New Year Celebration : दूर असतानाही एकत्र साजरा करू शकता नवीन वर्षाचा जल्लोष, ‘या’ खास टिप्स येतील कामी!

Spread the love

यंदाचा न्यू इयर सोहळा (happy new year 2021) हा वेगळा आहे. इतका वेगळा की असा काळ कोणी कधीच अनुभवलेला नाही आणि त्याला कारण आहे अर्थातच कोरोना! त्यात कोरोनाचा (corona virus pandemic) कोणीतरी जुळा विषाणू भाऊ युरोपात सापडला म्हणे त्यामुळे कोरोनाचे दुसरे पर्व सुरु होते की काय हि धास्ती सर्वांच्याच मनात आहे. सुरक्षेच्या कारणासताव सरकारने सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागत सोहळ्यावर अनेक निर्बंध लावले आहेत.

आजवर जसे तुम्ही पार्टी करत आलात, एन्जोय करत आलात तसे तुम्हाला या वर्षी करता येणार नाही. यंदा दूर राहून, सोशल डिस्टन्सिंग (what is social distancing and goverment rules on 31st) पाळूनच नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे. पण हे कसे करणार? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल? तर फिकर नॉट, या लेखात आम्ही तुम्हाला देणार आहोत अशा टिप्स ज्या वापरून तुम्ही दूर राहूनही 2021 (new year wishes) च्या नव वर्षाचा सोहळा एन्जोय करू शकता.

व्हिडियो कॉल सेलिब्रेशन

मनुष्य जातीने आजवर कधीही केला नसेल इतका वापर गेल्या वर्षभरात व्हिडियो कॉलिंगचा केला आहे. अख्खं जग व्हिडियो कॉलिंगमुळे तारलं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. तर याच व्हिडियो कॉलिंगचा वापर करून तुम्ही आपल्या मित्रांसोबत किंवा प्रियजनांसोबत घरात बसल्या बसल्या नववर्षाचा सोहळा साजरा करू शकता. हव्या तितक्या गप्पा मारा. एकच दिशा ठरवून ती समोर ठेवून खा. म्हणजे जणू आपण हॉटेलात बसल्याचा फील येईल. ऑनलाईन गेम्स खेळा. व्हिडियो कॉलिंगने एक वेगळे जग आपल्याला खुले करून दिले आहे. त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच हा न्यू इयर साजरा करू शकता.

(वाचा :- वरुण धवनच्या मते मुली आपल्या जोडीदारात ‘ही’ एक गोष्ट आवर्जून शोधतात!)

स्पेशल सरप्राईज

तुम्ही दरवर्षी न्यू इयरला आपल्या लाडक्या व्यक्तीला स्पेशल सरप्राईज वा गिफ्ट देत असाल तर तुम्ही ती गोष्ट या वर्षी सुद्धा करू शकता. एखाद्या ऑनलाईन सर्विसेसची मदत घ्या तुमचे गिफ्ट व सरप्राईज त्यांच्या मार्फत आपल्या व्यक्ती पर्यंत पोहोचवा. जेव्हा तुमचे सरप्राईज तिकडे पोहोचेल तेव्घा अचानक कॉल करून, अगदी जोरात ओरडून त्या व्यक्तीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या. यामुळे नक्कीच कोरोना काळातील हा न्यू इयर तुम्हा दोघांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरेल.

(वाचा :- एकत्र कुटुंब पद्धतीत लग्न होत असेल तर अशी बनवा सर्वांच्या मनात खास जागा!)

ऑनलाईन गेम्स

ऑनलाईन गेम्स हा मित्रांसोबत न्यू इयर सेलिब्रेट करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्ही आणि तुमचे सगळे मित्र गेम्स वेडे असाल तर तुम्ही आवर्जून एक गेम्स पार्टीचे आयोजन केले पाहिजे. ऑनलाईन गेम्स दरम्यान तुम्ही एकमेकांशी गप्पा सुद्धा मारू शकता. साहजिकच त्या निमित्ताने खेळता खेळता तुमच्या गप्पा होतील, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि एक आगळा वेगळा न्यू इयर तुम्ही अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा कराल. यात तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरून हि गेम पार्टी अधिक रंगतदार करू शकता.

(वाचा :- मुलींच्या ‘या’ ५ सवयींमुळे मुलांचं डोकं होतं खराब, पळू लागतात नात्यापासून दूर!)

तुमच्याकडून पार्टी

आपण न्यू इयरला काय करतो तर सगळ्या मित्रांना हॉटेलला बोलावतो आणि पार्टी देतो. हीच गोष्ट तुम्ही या न्यू इयरला देखील करू शकता. तुम्ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवांची मदत घेऊन मित्रांना पार्टी देऊ शकता. त्यांचा आवडता पदार्थ त्यांच्या घरी पोहोचवा आणि पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र जमत व्हिडीओ कॉलच्या साथीने एक व्हर्च्युअल पार्टी साजरी करा. अनेक जणांचे या वर्षी असेच प्लान्स आहेत कारण यामुळे पार्टीची परंपरा तुटत नाही आणि नवीन वर्षाचा सोहळा एकत्र साजरा केल्याचा आनंद देखील मिळतो.

(वाचा :- ‘या’ ५ गोष्टी सांगतात की तुमचा जोडीदार का करत नाही तुम्हाला स्वत:हून पहिला मेसेज!)

काळजी घ्या

आपण आजवर आपल्या मर्जीने बिनधास्त नवीन वर्ष साजरे करत आलो, पण यंदाचे वर्ष वेगळे आहे हे आपण सर्वांनी एक सुजाण नागरिक म्हणून समजून घ्यायला हवे आणि आपल्या सरकारला सहकार्य करायला हवे. अनेक हट्टी नागरिक या काळात सुद्धा बाहेर जाऊन पार्ट्या झोडण्याचे मनसुबे अखात असतील, पण अशांनी लक्षात घेतले पाहिजे कि यामुळे ते स्वत:लाच संकटात टाकत आहेत फक्त कोरोनाच्याच नाही तर पोलिसांच्या सुद्धा, कारण पोलिसांनी यंदा सर्व निर्बंध कडक पद्धतीने पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. जर तुम्ही उल्लंघन केले तर त्याची फळे तुम्हाला भोगावी;लागतील. त्यापेक्षा हे वर्ष आपण सगळ्यांनीच संयम बाळगूया आणि प्रशासनाला सहकार्य करुया! तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

(वाचा :- माधुरीसोबत नाव जोडलं गेल्यानंतर अनिल कपूरने केलं ‘हे’ ह्रदयस्पर्शी वक्तव्य!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *