Nora Fatehi नोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या शानदार डान्सिंग स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. नोराने आतापर्यंत कित्येक सुपरहिट सिनेमांमध्ये आपले नृत्यकौशल्य दाखवत बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. बी टाउनमध्ये नोरा ‘डान्सिंग दिवा’ म्हणून ओळखली जाते. अभिनय, डान्स याव्यतिरिक्त नोरा आपल्या जबरदस्त आणि हटके स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. नोरा कोणत्याही प्रकारचे आउटफिट अतिशय सहजरित्या कॅरी करते. वेगवेगळ्या प्रकारच्या पोषाखांमध्ये तिचा लुक ग्लॅमरस आणि मोहक असतो, यात काही शंकाच नाही.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नवीन फोटोंनीही चाहत्यांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस स्टाइल आणि मोहक अदांवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या फोटोंवरही चाहत्यांकडून अक्षरशः कमेंट्स आणि लाइकचा पाऊस पाडला जात आहे. (सर्व फोटो क्रेडिट : इन्स्टाग्राम)
(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)

​नोराचे लेटेस्ट फोटोशूट

अभिनेत्री नोरा फतेहीनं एका मासिकासाठी नुकतेच फोटोशूट केले होते. एडिशन रिलीजसह या फोटोशूटशी संबंधित काही अन्य फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो नोरासह ते तिला स्टायलिश लुक देणारी सेलिब्रिटी स्टायलिस्ट मेनका हरिसिंघानीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून शूटचं थीम जांभळ्या रंगाच्या आसपास नियोजित असल्याचे तुम्ही पाहू शकता.

(Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट)

​नोराचं आर्टिस्टिक बॉडीसूट

एका फोटोमध्ये नोराने आर्टिस्टिक बॉडीसूट ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. यामध्ये फिगर हगिंग स्लीव्हलेस आणि ब्रीफकट बॉडीसूट होते, जे स्ट्रेचेबल मटेरिअलपासून तयार करण्यात आलं आहे. तसंच यावर ट्रान्सपरंट मटेरिअलही वापर करण्यात आलं होतं, ज्यास रफल्ड लुक देण्यात आला आहे. शॉर्ट लेंथ असणाऱ्या या बॉडीसूटला मागील बाजूने टेल डिझाइन देखील देण्यात आलं आहे. हा सुंदर ड्रेस Nadya Dzyakने डिझाइन केला होता. डिझाइनर आउटफिट्सना मॉर्डनसह आर्टिस्टिक लुक देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)

​सीक्वेन्स आणि फेदर वर्क गाउन

दुसऱ्या फोटोमध्ये नोराने दुबईमधील फॅशन लेबल ATELIER ZUHRA चा डिझाइनर ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. या मोहक ड्रेसमध्ये सीक्वेन्स वर्कसह फेदर स्कर्ट आणि टेल डिझाइन देखील जोडण्यात आलं होतं. सीक्वेन्स वर्क असणाऱ्या आउटफिटची नेकलाइन हॉल्टर आणि शॉर्ट लेंथ ड्रेस डिझाइन तुम्ही पाहू शकता. लोअर पोर्शनवर फेदर वर्क करण्यात आलं होतं, ज्याद्वारे टेल लुक देखील देण्यात आला होता.

(मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख)

​चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

या सुंदर लुकसह नोराच्या केसांचाही रंग देखील हलक्या जांभळ्या स्वरुपात ठेवण्यात आला होता. हेअर स्टाइल फोटोशूटच्या थीमला पुरक दिसत आहे. या शूटसाठी नोराने हेड गिअर्स देखील परिधान केले होते, ज्यामुळे तिला हटके लुक मिळाला आहे. या आगळ्या वेगळ्या रुपामध्ये नोरा अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

(अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडची हटके फॅशन, तिचे स्टायलिश फोटो पाहिले का?)

​कमेट्स आणि लाइकचा पाऊस

काही चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये फायर इमोजी देखील पोस्ट केलं होतं. तर काही लोकांनी तिला ‘क्वीन’ म्हटलं. तर काहींनी फोटोवर ‘हार्ट’ इमोजी देखील शेअर केले. एकूणच नोराच्या या फोटोशूटवर कमेंट्स आणि लाइकचा पाऊस पाडला जात आहे. दरम्यान स्टाइल, फॅशन हटके पद्धतीने कशी कॅरी करावी, याबाबत नोराला (Nora Fatehi) चांगलीच माहिती आहे. हे तुम्ही या फोटोंच्या माध्यमातून पाहू शकता.

(जेव्हा सनी लियोनीला स्टायलिश ड्रेसवरून करण्यात आलं होतं ट्रोल)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *