कमतरता पूर्ण करतात ‘हे’ पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ!)

चहा आणि कॉफी कमी घ्या

अनेकांना उपवासा दरम्यान चहा आणि कॉफी मोठ्या प्रमाणात पिण्याची सवय असते. उपवासाला चहा आणि कॉफी चालते या नावाखाली लोकं मोठ्या प्रमाणावर या दोन पेयांचे सेवन करतात. मात्र उपवासात या दोन पेयांचे जास्त सेवन न करणेच उत्तम आहे. कारण उपाशी पोटी चहा आणि कॉफी प्यायल्याने अपचनाची आणि अ‍ॅसिडीटीची समस्या निर्माण होऊ शकते. तर मंडळी या काही टिप्स पाळा आणि या उपवासात वजन कमी करण्याचे ध्येय पूर्ण करा.

(वाचा :- Navratri 2020 :- नवरात्रीच्या उत्साहामध्ये करु नका आरोग्याकडे दुर्लक्ष, या टिप्स फॉलो करुन राहा स्लिम व फिट!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *