OCD ओसीडी म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
निरोगी राहण्यासाठी मानसिक आरोग्य जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वच जणांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. करोनानंतरची परिस्थिती कशी असेल, त्या परिस्थितीला आपण कशाप्रकारे सामोरं जाऊ यासारख्या तणावपूर्ण विचारांचा सामना अनेकजण करताना दिसत आहेत. तसंच लॉकडाउनच्या काळात बऱ्याच जणांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला, असं तज्ज्ञ सांगतात. ओसीडी अर्थात ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर असणाऱ्या व्यक्तींच्या वागणुकीत कमालीचे बदल झालेले दिसले असं तज्ज्ञ सांगतात. ओसीडी असणाऱ्या व्यक्तींमध्ये करोना पश्चात परिस्थिती कशी असेल या विचारामुळे काही बदल झाले का, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतोय का याबाबत जाणून घेऊ या.

(वजन घटवण्यासाठी रामबाण उपाय आहे कांदा, असे सेवन केल्यास वजन लवकर होऊ शकते कमी)

स्वच्छतेबाबत अधिक खबरदारी घेणाऱ्या म्हणजेच ओसीडी असलेल्या काही व्यक्तींमध्ये हात धुणं, स्वच्छता राखण्याच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा वाढ दिसून आली, असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. लॉकडाउनआधी ज्या व्यक्तींमध्ये ओसीडीची सौम्य लक्षणं दिसून येत होती, त्यापैकी मोजक्या व्यक्तींमध्ये लॉकडाउन दरम्यान वारंवार हात धुणं, प्रत्येक वस्तू वारंवार सॅनिटाइज करणं यासारख्या गोष्टी दिसून आल्या. करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण तणावाखाली आहेत. अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेले दिसून आले. अशा परिस्थितीत तुमच्यामध्ये ओसीडीची लक्षणं दिसून येत असतील तर त्यासाठी योग्य ते उपचार घेतले पाहिजेत असं तज्ज्ञ सांगतात. ओसीडीवर उपचार घेतल्यामुळे त्या व्यक्तीची स्वतःच्या विचारांवर आणि तणावावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते. या व्यक्ती करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती योग्य प्रकारे हाताळताना दिसून येतात असं तज्ज्ञ नमूद करतात.

(कमरेवरील चरबी घटवण्यासह शरीर डिटॉक्स करण्यापर्यंत, खूप लाभदायक आहे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर)

ओसीडीवर उपचार घेत असलेल्या बहुतांश व्यक्ती करोनामुळे उद्भवलेली अनिश्चित परिस्थिती, करोनानंतरच्या परिस्थितीला सामोरं जाताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल, हे सगळं योग्य प्रकारे हाताळताना दिसत आहेत. ओसीडी असलेल्या सर्वच व्यक्तींमध्ये करोनामुळे बदल झालेले दिसून येत नाहीत, असं बेंगळुरुच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सेस अर्थात एनआयएमएचएएनएसने (NIMHANS) केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आलंय.

(गॅसच्या समस्येमुळे त्रस्त आहात? आरोग्यासाठी या ६ गोष्टी खाणं बंद करणं गरजेचं)

एनआयएमएचएएनएसतर्फे ओसीडीवर उपचार घेत असलेल्या जवळपास २४० व्यक्तींशी संवाद साधण्यात आला. ओसीडी असलेल्या व्यक्तींमध्ये करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पुढे काय होणार या विचारांमुळे काही बदल आढळून येतील असा अंदाज होता. उपचार घेत असलेल्या २४० पैकी जवळपास आठ टक्के रुग्णांमध्ये ओसीडीची लक्षणं पुन्हा आढळून आली. पण, ती करोनाच्या भीतीमुळे नव्हती. बहुतांश व्यक्ती करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळताना दिसून आल्या, असं एनआयएमएचएएनएसच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झालं.

संकलन- केतकी मोडक, विद्यार्थिनी कॉलेज


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *